पोस्ट्स

कथा न झालेल्या तिसऱ्या महायुद्धाची

इमेज
             सध्या भारतीय वृत्तवाहिन्या रशिया आणि युक्रेन  यांच्यातील युद्धाचे वर्णन तिसरे महायुद्ध म्हणून करत असले तरी,  याच्यापेक्षा गंभीर परीस्थिती एकदा उदभवली होती .ज्यावेळी खरोखरीच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते .  ज्याला जगाच्या इतिहासात क्युबन  क्रायसिस म्हणून ओळखले जाते . या क्युबन    क्रायसिस मध्ये सहभागी असणाऱ्या तीन पैकी दोन देशांकडे घातक अण्वस्त्र होती . फक्त एका कळ  दाबायचा अवकाश,  एकमेकांवर अण्वस्त्रे गेलीच म्हणून समजा,  अशी त्यावेळी स्थिती होती मात्र त्यावेळी जगाच्या महासत्तेच्या प्रमुखांनी ही स्थिती शांततापूर्वक हाताळली, आणि जग तिसऱ्या महायुद्धापासून दूर गेले . सध्याचे रशिया युक्रेन युद्ध त्यावेळच्या  क्युबन  क्रायसिसच्या तुलनेत काहीच नाही.  सध्याच्या रशिया युक्रेन युद्धात एकाच गट लष्करीदृष्ट्या प्रबळ आहे , ,तर दुसरा गट अन्य देशांच्या मदतीने दुसऱ्या गटाशी लढायचा प्रयत्न करत आहे . त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता या वेळी खूपच कमी प्रमाणात आहे मात्र तशी...

अखेर नकारघंटाच

इमेज
            मागील वर्षी २८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु असणारा महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर कर्मचाऱ्यांना नकारघंटाच बघावी लागली . राज्याचे मुख सचिव ,अर्थ सचिव आणि परिवहन सचिव या तिघांनी १२ आठवड्याच्या अवधीत केलेल्या अहवालात एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याविषयी प्रतिकूलताच दाखवली आहे   हा लेख लिहीत असताना या अहवालवाला मुख्यमंत्र्यांनी संमती दाखवण्याची औपचारिकताच बाकी आहे.  तुम्ही जेव्हा हा लेख वाचत असला तेव्हा कदाचित तीही पूर्ण झालेली असेल  .संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही एसटीचे राज्ज्य शासनात पूर्णतः विलीनीकरण करावे ही होती त्याच मागणीस या अहवालात मनाई करण्यात आली आहे . या मागणीखेरीज त्यांच्या पगारवाढीची मागणी या आधीच  मान्य करण्यात आली होती                  या संपात एसटी कर्मचाऱ्याच्या अधिकृत मान्यताप्राप्त कामगार संघटनेस न्यायालयाने अनधिकृत ठरवणे इतर अधिकृत म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांनी आंदोलनात  माघार घेतल्यावर त्या संघटनांच्या नेत्यांना बाजूला सारत कर्...

बुद्धीच्या खेळात महाराष्ट्राची दैदिप्तमान कामगिरी

इमेज
      पहिल्या क्रमांकावरील दिव्या देशमुख  सध्या मराठीतील विविध वृत्तवाहिन्यामध्ये रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाच्या बातम्या किंवा राजकीय क्षेत्रातील बातम्या देत असताना,  बुद्धीच्या खेळात अर्थात बुद्धिबळात महाराष्ट्रीयन बुद्धिबपटूंनी अत्यंत दैदिप्तमान कामगिरी केली आहे नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या,  ५८ व्या  राष्ट्रीय खुल्या  वरिष्ठ महिला बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या दोन  क्रमांकावर महाराष्ट्राच्या बुद्धिबळतारका आहेत नागपूरच्या दिव्या देशमुख यांनी ९ फेऱ्यांममध्ये ७ विजय आणि २ डावात बरोबरी यांच्यासह एकूण ८ गुण मिळवत राष्ट्रीय महिला  वरिष्ठ गटात विजेतेपदाचा मान मिळवला . त्या या स्पर्धेत अपराजित राहिल्या हे विशेष.  या विजेतेपदामुळे १७ वर्षीय वूमेन ग्रँडमास्टर असलेल्या   दिव्या देशमुख यांनी गेल्या वीस वर्षातील सर्वात तरुण राष्ट्रीय महिला विजेती होण्याची कामगिरी केली आहे यावेळी त्यांनी आपल्या फिडे गुणांकन २५ ने वाढवले सुद्धा . तसेच आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक रक्कमेचे रोख बक्षीस...

या बदलांना आपण तयार आहोत का ?

इमेज
             "आमच्या प्रदेशात गेल्या १ हजार वर्षात अशा मुसळधार पाऊस झालेला नाही " हे विधान आचार्य अत्र्यांनी यांनी  कोणत्या लेखनात केलेले  भाषणात केलेले  विधान नाही  हे विधान केले आहे ऑस्ट्रेलिया या देशातील क्यिन्सलँड आणि न्यू साऊथ वेल्स या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी . २२ फेब्रुवारीपासून  ऑस्ट्रेलिया देशाच्या पूर्व किनाऱ्यावर अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे तेथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे हा मजकूर लिहीत असताना ब्रिसबेन नदीच्या खोऱ्यातून सुमारे ६७ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहे आतापर्यंत ९ जणांचा यात मृत्य झाला आहे  अनेक भागांचा संपर्क तुटलाय काही भाग अंधारात बुडालाय . . आता मुसळधार पाऊस म्हंटल्यावर हे होणारच आपल्याकडे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागते तसेच किमान  पानास जणांचा मृत्यू होतो काही भागांचा विद्युत पुरवठा देखील खंडित होत होतो  त्या पार्श्वभूमीवर ९ मृत्यू आणि ६७ हजार लोक विस्थापित होणे आणि काही  भागाचा विद्युत  आणि डाळं वळणाचा संपर्क तुटणे सं ...

दुराग्रह नको.... आग्रह ठीक....!

इमेज
                               जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा देताना एका मराठी अभिनेत्रीने काहीसी अयोग्य वाटावी, असी भाषा वापरली,आणि एका नव्या वादाला तोंड फुटले.ष च्या ऐवजी श वापरणारे किंवा उलटेही वापरणारे तसेच ण आणि न यात गल्लत करणाऱ्यांसह सर्वांना मराठी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असी काहीसा दिनाच्या औचित्याला साजेशी नसणारी टिपण्णी त्या अभिनेत्रीने केली.                   बोलीभाषेत त्या त्या प्रदेशातील जीवनाचे प्रतिनिधित्व दिसत असते.प्रदेशनिहाय परीस्थिती बदलत असल्याने, बोलीभाषा देखील बदलते, अस्या वेळी सर्व प्रदेश्यातील लोकांना समजेल असी भाषा निर्माण करण्यास कोणाचीही हरकत नसावी. मात्र या प्रमाण भाषेचा दुराग्रह करत, बोली भाषांना कचऱ्याची कुंडी दाखवली जाते, तेव्हा मोठा प्रश्न निर्माण होतो, जो त्या अभिनेत्रीच्या टिपण्णीमुळे निर्माण झाला आहे.                व्यक्ती आपण त्याचा मातृभाषेत  सहजतेने व्यक्त होतो असे म्हणतो, तेव...

महाराष्ट्रातील रेल्वे झपाट्याने बदलाचा मार्गावर !

इमेज
       जगात विस्ताराच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर असणारी , सर्वाधिक कर्मचारी असणारा जगातील पहिल्या क्रमांकाच्या सार्वजनिक उद्योग पूर्णतः आपली भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल इतक्या मोठ्या वेगाने बदलतीये . त्याचाच एका भाग म्हणून भारताच्या आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून ओळखला जाणाऱ्या महाराष्ट्रातील रेल्वे सुद्धा झपाट्याने कात टाकत आहे भारतात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या या बदलांमध्ये नॅरोगेज आणि मीटरगेजच्या रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज या रेल्वेमार्गात रूपांतर करणे डिझेलवर चालणाऱ्या रेल्वेमार्गाचे विद्यतीकरण करणे आदी कामाचा समावेश करावाच लागेल   आपल्या महाराष्ट्रातील अकोला ते खांडवा या बहुचर्चित रेल्वेमार्गाच्या गेज परिवर्तनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या या मार्गाचे जज बदलायचे काम खूपच आधी सुरु झाले होते मात्र हा मार्ग वनक्षेत्रातून जात असल्याने आणि गेज परिवर्तनासाठी लागणाऱ्या अधिकच्या जमिनीचे हस्तांतर करण्यास वन खात्याने लाल सिगनला दिल्याने या मार्गाचे काम रखडले होते मात्र अखेर आठवड्यापूर्वी वन खात्याने या बाबतच्या जमीन हस्तानं...

भारतीय रेल्वेची गगग भरारी

इमेज
    भारतातील दुर्गम, अविक प्रदेश रेल्वेच्या नकाश्यावर आणण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.ज्यामध्ये इशान्य भारत आणि जम्मू काश्मीरचा अधिकाधीक भाग रेल्वेने देशातील इतर भागाशी जोडणाऱ्या विकाम कामांचा उल्लेख करावाच लागेल. इशान्य भारतातील राज्यांची किमान राजधानी तरी रेल्वेच्या नकाश्यावर यावी, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये जास्तीत जास्त आतपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे रेल्वेचे प्रयत्न आहेत.   जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक  या नावाने रेल्वेचे जाळे विस्तारण्याचा प्रकल्प सुरु आहे. हा प्रकल्प यु .एस बि. आर.एल. या नावाने प्रसिद्ध आहे.रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प परीचित आहे.हा  रेल्वेप्रकल्प 2003च्या आधीपासूनच सुरु आहे. नुकतीच या रेल्वे मार्गातील मोठा माईल स्टोन गाठण्यात आला. या प्रकल्पातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा तयार करण्यास रेल्वे अभियंत्रांना यश मिळाले. तब्बल 12 हजार 700 मीटर लांबीचा हा बोगदा संबल ते अरीहनचरा या दरम्यान आहे. या बोगद्याची ए...