पोस्ट्स

भारताचा जगात डंका

इमेज
                 भारत आगामी काळात महासत्ता होणार आहे हे आता सर्वसुत्र आहे . मार्चच्या शेवटच्या पंधरा दिवसात आलेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवाड्यत नवी दिल्लीत येणाऱ्या  विविध देशांचे राष्ट्रप्रमुख याचीच साक्ष देत आहेत . मार्चच्या शेवटच्या पंधरा दिवसात जपान चे पंतप्रधान हे दोन दिवशीय भारत दौऱ्यावर  आले होते त्यानंतर  पूर्वनियोजित दौरा नसताना चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नवी दिल्लीची धूळ झाडली दरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधान यांनी ऑनलाईन संपर्क साधत भारताला अनुकूल असे अनेक करार केले . मार्चच्या शेवटच्या दोन दिवसात मेक्सिको देशाचे परराष्ट्र मंत्री आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या आमंत्रणावरून भारत देशाच्या  भेटीवर येत आहे . १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान नेपाळ आणि इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येत आहेत इस्राईलच्या पंतप्रधांनांन कोव्हीड १९ ची लागण झाल्यामुळे त्यांच्या दौरा सध्या अनिश्चित आहे हे कमी की काय म्हणून ! आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे २६ मार्च आणि २७ मार्च या दरम्यान मालदीवच्या आणि २८ , २९ ,३०...

तणाव सहन करण्याची कला (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ 3)

इमेज
         तणावाबद्दल आपण मागील लेखात काही गोष्टी बघितल्या . या लेखात त्याबाबद्दल अधिक खोलात विस्ताराने चर्चा करूया. खेळातील टॅन तणाव कश्या प्रकारे हाताळायचा या बाबाबत आपण दिग्गज खेळाडूंची मते विचारात घेतल्यास आपणास सहजतेने खेळता येईल तणाव राहणार नाही . खेळातील तणावावर विश्वनाथन आंनद यांनी दिलेला सल्ला फारच मोलाचा आहे कार्लसन विरुद्धच्या डावात पत्रकारांनी आनंद यांना विचारले ,पुढील डाव जिंकल्यास आपला आत्मविश्वास वाढून आपण स्पर्धा जिंकाल का ? या प्रशांवर आनंद शांत राहिला काहीच बोलला नाही . दुसऱ्या पत्रकाराने आनंदला विचारले आपल्या जवळ काही योजना आहे का ? ज्यामुळे आपण आणि कार्लसन यांच्यातील गुणाचा फरक भरून निघेल याही वेल्स आनंद शांत राहिला तिसऱ्या पत्रकाराने विचारले आजची स्पर्धा मागच्या स्पर्धेच्या तुलनेत वेगळी आहे का ? या तिन्ही प्रश्नासाठी आंनद याने फारच समर्पक उत्तर दिले "मी एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष देतो'  . थोडक्यात आपण देखील एकाचवेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास  इतर विचार मनात  न आणल्यास आपले मन विचलित होणार नाही आणि आपण चांगला रिझल...

या धोक्याकडे कधी बघणार आपण?

इमेज
       मंगळवारी 29 मार्चला शैक्षणिक ताणतणावातून नाशिकच्या म्हसरुळ या उपनगरात एका तरुणीने आत्महत्या करुन जीवन संपवले. गेल्या काही दिवसातील वर्तमानपत्रे बघीतली, तर अस्या घटना सातत्याने घडतांना दिसतात. त्यातीलच एक अजून वाढीव घटना म्हणून याकडे बघता येणे अशक्य आहे. ज्या तरुणाइच्या जोरावर आपण महासत्तेचे स्वप्न बघत आहोत, ते सध्या कोणत्या मानसिक स्थितीत आहे, याची  लिटमस्ट टेस्ट म्हणूनच या घटनांकडे बघायला हवे. आपल्याकडे मानसिक आरोग्याबाबत असलेली अपुरी जाणीव या आत्महत्या होण्यास मुख्यतः कारणीभूत ठरतात. मानसिक आजार म्हणजे स्किझोफेनियाच, असी लोकांचा समाज असतो.मानसिक आजार हे विविध असतात , त्यापैकी एक म्हणजे स्किझोफेनिया, याची त्यांना माहितीच नसते.तसेच जर एखादा मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत आहे, हे समजले की, त्याचा बाबत विविध गैरसमज पसरवणे, आदी गोष्टींमुळे लोक अनेकदा गरज असताना सुद्धा मानसोपचार तज्ज्ञांकडे जात नाहीत. अर्थात पुर्वी होते, तितके सध्याचे चित्र वाइट नाही. आता अनेकजण मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारासाठी जात आहेत.जे स्वागतार्ह आहे,मात्र अजूनही हे प्रमाण कमीच आहे. ज्या...

जागतिक राजकारणातील महत्त्वाचा देश भारत

इमेज
         येणारा काळ हा भारताचा असेल असे  म्हटल्यास वावगे ठरू नये अश्या घडामोडी सध्या  घडत असलेल्या भारताच्या संदर्भातील  परराष्ट्रीय  घडामोडी बघितल्यास सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपानचे पंतप्रधान दोन दिवशीय भारत दौऱयावर आले   . चीनचे परराष्ट्र मंत्री देखील त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांनी भारताला भेट दिली . ऑस्टेलिया या देशाच्या पंतप्रधानांनी ऑनलाईन परिषदेत उपस्थित राहताना भारताला अनुकूल असे अनेक करार केले . तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या तीन दिवसाच्या दौऱयावर येणार आहेत हे कमी काय म्हणून इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या दौऱयावर असताना नेपाळचे पंतप्रधान देऊबा देखील यावेळी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱयावर असणार आहेत  नेपाळचे पंतप्रधान १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान भारताच्या भेटीवर असतील याच दरम्यान २६ मार्च ते ३० मार्च या दरम्यान मालदीव आणि श्रीलंका देशाच्या परराष्ट्र खात्याच्या आमांत्रणवरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीव या देशाच्या...

बारक्या डोळ्याचा न बोलवता आलेला भारताचा पाहुणा

इमेज
                गेल्या शुक्रवारी २५ मार्चला एका बारक्या डोळ्याच्या न बोलवता आलेल्या एका परदेशी पाहुण्याने भारताच्या परराष्ट्र खात्यांचा पाहुणचारचा आस्वाद घेतला .चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीझ हे त्या पाहुण्याचे नाव . पाकिस्तानच्या राजधानीत अर्थात इस्लामाबाद येथे मंगळवार आणि बुधवार रोजी झालेल्या, ऑर्गनाझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीझ  येथे आमंत्रित सदस्य म्हणून हजेरी लावल्यावर बीजिंगला जात असताना त्यांनी नवी दिल्लीत हजेरी लावली . पाकिस्तानमधून नवी दिल्लीत येत असताना त्यांची काही मिनिटे अफगाणिस्तानला देखील भेट दिली नवी दिल्लीत आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल यांच्याबरोबर चर्चा करून ते  नेपाळ या देशाच्या सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी काठमांडू येथे निघून गेले . चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीझ यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर देखील चर्चा करण्याची इच्छा होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे ती होऊ शकली आंही परराष्ट्र खात्याच्या अंदाजानुसार चीनचे परराष्ट्र मंत्री ...

हे भविष्य खरे ना ठरो

इमेज
             आपल्यापैकी अनेकांना विविध माध्यमामध्ये येणारे आपले राशी भविष्य जाणण्याची इच्छुकता असते . आपल्या राशीचे अनेक लोक आहेत सर्वांचे भविष्य सारखे असणार नाही याची माहिती असून  देखील वृत्तपत्रातील सर्वाधिक वाचला जाणारा हा भाग होय . वृत्तपत्रातील भविष्य कितपत खरे ठरते ? याबाबत अनिश्चतता असली  त्यातील बहुतांशी गोष्टी रोजच्या आयुष्यात घडत नसल्या  तरी  वर्तमानत्रातील सर्वाधिक लोकप्रिय भाग म्हणजे राशिभविष्य .  मात्र  हवामान तज्ज्ञांनी दुर्दैवाने हे भविष्य खरे ना ठरो असे वाटावे,  असे भविष्य नुकतेच वर्तवले आहे .  हे भविष्य आहे,  बदलत्या हवामानामुळे,  येत्या काही वर्षात आफ्रिका खंडातील सुमारे ६० % आणि एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी ३३ % लोकसंख्या बदलत्या हवामानामुळे प्रभावित होऊ शकते , हे           आजदेखील  आपल्या भारताचा ऊत्तर भाग आणि महाराष्ट्र अत्यंत भयानक अश्या उष्णलहरींचा सामना करत आहे.  अनेक ठिकाणी वातावरण ४० अंश सेल्सियस च्या जवळपास नोंदवल...

महाराष्ट्र एसटी कर्मचारी आता तरी कामावर या !

इमेज
             गेल्या सव्वाचार महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबतच्या त्रिसदस्यीय अहवालाला अखेर मंत्रिमंडळाने संमती दिली . ज्यामध्ये एसटीचे राज्यशासनात पूर्णतः विलीनीकरण होणे अशक्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . आता तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापुढे अर्थात विधानसभा आणि विधान परिषदेपुढे ठेवण्यात येईल . या आधीच्या इतिहासाप्रमाणे विरोधी पक्षाकडून त्यास विरोध होईल . विद्यमान सरकारला एसटीचे खासगीकरण करायचे आहे , म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत नकारात्मक अहवाल तयार केला असा आरोप होईल  .आमच्या सरकारने एसटीच्या हितासाठी घेतलेले निर्णय विद्यमान सरकाने कसे रद्द केले ज्यामुळे एसटीचे कसे नुकसान झाले याबाबत मोठ्या प्रमाणत रन उडवले जाईल . त्याला भुलून मूळ आंदोलनाचे नेर्तृत्व करणारे नेते संपातून बाहेर पडल्यावर आंदोलन अक्षरशः ताब्यात घेणाऱ्या नवनेतृत्वाखाली आम्ही आमचे आंदोलन अधिक प्रखर करू अश्या घोषणा एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतील . आणि ते काहीसे भरकटले जे लक्ष्य कधीच हाती लागणार नाही अश्या गोष्टीच्या ...