पोस्ट्स

भारताचा अश्व वेगाने दौडताना

इमेज
             येणारे शतक भारताचे असेल असे विधान मागील शतकाच्या शेवटी अनेक मोठ्या धुरिणींनी केले होते चालू शतकाच्या साधारणतः एक चतुर्थांश भाग सरत असताना या विधानाचा अनुभव येत आहे . मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी , डेन्मार्क , आणि फ्रांस या देशात केलेले दौरे त्याचीच साक्ष देत आहेत .  रशिया आणि युक्रेन युद्धाच्यावेळी स्वहिताचा बळी न देता या युद्धापासून अलिप्तता  राखत पश्चिम युरोपीय देशांना पूर्णतः अनुकूल भूमिका ना घेता आपली स्वतःची वेगळी ठाम भूमिका  घेण्याचा पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे .        फ्रान्समध्ये गेल्याच आठवड्यात २४ एप्रिल रोजी अध्यक्षपदाची निवडणूक झाली ज्यामध्ये  इमॅन्युएल मॅक्रॉन हे सलग  दुसऱ्यांदा  अध्यक्षपदासाठी निवडून आले पुढल्या पंधरवड्यात तेथील केंद्रीय विधिमंडळाच्या (आपल्या लोकसभा समकक्ष ) निवडणुका आहेत फ्रांस मधील आता पर्यंतच्या कल बघता अध्यक्ष ज्या पक्षाचा तोच पक्ष केंद्रीय विधिमंडळात अधिक जागा मिळवतो . फ्रान्समधील या निवडणुकीचा...

हमिद दलवाई तूमच्या कार्याला शतशः नमन

इमेज
 ३ मे १९७७ ही फक्त तारीख नाहीये . आज ४५ वर्षांनंतर सुद्धा अत्यंत कट्टर , रुढीग्रस्त , पंरपरेच्या जोखड्यात अडकलेल्या एका समाजातील एका समाजसुधारकांच्या मृत्यूची तारीख आहे ही , त्या महान समाज सुधारकांचे नाव आहे हमीद दलवाई . कोकणात जन्मलेल्या या समाजसुधारकाने आपल्या उणापुरया ४४ वर्षाच्या आयुष्यात हिमालयापेक्षा मोठे कार्य केले . ते सुद्धा आज २०२२ साली सुद्धा अत्यंत रुढीग्रस्त असणाऱ्या समाजात .आज तो समाज घटक इतका रुढीग्रस्त असेल तर ४५ वर्षांपूर्वी किती रूढिग्रत असेल याची कल्पनाच केलेली बरी  . हमीद दलवाई ज्या  समाज घटकाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाज घटकात   अत्यंत मोजके शब्दशः हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच समाज सुधारक झाले त्यातील एक महत्तवाचे नाव म्हणजे हमीद दलवाई . त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत महत्तवाचे ठरते  हमीद दलवाई यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश राजवटीत त्या वेळच्या बॉम्बे राज्यात  (आताचा महाराष्ट्र) मिरजोली गावात मराठी भाषिक मुस्लिम कुटुंबात झाला.  त्यांनी माध्यमिक शिक्षण चिपळूण येथे घेतले. 1951 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मु...

भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट

इमेज
  भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट  धावायला लागल्याचे स्पष्ट करणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . आपल्या वृत्त माध्यमांमध्ये सध्या राजकीय बातम्यांचा भडीमार सुरु असल्याने या देशाच्या प्रगतीच्या बातम्या काहिस्या मागे पडल्या , त्यांच्या हा अनुशेष भरून काढण्यासाठी या दोन घटनांची माहिती देण्यासाठी आजचे लेखन  तर भारतीय रेल्वच्या उत्पनाचा वाट्याच्या विचार करता प्रवाशी भाड्यापेक्षा अधिक उत्पन्न भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून मिळते मात्र धावणाऱ्या रेल्वचा विचार करता मालवाहतुकीच्या गाड्यांपेक्षा प्रवाशी गाडयांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याने  अनेक उद्योजक स्वस्त असणारा आणि रस्त्यावरील वाहतुकीचा ताण  कमी (पर्ययाने रस्त्यावरील अपघातांची संख्या सुद्धा कमी )करणाऱया रेल्वे मालवाहतुकीच्या पर्याय सोडून प्रदूषण करणाऱ्यारस्तेमाभारतीय र्गावरील मालवाहतुकीचा पर्याय स्वीकारताना दिसतात . ज्याचा परिणामस्वरूप रेल्वेचे उत्पन्न कमी होत आहेच तसेच रस्त्यावरून मोठं मोठी कंटनेरची वाहतूक होत असल्याने गंभीर अपघात ...

पाकिस्तानात नक्की चाललंय तरी काय?

इमेज
       पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरातील विद्यापीठ परीसरात बलूचीस्तान लिबरेशन आर्मीच्या महिला दहशतवाद्याने नुकताच हल्ला केला.ज्यामध्ये चार चीनी नागरीक ठार झाले. चीनी नागरीकांना लक्ष्य करुन दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण चीनमध्ये प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.त्याच हल्ल्याचा मालिकेतील हा हल्ला होता. या हल्ल्याचा आधी आपण मातृभूमीसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असल्याचा व्हिडीओ सदर महिलाने सोशल मिडीयात पोस्ट केला होता.      बलूचीस्तान मधील सर्वसामान्य जनतेला विश्वासात न घेता, चीनी सरकारच्या मदतीने पाकिस्तानी सरकार बलूचीस्तानातील नैसर्गिक इंधनांचे उत्खन करुन पंजाबचा विकास साधला जात आहे ,आणि बलूचीस्तानचे शोषण केले जात आहे,असा आरोप बलूचीस्तानमधील लोकांकडून सातत्याने करण्यात येतो.या शोषणातील चीनचा सहभाग बघून बलूचीस्तानमची राजधानी क्येटा या शहरात पकिस्तानमधील चीन राजदुतावर प्राणघातक हल्ला झाला होता.काळ आला होता ,पण वेळ आली नसल्याने ते यातून थोडक्यात बचावले होते. एका अंदाजानुसार येत्या आगामी  चार वर्षात 50 लाख चीनी नागरीक पाकिस्तानत येण्याची शक्यता आहे. त्...

भारत पाक संबंध नव्या दिशेने ?

इमेज
भारत  आणि पाकिस्तान यांच्या संबंधावर परिणाम करणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . पहिल्या गोष्टीत अमेरिकेचा देखील काहीसा सहभाग आहे . तर दुसरी गोष्ट पूर्णतः भारत पाकिस्तान यांच्याशी संदर्भात आहे पाकिस्तान आपल्या भारताचा शत्रू आहे तसेच पाकिस्तान आपल्या बरोबर मोठी सीमा शेअर करतो त्यामुळे या घडामोडी आपल्यासाठी अत्यंत महतवाच्या ठरतात तर जाणून घेउया त्या घडामोंडीविषयी  तर अमेरिकेत सध्या ज्या पक्षाचे राष्ट्राध्यक्ष आणि उप्राष्ट्राध्यक्ष आहेत त्या डेमोक्रेक्रीक पक्षाच्या सिनेटर (आपल्या खासदरा समकक्ष )  असणाऱ्या इल्हान उमर यांनी नुकत्याच आपल्या पाकिस्तानने अनधिकृतरित्या आपल्या ताब्यात ठेवलेल्या पाकव्याप्त काश्मीर या भागाला भेट दिली त्यावेळी त्यांची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि विद्यमान पंतप्रधान शरीफ यांच्या बरोबर असणारे फोटो प्रसिद्ध करण्यात आले .पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान  अमेरिकेच्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे माझे सरकार उलथवून टाकण्यात आले असा आरोप करत आहेत तो आरोप करून काहीच दिवस होत आंही तोच त्याच पक्षाच्या सिनेटर...

मैत्रीत मिठाचा खडा

इमेज
इतर वेळी कायम पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन आणि पॅलिस्तानच्या मैत्रीत सर्वच काही उत्तम चालू नसल्याचे,  पाकिस्तानचे नवनियुक्त नियोजन मंत्री एहसान इक्काबल यांनी शुक्रवार २२ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे जगासमोर सुमारे सव्वा दोन  वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१९९ मध्ये स्थापित  केलेले  सीपेक प्राधिकरण बरखास्त करण्याचे  बरखास्त करण्याचा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत  आले  आहेत सी पे क अंतर्गत चालणाऱ्या प्रकल्पाला गती मिळावी तसेच त्यांच्यामध्ये चालणाऱ्या विविध प्रकल्पांवर देखरेख करता यावी यासाठी हे प्राधिकरण मागच्या इम्रान खान सरकारच्या कार्यकाळातएका अध्यादेशाद्वारे  स्थापन करण्यात आले होते ते बरखास्त करण्याचा सूचना पाकिस्तानचे नवनियुक्त निययोजन मंत्री   त्यांच्या मते सिपेक मधील विकासकामे अत्यंत संथ गतीने सूर आहेत . कामांवर लक्ष ठेवण्यासाठी हे प्राधिकरण पूर्णतः कुचकामी ठरले आहे हे प्राधिकरण चालवणे म्हणजे संसाधनांवर विना विनाकारण अतिरिक्त ताण निर्माण करणे किंबहुना हे प्राधिकरण यातील कामां...

मार बसल्यावरच जागे होणार का, आपण?

इमेज
       मार बसल्यावरच जागे होणार का, आपण? असे वाटावे, असे भारतीयांचे हवामान बदलाविषयीचे वर्तन असल्याचे वारंवार दिसत आहे. आजमितीस वाढत्या तापमानामुळे मेक्सिको या देशातील सरकारने त्यांचा देशात कामाचे फक्त पाच दिवस करण्याचे ठरवले आहे.दोन दिवस सुट्टी दिल्यामुळे लोक घराबाहेर कमी पडतील ,परीणामी तेथील सामान्य लोक सुर्याचा प्रकोपातुन वाचतील असा मेस्किकन सरकारचा कयास आहे.भौगोलिक क्षेत्राचा विचार करता, आपला भारत आणि मेस्किको हे दोन्ही देश उत्तर गोलार्धात उष्ण कटीबंधात प्रदेशात येतात. उत्तर गोलार्धात आता उन्हाळा सुरु असल्याने वातावरणात उष्मा आहे. तापमान रोज नवनवे उच्चांक स्थापित करत आहे. आपल्या भारतात राजस्थानातील चूरु आणि महाराष्ट्रात चंद्रपूर ही शहरे भयावह तापमान नोंदवत आहे. मात्र आपल्याकडे अजूनही बदलते हवामान हा विषय योग्य त्या गांभिर्याने घेतला जात नाहीये. नाही म्हणायला काही गैर सरकारी संस्था, सरकारचे काही विभाग हवामान बदलाविषयी जनजागृती करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न जगभरात लहरी हवामान दाखवत असणारे प्रताप बघता अत्यंत तोकडे आहेत. मेस्किको ,  आदी लोकसंख्येची घनता आणि एक...