पोस्ट्स

राजकीय साठेमारीत हरवलेले बुद्धिबळातील यश

इमेज
        गेल्या महिनाभरातील  भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक स्तरावर फार मोठे यश मिळवले मात्र त्याची यथोचित दखल राजकीय बातम्या देण्यात मग्न असलेल्या माध्यमांनी घेतली नाही . मराठीतील एक उकृष्ट चित्रपट झेंडा या चित्रपटात  ज्या प्रमाणे चित्रपटाच्या सुरवातीला कार्यालयाच्या प्रसंगात आर्थिक बातम्यांना राजकीय बातम्यांच्या तुलनेत कमी महत्व देण्यात येते याबाबत खंत व्यक्त करण्यात आली होती तोच काहीसा प्रकार या बुद्धिबळपटूनबाबत घडला मात्र "देर आये मगर दुरुस्त आये " , या म्हणीनुसार उशिरा का होईना त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन   बुद्धिबळ स्पर्धा या तीन प्रकारात खेळवण्यात येतात .पारंपरिक प्रकार म्हणजे क्लासिकल ,या प्रकारच्या खेळ हा तीन तास किंवा अधिक चालू शकतो जरी हा खेळ खूप वेळ सुरु असला किती वेळात किती चाली झाल्याचं पाहिजे याचे बंधन आहे जर हे बंधन पाळले न गेल्यास पटावरील स्थिती कितीही विजयासारखी असो खेळाडू डाव हरतो  हा प्रकार काहीसा संथ असल्याने खेळात रंगत आणण्यासाठी या पेक्षा जलद प्रकार खेवण्यात येतो या प्रकारात खेळ संपवण्यासाठी खेळाडूंवर २० ते २५ मिनिटाचे बं...

अमेरिकन स्वातंत्र्यदिन विशेष

इमेज
      अमेरिका जगातल्या बहुतेक सर्व समस्यांचे मूळ असणारा देश.  अफगाणिस्तानमधील अशांतता असो , दक्षिण अमेरिका खंडातील राजकीय अस्थिरता असो, इराकमधील दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटला वाढण्यासाठी पूरक होईल अश्या  वातावरणाची निर्मिती असो सध्याचे रशिया युक्रेनमधील युद्ध असो  या  आणि अश्या सारख्या घटनांचे मूळ शोधायला गेल्यास त्या सर्व घटना या अमेरिका या एकाच देशापाशी येऊन थांबतात , जगात बदलत्या हवामानाला साह्यभूत होणाऱ्या हरितवायूंचे उत्सर्जन कोणता देश अधिक करतो याचा आढावा   घेतल्यास आपणस एका देशाचे कार्बन उत्सर्जन उर्वरित जगातील कित्येक देशांच्या उत्सर्जनपेक्षा अधिक आढळते तो देश म्हणजे अमेरिका जगात त्या देशातील एकूण लोकसंख्येच्या पेक्षा अधिक शस्त्रात्रे असणारा देश म्हणजे अमेरिका . जगात एखाद्या  त्या देशावर आणि त्या देशाच्या नागरिकांवर असणाऱ्या कर्जाचा विचार करता देशाच्या जीडीपीच्या कितीतरी अधिक पट कर्ज असून देखील जो देश तेथील नागरिक अजून  कर्ज घेत आहे तो देश म्हणजे अमेरिका . ज्या देशात अधिकृतपणे नाही तर किमान चोरट्या मार्गाने प्रवेश मि...

वंदन भारताची नवी ओळख जगाला करणाऱ्या संन्यास्याला

इमेज
  समस्त भारतीयांचे ज्यांचे नाव जरी ऐकले अंग स्फुरले जाते , असे व्यक्तीमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद येत्या 4 जूलै रोजी त्यांची 120   वी पुण्यतिथी . त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली  स्वामी विवेकानंद यांचे   भारतीयांसाठी खुप मोठे योगदान आहे .    मित्रांनो , स्वामी विवेकानंद यांचा कार्यकाळात ब्रिटिशांचे शासन होते . त्यामुळे खेत्रीच्या संस्थानिकांंसारख्या अनेकांचा भारतीय तत्वज्ञानावरील विश्वास उडाला होता . भारतीय तत्वज्ञान हे पुर्णतः टाकाउ आहे . जर तूम्हाला जगात चांगले जगायचे असेल तर आपणास पाश्चात्य तत्वज्ञान अंगिकारणे , आवश्यक आहे असा अनेकांचा समज होता . त्यांना भारतीय तत्वज्ञानाचा मोठेपणा स्वामी विवेकानंद यांनी सोदारक्षण पटवून दिला . पाश्चात्य कार्यसंस्कृती आणि भारतीय तत्वज्ञान यांंचा सेतू स्वामी विवेकानंद यांना अपेक्षीत होता , त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले .       स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञानाचा पुरस्कार केला असला , तरी त...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठयावर

इमेज
        आपल्याकडे अनेक नाट्यमय वाटाव्या अश्या राजकीय घडामोडी घडत असताना जगात देखील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत होत्या ज्यामुळे जग तिसऱ्या  महायुद्धाच्या  उंबरठयावर तर नाहीना ?  अशी भीती उत्पन्न झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.  दुसऱ्या महायुद्धानंतर १९९० पर्यंत सुरु असलेल्या शीतयुद्धाचा दुसरा अंक सुरु झाल्याचे गेल्या काही दिवसातील घडामोडी बघून लक्षात येते  शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेचा फक्त एकच शत्रू होता युनाटेड सेव्हिंयत सोशालिस्ट रशिया , या शीतयुद्धाच्या दुसऱ्या अंकात मात्र अमिरिकेचा रशिया बरोबर अजून एक शत्रूं असणार आहे तो म्हणजे चीन . २९ जून आणि ३० जून रोजी स्पेन या देशाची राजधानी असलेल्या मॅड्रिड शहारत  झालेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशन अर्थात नाटो या नावाने सुपरिचित असलेल्या लष्करी गटाची झालेल्या  बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नाटो आता रशिया बरोबर चीन विरोधात देखील आघाडी उभारणार आहे हिंद प्रशांत क्षेत्रात रशिया आणि चीन करत असलेल्या आर्थिक आणि लष्करी दडपशाहीमुळे नाटोला हे पाऊल उचलावे लागत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्...

भारतात हे पण घडतंय

इमेज
  सध्या आपल्या महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींकडे असले नवनियुक्त एकनाथ शिंदे यांचे सरकार कोणत्या प्रकारे कामकाज करते . माजी मुख्यमंत्री नि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या नव्या सरकारशी कोणत्या प्रकारे संबंध ठेवतात .? या कडे असले तरी देशाच्या परराष्ट्र धोरणा संदर्भात अनेक घडामोडी सध्या घडत आहे एक जागरूक नागरिक या न्यायाने आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया त्या घडामोडी       भारत आणि मेक्सिको यांच्यातील परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतांची सहावी फेरी 29 जून 2022 रोजी मेक्सिको सिटी येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका या देशाच्या दक्षिण दिशेला सीमा शेअर करणारा, स्पेन या देशाचे पूर्वी राज्य असणारा लॅटिन अमेरिका प्रदेशला अमेरिका या देशाबरोबर जोडणारा सेतू जो अनेकदा लॅटिन अमेरिका प्रदेशातून अमेरिका देशात येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्याच्या संख्येमुळे चर्चेत येणारा देश मेक्सिको होय . पृथ्वीगोलाचा विचार करता आल्या भारताच्या पूर्णतः नाही पण  बऱ्याच अंशी विरुद्ध दिशेला असणारा देश म्हणजे मेक्सिको  या...

राजकीय साठेमारीत हरवलेले आर्थिक मुद्दे

इमेज
         सध्या आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडींनी आसमंत ग्रासलेले असताना  आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात आर्थिक घडामोडी देखील होत आहे . या  आर्थिक घडामोडींचा आपल्यवा सर्वांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार असल्याने आपणस त्या माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेउया त्या घडामोडी             तर मित्रानो पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यची संयुक्त राजधानीचे शहर असलेल्या चंदिगढ या केंद्रशासित प्रदेश्यात २८ आणि २९ जानेवारी रोजी जिएसटी काउन्सिल ची बैठक झाली सन २०१७ ला स्थापन झाल्यापासूनची ही ४७ वी बैठक होती या आधी सुमारे सहा महिन्यापूर्वी या ची बैठक झाली होती मात्र ती फक्त कापड उदयॊगासाठी आयोजित करण्यात आली होती कापड उद्योग वगळता अन्य क्षेत्रांचा विचार यावेळी करण्यात आला नव्हता . जर सर्व क्षेत्रांच्या विचार करता मागच्या२०२१ साली सप्टेंबर महिन्यात ही बैठक झाली होती या पुढील बैठक मदुराईला आहे  जिएसटी काउन्सिलमध्ये सर्व राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री तसेच दिल्ली आणि पाँडेचरी या केंद्रशासित प्रदेशाचे अर्थ...

सोन्याच्या दरात बदल होणार ?

इमेज
     सोने हा भारतीयांचासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. लग्नसराईत दागिने करण्यासाठी किंवा गुंतवणूकीचा सुरक्षीत पर्याय म्हणून भारतीय समाज सोन्याकडे मोठ्या आशेने बघतो.  जगात वैयक्तिक आणि मध्यवर्ती बँकेकडील एकत्रित सोन्याचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाचे सोने भारताने खरेदी केले आहे. जगभरात देशांच्या मध्यवर्ती बँका आपल्याकडील गंजाजळीच्या सुरक्षीतेसाठी काही प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात. वैयक्तिकरीत्या सोने जगभरात काहीसे कमी खरेदी करण्यात येते. मात्र जगात असणाऱ्या या नियमाला भारतीय अपवाद आहेत. जगात सर्वात जास्त वैयक्तिक सोने भारतीयांनी खरेदी केले आहे. तर भारतीयांसाठी अत्यंत प्राणप्रिय असणाऱ्या  सोन्याच्या दरात आगामी नजिकच्या भविष्यकाळात बदल होण्याची दाट शक्यता आहे, आणि याला कारणीभूत आहे, जी7 परीषदेच्या 48व्या अधिवेशात घेण्यात आलेला निर्णय . आर्थिकदृष्ट्या जगातील सर्वात शक्तीशाली असणाऱ्या देशांचा समुह म्हणजे जी7. या जी7 संघटनेतील देशांचे 48वे अधिवेशन 26 ते 28 जूनदरम्यान जर्मनीत झाले.या अधिवेशनामध्ये रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा हेतूने, रशियावर सध्या आहेत, त्यापेक्षा ...