पोस्ट्स

वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

इमेज
                  भगवान श्रीकृष्ण यांची   जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात   साजरी   करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण   यांना   विविध रूपात पुजले जाते . रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण , ही भगवान श्रीकृष्ण   ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा   इतिहासाच्या पौराणिक आणि   भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण   हे   जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा   मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात .     माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली   भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग...

विलीनीकरण

इमेज
    एसटी बसमध्ये 75 वर्षावरील प्रवाश्यांना मोफत प्रवास्याची घोषणा  झाल्यानंतर, एसटीबाबतच्या विविध बाबीविषयी पुन्हा एकदा चर्चेला सुरवात झाली. ज्यामध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात राजकारणाचा मुद्दा झालेला एसटीचे  सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण करण्याचा मुद्दा देखील होता       विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी एसटीच्या ऐताहासिक संपाच्या वेळी ,आम्ही सत्तेत आल्यानंतर तात्काळ विनाविलंब एसटीचे सरकार मध्ये पुर्णतः विलीनीकरण करु , असे आश्वासन दिले होते. महाविकास आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्याचा प्रश्नाबाबत पुर्णतः असंवेदनशील असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत होता. आता सरकार स्थापून  दिड महिना झाला आहे. पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरु झाले आहे, या अधिवेशनात एसटीच्या विलिनीकरणाबाबत सरकार काय भुमिका घेते?याकडे एसटी कर्मचारी डोळे लावून बघत आहे.          त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवार यांनी एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण कोणत्याच स्थितीत शक्य नसल्याचे वारंवार सांगून देखील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास...

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भारताचे बुद्धिबळातील अमृत यश

इमेज
         सध्या सर्वत्र भारताच्या स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवानिमित्याने भारताच्या विविध क्षेत्रातील कार्यक्षेत्राचा आढावा घेण्यात येत आहे . सर्वत्र देशभक्तीचे वातावरण आहे . या भरलेल्या वातावरणात बुद्धिबळ क्षेत्रातून एक अत्यंत आनंदाची बातमी येत आहे भारताच्या स्वातंत्र्यच्या ७५ व्या वर्षात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारताला ७५ वा  ग्रँडमास्टर  मिळाल्याची ती आनंदवार्ता आहे  भारताला विश्वनाथन आनंद यांच्या रूपाने १९८६ साली भारताला पहिला ग्रँडमास्टर मिळाला त्यानंतर गेल्या ३६ वर्षात ही सातत्याने वाढतच गेली आणि आजमितीस ही संख्या ७५वर पोहोचली आहे . गेल्या काही वर्षात भारतात  सातत्याने ठराविक काळाने ग्रँडमास्टर होत आहेत जे फ़क्त बुद्धिबळ विश्वासाठीच नाही तर समस्त भारतीय क्रीडाविशावासाठी आनंदाची गोष्ट आहे .त्यातही भारताच्या स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवाच्या काळात भारतात  ७५ वा ग्रँडमास्टर टायर होणे भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे       भारताच्या ७५व्या ग्रँडमास्टरचे नाव आहे प्रणव व्यंकटेश . चेन्नईस्थित प्रणवने रोमानिय...

काळ्या पर्वाची वर्षपूर्ती

इमेज
   २०२१ ऑगस्ट १५ ही फक्त एक तारीख नाहीये . एका धार्मिक उन्मादाने एका   एका अप्रगत मात्र मात्र प्रगतीच्या वाटेवर येण्यास अत्यंत उच्छुक असलेल्या देशाला   उर्वरित जग ज्या युगापासून कैक शतके दूर दूर गेले आहे या   मध्ययुगात ढकलल्याचा तो दिवस आहे .   जगाची एकमेव सुपरपॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेने अत्यंत घाबरून पळ   काढल्याने अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानची सत्ता येण्याचा तो दिवस आहे . भारत जेव्हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असेल तेव्हा तालिबान २. ० ला एक वर्ष पूर्ण झालेले असेल .           या एक वर्षात अफगाणिस्तान किमान २०० वर्षे मागे गेला आहे .आजमितीस तेथील महिलांचे उच्च शिक्षण   थांबलेले आहे .सहावीनंतर तेथील महिला पुढे शिकू शकत नाही . माध्यमांचे स्वातंत्र्य सपुष्टात आले आहे तेथील महिलांना अर्थाजनाची परवानगी नहिये २००१ नंतर अमेरिकेच्या आक्रमणानंतर महिलांना जे काही स्वातंत्र्य मिळाले ते पूर्णतः मागे घेण्यात आले आहे . महिलांवर तालिबानच्या पहिल्या काळात अर्थात १९९६ ते २००१ दरम्यान जी...

मानवाची उलटी गणना सुरु

इमेज
        मानवाची उलटी गणना तर  सुरु झाली नाहीना ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घटना सध्या पृथ्वीवर घडत आहेत .युरोप खंडाच्या सुमारे ६३% भूभागावर येत्या नजीकच्या काळात मोठा दुष्काळ पडण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे . आज हा मजकूर लिहीत असताना (ऑगस्ट २०२२) सुमारे ६० % भूभागावर आताच कमी पाऊस झाला आहे . ड्रोन आणि विमानांनी टिपलेल्या छायाचित्रात युरोपातील अनेक महत्त्वाच्या नद्या मोठ्या प्रमाणत आटलेल्या दिसत आहे . युरोप खंडातील अनेक देशात गेल्या कित्येक दशकातील  सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे युरोप खंड तसा थंड तापमानाचा प्रदेश ओळखला जातो जिथले उन्हाळ्यातील सर्वसाधारण कमाल तापमान २२ ते २८ अंश सेल्सियस दरम्यान असते मात्र या वर्षी स्पेन युनाटेड किंग्डम फ्रांस स्पेन  या देशात ४० अंश सेल्सियस पेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहेत . या वाढत्या तापमानमुळे फ्रांस या देशात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहे ज्यामुळे वातवरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्सिएड हा वायू सोडला जात आहे ज्यामुळे तापमान वाढण्यास हातभरातच लागत आहे   युरोपातील ...

पाकिस्तानातील राजकारणाचे बदलते रंग

इमेज
         सध्या पाकिस्तानात राजकारण एका वेगळ्याच स्थितीवर पोहोचले आहे पाकिस्तानच्या स्वतंत्रदिनाच्या एक दिवस आधी अर्थात १३ ऑगस्ट रोजी पाकिस्तनचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या प्रमुख विरोधी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी एका दिवसाच्या आंदोलनांची हाक गेल्या आठवड्यात दिली  त्यावरून पाकिस्तानच्या सत्ताधिकाऱ्यांकडून विविध आरोप केले जात असताना ९ ऑगस्टरोजी  इम्रान खान यांचे सचिव आणि पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्त्वाचे नेते शाहबाझ गिल यांना  इस्लामाबाद पोलिसांनी मोठ्या नाट्यानंतर अटक केली . पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या एका नेत्याच्या ट्विटरमुळे जगाला ही बातमी समजली या  अटकेनंतर ते कुठे आहेत ? या बाबत विविध दावे करण्यात येत आहे .  शहाबाझ गिल यांची अटक करताना  नंबर प्लेट नसलेली गाडी त्यांच्या गाडीला आडवी आली . या गाडीतील लोकांनी तुम्ही आमच्या गाडीचा आरसा का फोडला ? अशी विचारणा करत त्यांना आणि त्यांच्या डायव्हरला मारण्यास सुरवात केली आणि त्यांना फरपटत नेत त्यांना स्वत...

भारतीय बुद्धिबळपटूची कौतुकास्पद कामगिरी

इमेज
        सध्या भारतीय क्रीडापटू शारीरिक असो किंवा  बौद्धिक दोन्ही ठिकाणी   आपले कसब दाखवत आहेत . इं ग्लंडच्या बर्निंगहॅम येथे सुरु असणाऱ्या राष्टकुल स्पर्धेत भारतीय खेलाडू चमकदार कामगिरी करत पदकाची लयलूट करत आहेच मात्र त्या बरोबरच तामिळनाडू राज्यातील मच्छलीपट्टणम येथे सुरु असलेल्या ४४ व्य बुद्धिबळ ऑलम्पियाड दम्यान भारताच्या सर्व सहाही संघाकडून अत्यंत चमकदार कामगिरी कऱण्यात येत आहे ज्यामुळे ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत ९ व्या फेरी अखेरीसच भारताच्या खुल्या गटातील तीन संघापैकीब  संघ आणि महिलांच्या तीन संघांपैकी ब   संघ सुवर्णपदक मिळवण्याच्या स्पर्धेत अत्यंत पुढे आहे          या स्पर्धेत नाशिकचे आयकॉन ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्यासह सर्वच खेळाडू चमकदार कामगिरी करत असल्याने  शनिवारअखेरपर्यंत झालेल्या  सहाही संघाचे प्रत्येकी ८  या प्रमाणे एकूण ४८  सामन्यांपैकी ६ सामन्यात हार स्वीकारत आणि   ६  बरोबरी मान्य करण्याचा अपवाद वगळता...