पोस्ट्स

कधी येणार आपल्या अजेंड्यावर हवामान बदल?

इमेज
             सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर रशिया युक्रेन युद्धाबाबतचे अत्यंत हास्यास्पद वाटाव्या अश्या बातम्या किंवा विविध  राजकीय नेत्यांचे एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप  आणि पाच राज्यातील निवडणुकीच्या बाबत असणाऱ्या बातम्यांचा महापूर आपल्याकडे आणत असताना आपल्या महाराष्ट्रातील एक खूप मोठा भूभाग बेमोसमी पावसामुळे त्रस्त झालेला आहे  आणि हा भूभाग या २०२२ या वर्षीच बेमोसमी पावसाने त्रासलेला आहे असे नाही गेल्या काही वर्षाच्या इतिहास बघितला तर आपणास महाराष्ट्रात अनेकदा बेमोसमी पाऊस पडत असल्याचे समोर आले आहे .नारद भगवान विष्णूंना विचारताय .भगवान हे काय ? त्यावेसेस नारद मार्च एंडिंग आहे हिशोब पूर्ण करायला लागणारच ना ?असे उत्तर भगवान  विष्णू नारदांना देत आहेत  किंवा स्वेटर घालू कि रेनकोट?  असा प्रश्न मला पडलाय हिवाळा अधिक पावसाळा बरोबर हिवासाळा हा ऋतू असे अनेक व्यगंचित्र कोट्या आपण समाज  माध्यमांमध्ये अनेक वर्षांपासून करत आलेलो आहोत . मात्र तरीही समाजाच्या अजेंडयावर हवामान बदल हा विषय दिसत नाहीये . नाही म्हणायला काही प...

आगीतून फुफाट्यात श्रीलंका

इमेज
            जेव्हा एखाद्यवर एकामागून एक  अशी अनेक संकटे येण्यास सुरवात होते तेव्हा त्याची अवस्था  आगीतून फुफाट्यात पडण्यासारखी झाली आहे असे आपण म्हणतो .सध्या श्रीलंकेची अवस्था देखील काहीशी अशीच झाली आहे श्रीलंकेचे आर्थिक संकट दिवसोंदिवस अधिकच गंभीर होत असल्याने  श्रीलंका सध्या  आगीतून फुफाट्यात पडण्याचा अनुभव घेत आहे मार्चच्या सुरवातीपासून  श्रीलंकन सरकारने संपूर्ण देशात साडेसात तास हो साडेसात तासाचे लोडशेडिंग सुरु केले आहे सध्या श्रीलंकेत प्रचंड उन्हाळा असल्याने जलविद्युत बंद आहे . नैसर्गिक इंधने खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने नैसर्गिक इंधनाचे कंटनेर श्रीलंकन बंदरात उभे आहेत मात्र पैसे न दिल्याने कंटनेरमधील नैसर्गिक इंधने श्रीलंकेला वापरता येत नाहीये . परिणामी गेल्या २६ वर्षात झाले नाही असे ऊर्जा संकट श्रीलंकेत निर्माण झाले आहे तेथील नागरिक पेट्रोल पंपावर आता तरी पेट्रोल डिझेल मिळेल या आशेवर तासनतास आपली वाहने उभी करून बसले आहेत . तेथील मासेमारी नौकांना डिझेल मिळत नसल्याने श्रीलंकेतील मच्छव्यवसाय जवळपास ठप्प झाला आहे जो ...

महिला बुद्धिबळपटूची गरुडझेप

इमेज
          सध्या सर्व भारतीय युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय नागरिक भारतात सुरक्षितपणे कशे परत येतील याच्या चिंतेत असताना  मन प्रसन्न करणारी बातमी भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रातून येत आहे नुकत्याच भुवनेश्वर येथे झालेल्या ४७ व्या  राष्ट्रीय महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय प्रियंका नुटक्की या आंध्र प्रदेशातील बुद्धिबळपटूने महिला ग्रँडमास्टर हा 'किताब मिळवला, हीच ती आनंदाची बातमी प्रियंका नुटक्की भारताच्या २३ व्य महिला ग्रँडमास्टर आहेत याचा काही महिने आधीच नागपूरच्या दिव्या देशमुख या भारताच्या २२  व्या महिला ग्रँडमास्टर झाल्या होत्या (  भुवनेश्वर येथे झालेल्या  राष्ट्रीय महिला खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद त्यांनीच मिळवले आहे ) काही महिन्याच्या अंतराने भारताला दोन महिला ग्रँडमास्टर मिळाल्याने भारताच्या  बुद्धिबळ क्षेत्रात महिला देखील आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांना सर्वच क्षेत्रात अधिक समस्येला तोंड द्यावे लागते त्यापासून बुद्धिबळ क्षेत्र देखील सुटलेले नाही त्याच पार्श्वभूमीवर हे यश जोखायला हवे...

यशापशाचा हिंदोळक्यावर विदित गुजराथी

इमेज
           सध्या आपल्या भारतात सर्वत्र पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याबाबत चर्चा सुरु ,असताना,  समस्त बुद्धिबळ रसिकांचे लक्ष बेलग्रेड या शहरात होणाऱ्या  या वर्षातील दुसऱ्या ग्रांपी स्पर्धेचा आंनद लुटत आहे भारताचे प्रतिनिधीत्व नाशिकचे तरुणाचे आयकॉन भारताच्या बुद्धिबळ संघाचे कप्तान भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि  पेन्टला हरिकृष्णन हे करत आहे फिडे नियमानुसार २०२२ या वर्षी होणाऱ्या तीन पैकी कोणत्याही दोन  ग्रांपी स्पर्धेत बुद्धिबळ खेळाडू सहभागी होऊ शकतात . आतापर्यंत एक ग्रांपी स्पर्धा झालेली आहे तर दुसरी ग्रांपी स्पर्धा सध्या सुरु आहे . या स्पर्धेला २८ फेब्रुवारी  दिमाखदार सुरुवात झाली   प्रत्यक्ष खेळाला  १ मार्च रोजी सुरु झाले या स्पर्धेतील साखळी सामने ७  मार्चपर्यंत होणार आहेत  ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूं पहिल्या ग्रांपी प्रमाणेच आपल्या गटातील उर्वरित तीन खेळाडूंशी प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत ज्यामध्ये प्रत्येक खेळाडूंचे एका वेळी पांढऱ्या मो...

भारतीय रेल्वेची गरुडझेप

इमेज
               शुक्रवारी भारतीय रेल्वेने एक फार  मोठी गरुडझेप गाठली .  विस्ताराबाबत जगातील चौथ्या क्रमांकाची  आणि कर्मचाऱ्यांबाबत जगातील पहिल्या क्रमांकाचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या,  आपल्या भारतीय रेल्वचा  कलंक असलेल्या, अपघाताला सोडचिठ्ठी  देण्याचा,  प्रयत्न गेल्या काही  वर्षांपासून केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या अंतर्गत एकाच रेल्वेरुळावर समोरासमोर येणाऱ्या, रेल्वे इंजिनाची टक्कर होवून अपघात होवू नये, यासाठी कवच या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या, रेल्वे प्रणालीची शुक्रवारी  यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता रेल्वेच्या   रेल्वेमार्गावर ही प्रणाली बसवण्यात येईल. अनेक देशांंमध्ये या सारखी प्रणाली या आधीच कार्यान्वित असली तरी, त्यासाठी प्रतीकिमी 2कोटी रुपये खर्च होतो.तर भारतीय रेल्वेत आगामी काळात वापरली जाणाऱ्या कवच या प्रणालीस या खर्च्याचा 25% म्हणजेच फक्त 50लाख रुपये खर्च होणार आहे. म्हणजेच पाश्चात्य देशात एक किमीसाठी लागणाऱ्या खर्चात भारतात चार किमीसाठी ही सुरक्षा प्रणाली वापरली जावू शकत...

कथा न झालेल्या तिसऱ्या महायुद्धाची

इमेज
             सध्या भारतीय वृत्तवाहिन्या रशिया आणि युक्रेन  यांच्यातील युद्धाचे वर्णन तिसरे महायुद्ध म्हणून करत असले तरी,  याच्यापेक्षा गंभीर परीस्थिती एकदा उदभवली होती .ज्यावेळी खरोखरीच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते .  ज्याला जगाच्या इतिहासात क्युबन  क्रायसिस म्हणून ओळखले जाते . या क्युबन    क्रायसिस मध्ये सहभागी असणाऱ्या तीन पैकी दोन देशांकडे घातक अण्वस्त्र होती . फक्त एका कळ  दाबायचा अवकाश,  एकमेकांवर अण्वस्त्रे गेलीच म्हणून समजा,  अशी त्यावेळी स्थिती होती मात्र त्यावेळी जगाच्या महासत्तेच्या प्रमुखांनी ही स्थिती शांततापूर्वक हाताळली, आणि जग तिसऱ्या महायुद्धापासून दूर गेले . सध्याचे रशिया युक्रेन युद्ध त्यावेळच्या  क्युबन  क्रायसिसच्या तुलनेत काहीच नाही.  सध्याच्या रशिया युक्रेन युद्धात एकाच गट लष्करीदृष्ट्या प्रबळ आहे , ,तर दुसरा गट अन्य देशांच्या मदतीने दुसऱ्या गटाशी लढायचा प्रयत्न करत आहे . त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता या वेळी खूपच कमी प्रमाणात आहे मात्र तशी...

अखेर नकारघंटाच

इमेज
            मागील वर्षी २८ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु असणारा महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर कर्मचाऱ्यांना नकारघंटाच बघावी लागली . राज्याचे मुख सचिव ,अर्थ सचिव आणि परिवहन सचिव या तिघांनी १२ आठवड्याच्या अवधीत केलेल्या अहवालात एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याविषयी प्रतिकूलताच दाखवली आहे   हा लेख लिहीत असताना या अहवालवाला मुख्यमंत्र्यांनी संमती दाखवण्याची औपचारिकताच बाकी आहे.  तुम्ही जेव्हा हा लेख वाचत असला तेव्हा कदाचित तीही पूर्ण झालेली असेल  .संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही एसटीचे राज्ज्य शासनात पूर्णतः विलीनीकरण करावे ही होती त्याच मागणीस या अहवालात मनाई करण्यात आली आहे . या मागणीखेरीज त्यांच्या पगारवाढीची मागणी या आधीच  मान्य करण्यात आली होती                  या संपात एसटी कर्मचाऱ्याच्या अधिकृत मान्यताप्राप्त कामगार संघटनेस न्यायालयाने अनधिकृत ठरवणे इतर अधिकृत म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांनी आंदोलनात  माघार घेतल्यावर त्या संघटनांच्या नेत्यांना बाजूला सारत कर्...