पोस्ट्स

अखेर शिकामोर्तब

इमेज
          गेली पाच महिने सुरु असलेल्या, एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत अखेर उच्च न्यायालयाचा निकाल आला. न्यायालयाने विलीनीकरणाबाबत निर्णय घेण्याचे, पुर्ण अधिकार राज्य सरकारला असल्याचे, सांगत विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी फेटाळली. तसेच 15एप्रिलपर्यत कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे निर्देश दिले. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करावा,असी न्यायालयाची भुमिका कधीच नव्हती.असेही आपल्या निरीक्षण न्यायालयाने आपल्या निकालपत्रात नोंदवले           एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही करु नये,  ज्यांना बडतर्फ , निलंबित केले आहे, त्यांना पुन्हा सेवेत घ्या,  असी देखील सुचना न्यायालयाने एसटी प्रशासनास केली.कर्मचाऱ्यांना एक संधी देण्याची गरज न्यायालयाने आपल्या निकालपत्रात व्यक्त केली. हिंसा किंवा दंगलसद्रुष्य परीस्थिती निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत महामंडळाची भुमिका काय ?याबाबत आपले म्हणणे 7एप्रिलला सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.संपकरी लोकांच्या मते त्यांच्या कोणत्याही व्यक्तीने हिंसा केलेली नाही. राज्य सरकार चार वर्षे मह...

आवाज आवडे दक्षिण आशियातील लोकांना

इमेज
        काल  भारतातील खासगी मालकीची आंतरराष्ट्रीय बातम्या भारतीय उच्चाराच्या इंग्रजीत देणारी, wion news ही वृत्तवाहिनी बघत होतो. या वृत्तवाहिनीवर अनेक उत्तम इतर वृत्तवाहिन्यावर क्वचितच हातळतील अस्या विषयाचा बातम्या असतात.जसे मानसिक अनारोग्य, हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर होणारा परीणाम , तसेच विविध किनारी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना समोरे  जावे लागणाऱ्या समस्या, बँटरीच्या विल्हेवाट लावणाऱ्या गुजरातच्या किनाऱ्यावरील लोकांची स्थिती, वगैरे. मी टिव्ही बघत असताना  ध्वनी प्रदुषणाबाबत माहिती देणारा कार्यक्रम त्यावर लागला होता.           या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे जगात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण बांगलादेशाची राजधानी ढाका या शहरात होते. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद हे शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद तर चौथा क्रमांक बांगलादेशातील राजशाही या शहराने पटकावला आहे.ज्यामुळे दक्षिण भारतीय लोकांना गोंगाट आवडतो हे सिद्ध होत आहे.  या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे ढाका शहरात अनेक कारणांमुळे ध्वनीप्...

तूच आहे तूझा मारेकरी

इमेज
              नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार जगात ज्यात भारत देखील आला, त्यात खुनापेक्षा जास्त लोकांचे मृत्यू हे आत्महत्येमुळे होत आहे. जगात मेलेल्या व्यक्तींच्या कारणांची क्रमवारी बघीतल्यास त्यास आत्महत्याचा क्रमांक बराच वरचा आहे. भारतासह जगभरातील स्थिती किती धोकादायक आहे? याची ही लिटमस्ट टेस्टच म्हणायला हवी, खुन हा दुसऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतो.मात्र आत्महत्या हा स्वतः चाच हाताने स्वतःचा केलेला विनाश असतो.त्याची संख्या जास्त दिसून येणे समाजाच्या अनारोग्याचेच स्पष्ट लक्षण आहे.              माणसे विविध कारणांनी आत्महत्या करतात,ज्यामध्ये  एखादा असाध्य विकार, कौंटुबिक ताणतणाव, व्यसनाधिनता, आर्थिक परीस्थिती खालवणे,जवळच्या व्यक्तींकडून होणारी भावनिक फसवणूक आदि कारणांचा समावेश करावाच लागेल.कारण काहीही असले तरी , त्यांची संख्या चिंताजनक आहे, याबाबत कोणालाही संशय नसावा            वाढती गळेकापू स्पर्धा,व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक करत त्याचे स्वैराचारात...

अस्वस्थ अशांत शेजार !

इमेज
          आजमितीस  एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या शेजारी अशांतच अशांतता पसरलेली दिसत आहे भारताच्या पश्चिमेकडील पाकिस्तानात असणारी राजकीय अस्थिरता ,दक्षिण पश्चिम दिशेकडील मालदीवमधील विरोधी पक्षाने सुरु असणारे भारतविरोधी आंदोलन त्यास मिळत असणारा पाठिंबा, ,  दक्षिणेकडील श्रीलंकेची आर्थिक विपन्नता , पूर्वेकडील बांगलादेशात होणारे अल्पसंख्याकावरचे हल्ले , दक्षिण पूर्व ठिकाणी असणाऱ्या म्यानमारमध्ये असणाऱ्या लष्करी राजवटीचा चीनकडे असणारा काहीसा कल ,उत्तरेकडील बाजूचा विचार करता नेपाळमधील राजकारणामध्ये काही वेळा उमटणारा भारतविरोधी सूर,  उत्तर पश्चिम दिशेला असणाऱ्या अफगाणिस्तानमधील तालिबानी राजवट .भारताच्या बरोबर सीमा असणाऱ्या देशांच्या विचार करता भूतानआणि चीन  वगळता अन्य कोणताही देश शांत नाहीये चीन आपला प्रमुख शत्रूं आहे जो विविध प्रकारे आपल्यला त्रास देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो, भूतानचा स्वतःचा जीव अत्यंत कमी आहे त्यामुळे भारताला त्याची मदत होण्याची शक्यता कमीच आहे थोडक्यता भारताच्या आसपास अशांतताच मोठ्या प्रमाणत आहे .    ...

लंकेचे पुन्हा दहन

इमेज
       रामायणात भगवान हनुमानाने लंका जाळल्याचा उल्लेख आहे. श्रीलंकेला भेट देणारे पर्यटक या जळलेल्या श्रीलंकेचे अवशेष देखील बघतात. श्रीलंकेस भेट देणाऱ्या पर्यटकांना अशोकवाटीकेचे अवशेष देखील दाखवतात.रावणाची ही लंका जाळण्यात आली,त्रेतायुगात .सध्या कलीयुग सुरु आहे. मात्र आज  2022 मध्ये सुद्धा श्रीलंका जळत आहे.दुसऱ्यांंदा श्रीलंका जाळण्यासाठी बाहेरुन कोणी आलेले नाही. श्रीलंकेचे स्वतःचे लोक श्रीलंका जाळत आहे. श्रीलंकन सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे आलेल्या आर्थिक विपन्नतेच्या त्रागातून श्रीलंकेतील नागरीक स्वतः च्याच देश जाळत आहे.  रम्य ही स्वर्गाहुन लंका असे एकेकाळी म्हटले जाणारी श्रीलंका आज खरोखरीच लंकेची पार्वती झाली आहे. जे तेथून येणाऱ्या बातमीतून दिसत आहे.  श्रीलंकेची राजधानी कोलोंबोत सरकारविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलकांनी हिंसक स्वरूप घेतले आहे. 31मार्चला कोलोंबोतील नागरीकांनी राष्ट्राध्यक्षांचा खासगी घरात घुसण्याचा प्रयत्न केला .ज्यामुळे सुरक्षा रक्षक आणि नागरीकांमध्ये दंगा झाला,ज्यात 2 जण गंभीर झखमी झाले.संतप्त नागरीकांनी सुरक्षा रक्षकांंचा दोन बसेस, एक...

पूर्वांचमधील सुखावणारे बदल

इमेज
  आपल्या मराठी बातम्यांचा विचार करता,  अनेकदा  भारतातीलच असून देखील,  अनेकदा ज्या भागातील बातम्यां फारश्या चर्चेला जात नाहीतर असा भूभाग म्हणजे ईशान्य भारत अर्थांत पूर्वांचल भारताच्या अति पूर्वेकडील ही आठ राज्ये  (सिक्कीम च्या समावेशासह ) अनेकदा दुर्लक्षित रहातात .तेथील समाजजीवन , तेथील राजकीय आर्थिक प्रश्न , त्यांची ऐतिहासिक परिस्थिती याबाबत आपल्यापैकी अनेकांना अत्यंत तुरळक माहिती असते देशाच्या सरंक्षणचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या भूभागात गेल्या आठवड्यात दोन मोठ्या गोष्टी घडल्या . समर्थ रामदास स्वामी यांच्या "जेजे आपणाशी थवा ते ते सकळांसी सांगावे सकल जण या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .         तर मित्रानो , सुमारे आठवड्यापूर्वी आसाम आणि मेघालय यांच्या सीमावादाबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले . सन १९७२ च्या आसाम रिओर्गयझेशन ऍक्ट नुसार अस्तित्वात आलेल्या मेघालय या राज्याच्या स्थापनेपासून आसाम राज्याबरोबर सीमा विवाद होता . ज्याचे ७० % निराकारण झाल्याचा दा...

महासत्ता म्हणून भारताचा उदय

इमेज
    महासत्ता म्हणून भारताचा उद्या झाला आहे , हे गेल्या काही दिवसातील परराष्ट्र खात्यासदंभात विविध माध्यमांमध्ये येणाऱ्या घडामोडींकडे बघितल्यास सहजतेने लक्षात येते , गेल्या पंधरा दिवसात भारतात प्रत्यक्ष येणाऱ्या   तसेच ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणारे आणि येत्या काही दिवसात भारतात येणारे ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणाऱ्या परदेशी नेत्यांचा नावाकडे , शिष्टमंडळाकडे नजर टाकल्यास   आपणस ही गोष्ट सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपान , मेक्सिको , दक्षिण कोरिया , नेपाळ , इस्राईल , युके , चीन रशिया   ऑस्ट्रेलिया आदी जगाच्या सर्व कानाकोपऱयातील   देशांचे नेते शिष्टमंडळ यांनी   भारतात प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने भारताशी संपर्क साधत . भारताशी अनेक करार केले तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंका आणि मालदीव या दोन देशांचे दौरे केले तर भारताचे राष्ट्रपती येत्या काही दिवसात तुर्कमेनिस्तान आणि नेदरलँड या देशांचा दौऱयावर जाणार आहेत . भारत मह...