पोस्ट्स

भारतात रंगणार ६४ घरांचा आखाडा

इमेज
         येत्या गुरुवार पासून अर्थात २८ जुलैपासून  आपल्या भारतात एक युद्ध बघायला मिळणार आहे या युद्धात आधुनिक शस्त्रात्रे वापरली जाणार नाहीत तर पारंपरिक  हत्ती उंट घोडा आणि एक वजीर  एका राजा तसेच पायी चालणाऱ्या सैनिकाचा यात वापर होणार आहे . महाभारतातील युद्ध १८ दिवस चालले  हे युद्ध पुढील १४ दिवस अर्थात १० ऑगस्टपर्यंत  चालणार आहे .या युद्धात जगभरातील १८८ देशांनी सहभाग नोंदवला आहे प्रत्येक देशाचे पाच  बुद्धिमान सैनिक हे युद्ध खेळणार आहे.  त्यांच्या मदतीला ६४ घरांच्या पटांगणात २ उंट २ घोडा २ हत्ती , एक वजीर आणि एका राजा आणि ८ साधे सैनिक असे साथींदार असतील  . या युद्धात सहभागी अस्नणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक यांच्या वापर करत प्रतिस्पर्ध्यावर मात करत या युद्धात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतील .   मी बोलत आहे चेन्नईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या महाबलीपूरम येथे २८ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाडविषयी . या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये गेल्या काही बुद्धिबळ ऑलम्पियाडचा वि...

इम्रान खान आंदोलनाचा दुसरा अंक सुरु !

इमेज
    पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेचे उपाध्यक्ष दोस्त मोहम्मद यांनी दिलेल्या एका निर्णयामुळे पाकिस्तान अशांत झाला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेतील पाकिस्तानी मुस्लिम लीग कायदे गट (PML Q) या पक्षाचे 10 सदस्य बहुमत सिद्ध करण्याचा प्रकियेसाठी करावयाचा मतदानासाठी अपात्र झाले.शुक्रवार 22 जूलै रोजी पाकिस्तानच्या पंजाबच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायच्या वेळी त्यांनी हा निर्णय दिला.पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेत, पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 63 च्या उपकलम ए नुसार त्यांनी हा निर्णय दिला. .या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री हमजा शरीफ यांची खुर्ची वाचली आहे. हमजा शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पुत्र आहेत. जर पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाच्या सदस्यांना मतदान करु दिले असते. तर हमजा शरीफ यांना पाय उतार व्हावे लागले असते,आणि पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गट आणि पाकिस्तान तेहरीके इंसाफ यांचे सरकार सत्तेत आले असते. जे अस्तित्वात न आल्याने पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाकडून पाकिस्तानात मुख्यतः त्यांच्या पं...

श्रीलंकेत आंदोलनाचा दुसरा अंक सुरु

इमेज
               गेल्या   दोन वर्षांपासून   आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सुमारे गेली ४ महिने मोठे आंदोलन सूर आहे . या आदोलनात आंदोलकांनी राष्ट्रपती भावनांचा ताबा घेतल्याचे आपण टीव्हीवर बघितले आहे . या आंदोलनाचा दुसरा टप्पा आता २० जुलैपासून   सुरु होत आहे . आधीच्या हिंसक टप्प्यापेक्षा हा टप्पा वेगळा आहे . या टप्प्यावर सुरवातीच्या बातम्यांनुसार आंदोलक आता सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत आम्ही आता शांततेत आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांच्या एका गटाने जाहीर सुद्धा केले आहे   पहिल्या टप्यावरचे आंदोलन सुद्धा काहिस्या शांततेत होते मात्र सरकारने प्रचंड वेळकाढूपणा केल्याने ते प्रचंड हिंसक झाले पुढील घटनाक्रम आपणास माहिती आहेच . मंगळवार १९ जुलै रोजी भारताची श्रीलंकेबाबत काय प्रतिक्रिया असावी हे ठरवण्यासाठी परराष्ट्र खाते आणि अर्थ खात्यातर्फे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . श्रीलंकेच्या अंतर्गत प्रश...

बदलत्या हवामानाचा विळखा घट्ट

इमेज
          मानवास  बदलत्या हवामानाचा विळखा दिवसोंदिवस घट्ट होत असल्याचे साध्य जागतिक हवामानबदलवियी ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून स्पष्ट होत आहे . १९ जुलै २०२२ ही तारीख या मगरमीठीच्या इतिहासात महत्त्वाची तारीख म्हणून नोंदलेली जाईल या दिवशी लंडनच्या इतिहासात पहिल्यांदाच ४० अंश २ शतांश नोंदवले गेले . सोमवार रात्र आणि मंगळवार पहाट  लंडनला सलग दुसरी जास्त तापमान असलेली रात्र म्हणून नोंदवली गेली आहे . वाढत्या तपमानामुळे लाकडाच्या जास्त वापर केलेल्या काही घरांना आगी देखील लागल्या . सुदैवाने या आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्याने प्राणहानी झाली नाही आजमितीस समस्त पश्चिम युरोप प्रचंड अश्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे . या आगीमुळे फ्रान्सच्या नैऋत्य दिशेला ( साऊथ वेस्ट ) तसेच स्पेन पोर्तुगाल या दिशेला असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणत वणवा लागत आहे . युनाटेड किंग्डम देशात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे लंडनला विमानतळावर असलेली धावपट्टी वितळल्याने विमाने दुसऱ्या विमानतळावर नेण्याची वेळ तेथील विमानतळ प्रशासनावर आली आहे . युनाटेड किं...

पाकिस्तान अशांतेच्या वळणावर

इमेज
 आपल्याकडील पश्चिमेकडचा   देश आपले शत्रू राष्ट्र अर्थात पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी होत आहेत . ज्याचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील पंजाब राज्य आहे .  आपल्याबारोबर शत्रुत्व असल्याबरोबर आपल्या तीन राज्य (गुजरात राजस्थान , पंजाब )आणि दोन केंद्रशासित प्रदेशाबरोबर  ( जम्मू काशीर आणि लडाख ) पाकिस्तान सीमा शेअर करत असल्याने त्यातील घडामोडी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत         तर १७ जुलै रोजी पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या २० जगासांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इम्रान खान  यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला   १५ जागा मिळाल्या आहेत पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाच्या (नूर गट ) नेतृत्वाखालील १७ पक्षांच्या आघाडीला ४ जागा मिळाल्या आहेत तर १ जागेवर अपक्ष निवडून आला आहे . रावळपिंडी येथील एका जागेवर (विधानसभा मतदार संघ क्रमांक पी पी २७ ) मतमोजणीत फेरफार करून ती जागा पाकिस्तान मुस्लिम लीगला  (नूर गट ) दिली असल्याचा आरोप करत पाकिस्तानी तेफरीके इंसाफ या पक्षाने फेरमोजणीची...

या ज्वालामुखींना कधी सामोरे जणार आपण ?

इमेज
    शुक्रवार १५ जुलैला सकाळी पुण्यात अक्षय माटेगावकर नावाच्या २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली सुप्रसिद्ध अभिनेत्री  केतकी माटेगावकर हिचा  अक्षय चुलतभाऊ होता . आपणास इंटरशिपमध्ये पुरेसे मार्क न मिळाल्याने चांगली नोकरी मिळणार नाही या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले . अक्षयची आई मुबई विद्यापीठात प्राध्यापक आहे तर वडील मुबईला एका कंपनीत उच्च पदस्थ अभियंता आहेत . तर त्याची चुलत बहिणी आघडीची अभिनेत्री  आहे . लौकिक अर्थाने त्याचे कुटूंब सुस्थितीत होते सर्व घराची जवाबदारी त्याच्या खांद्यावरच आहे त्याला नोकरी न मिळाल्यास घराचे खायला वांदे होतील अशी स्थिती नव्हती  उलट नोकरी न मिळाल्याने तो काही काळ जरी बेरोजगार राहिला असता तरी तो उपाशी मरण्याची स्थिती नव्हती  . असे असून देखील अक्षयने जेमतेम २१ व्या वर्षी आत्महत्या केली ज्या कारणाने अक्षयने आत्महत्या हे पाऊल उचलले ते बघता आजची युवापिढी कोणत्या अवस्थेत जगत आहे याचा डोळ्यात अंजन घालणारा पुरावाच म्हणावा लागेल       अक्षयचे घर प्रसिद्ध असल्याने त्याच्या आत्महत्येची बातमी मा...

17 जूलैनंतर पाकिस्तानात काय होणार ?

इमेज
    आपल्या भारताच्या दक्षिणदिशेला असणाऱ्या श्रीलंकेच्या  आर्थिक आणि राजकीय समस्येबाबत आपणास आतापर्यंत बरेच काहि माहिती झाले असेल.मात्र हे कमी की काय म्हणून भारताच्या पश्चिमेकडेसुद्धा एक मोठे राजकीय संकट तयार होत आहे. हे संकट आहे, पाकिस्तानमधील.      पाकिस्तानमध्ये दोन राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातील एक आहे, पाकिस्तानच्या पंजाबमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात. तर दुसरी घडामोड आहे, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांनी संसद भंग करण्याचा निर्णयावर दिलेला निर्णय.          तर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार जावून शहबाज शरीफ यांचे सरकार आल्यावर त्याचे प्रतीसाद त्यांचा पंजाबच्या विधानसभेत देखील उमटले. तिथे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यावर अविश्वाचा प्रस्ताव दाखल करण्यात येवून त्या मुख्यमंत्र्यांना खुर्ची सोडावी लागली. त्यावेळी पंतप्रधानाच्या मुलाने अर्थात हमजा शहबाज शरीफ याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  या सर्व नाट्यामध्ये पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 20 आमदारांना अपात्र ठरवले.त्यामुळे विधानसभेच्या बहुमतासाठ...