पोस्ट्स

पंडीत नेहरुंचे हे थोरपणच !

इमेज
    आपल्या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांनी नुकतीच शपथ घेतली. त्या आदिवासी (वनवासी) समाजाच्या आहेत. या समाजातून देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर जाणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती आहेत. आतापर्यत आपल्या भारतात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजबांधवातून ,तसेच शीख धर्मियातून ,दलित समाजबांधवातून आणि अत्यल्प असणाऱ्या ख्रिचन समाजबांधवातून आलेल्या व्यक्तींनी राष्ट्रपती पद भुषवले आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही किती खोलवर रुजली आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. लोकशाही इतक्या खोलवर रूजवण्याचे काम करणाऱ्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहारलाल नेहरु आणि अन्य तत्कालीक नेत्यांचे आपण कायमच कृतज्ञ असू. दुसऱ्या महायुद्धानंतर पुढच्या तीन ते चार वर्षांत जगभरात सुमारे 90 देश वसाहतवादाच्या रोखडातून मुक्त झाले.या स्वातंत्र्य झालेल्या देशांनी लोकशाहीची विविध रूपे स्विकारली. आज सुमारे 75 वर्षानंतर या देशातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? आणि भारतातील लोकशाही कोणत्या टप्प्यावर आहे? याचा विचार करता आपणास स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाहीची पायाभरणी करणाऱ्या पंडीत नेहरु यांच्या...

पाकिस्तानातील राजनैतिक संकट अधिक गहिरे

इमेज
            पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सुरु असणारे राजनैतिक संकट दिवसोंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांनी पाकिस्तान मुस्लिम लिग कायदे गट(PML Q)च्या 10 आमदरांना निलंबित केल्यानंतर सदर मुद्दा पाकिस्ताताच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. तिथे होणाऱ्या सुनावणी दरम्यान सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून  अनेक चूकीच्या गोष्टी करण्यात आल्या.ज्या हा लेख लिहीत असताना देखिल करण्यात येत असल्याचे डाँनच्या बातमीत सांगण्यात येत आहे.      ःया  खटल्याचा सुनावणी करणाऱ्या 3 न्यायाधीशांवर पक्षपाती होण्याचा आरोप करत ट्टिटर या माध्यमातून त्यांना शिवी देणे तसेच  असभ्य भाषेत त्यांचा उल्लेख करणे त्यांनी आमच्या विरोधात निर्णय दिला तर आम्हला रस्त्यावर येवून लढा उभारा लागेल अस्या प्रकारची वक्तव्ये करणे आदी प्रकार सत्ताधिकारी पाकिस्तान डेमाँक्टिक अलायन्सकडून करण्यात येत आहे. या आघाडीत एकुण 17पक्ष आहेत. ज्यातील प्रमुख पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट आहे. सध्या पाकिस्तानात, पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गटाचा पंतप्रधान आहे. पंतप्रधान...

विश्वविजेतापदाची रंजकता लयास

इमेज
कोणत्याही खेळाडूची आपण खेळत  असलेल्या खेळात विश्वविजेते होण्याचे स्वप्न असते . आपण खेळत असलेला खेळ ज्या व्यक्ती खेळतात त्या सर्वांना आपण हरवले याचा आनंदच काही और असतो . हा आनंद मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते खेळावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना देखील आपणास सर्ववोत्तम खेळ बघायला मिळावा अशी अपेक्षा असते . विश्वविजेता देखील अनेक चांगलया खेळणाऱ्या खेळाडूंपेक्षा अधिक चांगला खेळाचे प्रदर्शन करत त्यांच्यावर विजय मिळवत असल्याने खेळावर प्रेम करणाऱ्या खेळप्रेमींची ही अपेक्षा   एखादा खेळाडू विश्वविजेता होत असताना सहज पूर्ण होत असते . जगातील सर्व खेळामध्ये याच प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो . मात्र एका खेळासाठी मात्र किमान २०२२ या वर्षी तरी अपवाद करावा लागणार आहे . तो खेळ म्हणजे बुद्धिबळ   बुद्धिबळप्रेमींना या आनंदाला मुकावे लागण्याचे कारण गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असलेल्या मॅग्नस कार्लसन यांनी  यावर्षी  विशेवविजेते स्पर्धा ना खेळण्याचा घेतलेला निर्णय . गेल्या पाच वर्षांपासून विश्वविजेता असल्याने विश्वविजेता होण्याच्या प्रक्...

भारतात रंगणार ६४ घरांचा आखाडा

इमेज
         येत्या गुरुवार पासून अर्थात २८ जुलैपासून  आपल्या भारतात एक युद्ध बघायला मिळणार आहे या युद्धात आधुनिक शस्त्रात्रे वापरली जाणार नाहीत तर पारंपरिक  हत्ती उंट घोडा आणि एक वजीर  एका राजा तसेच पायी चालणाऱ्या सैनिकाचा यात वापर होणार आहे . महाभारतातील युद्ध १८ दिवस चालले  हे युद्ध पुढील १४ दिवस अर्थात १० ऑगस्टपर्यंत  चालणार आहे .या युद्धात जगभरातील १८८ देशांनी सहभाग नोंदवला आहे प्रत्येक देशाचे पाच  बुद्धिमान सैनिक हे युद्ध खेळणार आहे.  त्यांच्या मदतीला ६४ घरांच्या पटांगणात २ उंट २ घोडा २ हत्ती , एक वजीर आणि एका राजा आणि ८ साधे सैनिक असे साथींदार असतील  . या युद्धात सहभागी अस्नणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणारे सैनिक यांच्या वापर करत प्रतिस्पर्ध्यावर मात करत या युद्धात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतील .   मी बोलत आहे चेन्नईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या महाबलीपूरम येथे २८ जुलै ते १० ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाडविषयी . या बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये गेल्या काही बुद्धिबळ ऑलम्पियाडचा वि...

इम्रान खान आंदोलनाचा दुसरा अंक सुरु !

इमेज
    पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेचे उपाध्यक्ष दोस्त मोहम्मद यांनी दिलेल्या एका निर्णयामुळे पाकिस्तान अशांत झाला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेतील पाकिस्तानी मुस्लिम लीग कायदे गट (PML Q) या पक्षाचे 10 सदस्य बहुमत सिद्ध करण्याचा प्रकियेसाठी करावयाचा मतदानासाठी अपात्र झाले.शुक्रवार 22 जूलै रोजी पाकिस्तानच्या पंजाबच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करायच्या वेळी त्यांनी हा निर्णय दिला.पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयाचा आधार घेत, पाकिस्तानच्या संविधानाच्या कलम 63 च्या उपकलम ए नुसार त्यांनी हा निर्णय दिला. .या निर्णयामुळे पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री हमजा शरीफ यांची खुर्ची वाचली आहे. हमजा शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पुत्र आहेत. जर पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गटाच्या सदस्यांना मतदान करु दिले असते. तर हमजा शरीफ यांना पाय उतार व्हावे लागले असते,आणि पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गट आणि पाकिस्तान तेहरीके इंसाफ यांचे सरकार सत्तेत आले असते. जे अस्तित्वात न आल्याने पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाकडून पाकिस्तानात मुख्यतः त्यांच्या पं...

श्रीलंकेत आंदोलनाचा दुसरा अंक सुरु

इमेज
               गेल्या   दोन वर्षांपासून   आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सुमारे गेली ४ महिने मोठे आंदोलन सूर आहे . या आदोलनात आंदोलकांनी राष्ट्रपती भावनांचा ताबा घेतल्याचे आपण टीव्हीवर बघितले आहे . या आंदोलनाचा दुसरा टप्पा आता २० जुलैपासून   सुरु होत आहे . आधीच्या हिंसक टप्प्यापेक्षा हा टप्पा वेगळा आहे . या टप्प्यावर सुरवातीच्या बातम्यांनुसार आंदोलक आता सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत आम्ही आता शांततेत आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांच्या एका गटाने जाहीर सुद्धा केले आहे   पहिल्या टप्यावरचे आंदोलन सुद्धा काहिस्या शांततेत होते मात्र सरकारने प्रचंड वेळकाढूपणा केल्याने ते प्रचंड हिंसक झाले पुढील घटनाक्रम आपणास माहिती आहेच . मंगळवार १९ जुलै रोजी भारताची श्रीलंकेबाबत काय प्रतिक्रिया असावी हे ठरवण्यासाठी परराष्ट्र खाते आणि अर्थ खात्यातर्फे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . श्रीलंकेच्या अंतर्गत प्रश...

बदलत्या हवामानाचा विळखा घट्ट

इमेज
          मानवास  बदलत्या हवामानाचा विळखा दिवसोंदिवस घट्ट होत असल्याचे साध्य जागतिक हवामानबदलवियी ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून स्पष्ट होत आहे . १९ जुलै २०२२ ही तारीख या मगरमीठीच्या इतिहासात महत्त्वाची तारीख म्हणून नोंदलेली जाईल या दिवशी लंडनच्या इतिहासात पहिल्यांदाच ४० अंश २ शतांश नोंदवले गेले . सोमवार रात्र आणि मंगळवार पहाट  लंडनला सलग दुसरी जास्त तापमान असलेली रात्र म्हणून नोंदवली गेली आहे . वाढत्या तपमानामुळे लाकडाच्या जास्त वापर केलेल्या काही घरांना आगी देखील लागल्या . सुदैवाने या आगीवर लगेच नियंत्रण मिळवल्याने प्राणहानी झाली नाही आजमितीस समस्त पश्चिम युरोप प्रचंड अश्या उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे . या आगीमुळे फ्रान्सच्या नैऋत्य दिशेला ( साऊथ वेस्ट ) तसेच स्पेन पोर्तुगाल या दिशेला असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणत वणवा लागत आहे . युनाटेड किंग्डम देशात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे लंडनला विमानतळावर असलेली धावपट्टी वितळल्याने विमाने दुसऱ्या विमानतळावर नेण्याची वेळ तेथील विमानतळ प्रशासनावर आली आहे . युनाटेड किं...