पोस्ट्स

हत्या २३९ वर्षापुर्वीची

इमेज
       आजपासून २३९ वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. स्थळ शनिवार वाडा पुणे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एका १८  वर्षीय तरुणाचा त्याचा काकांकडून मारेकरी घालवून हत्या केली जाते .   हीच  तो पेशवाईच्या इतिहासातील नारायण पेशव्यांची राघोबा दादाकडून करण्यात आलेली कुप्रसिद्ध हत्या . आज या इतिहासाला २३९ वर्षे पूर्ण झाली आहेत आजपासून २३९ वर्षांपूर्वी १७७३ ऑगस्ट ३० या दिवसापूर्वी ही हत्या करण्यात आलेली होती या निमित्याने ध चा मा करणे म्हणजे मूळ गोष्टीत  अनुचित प्रकारचा बदल   करणे   या अर्थी  वाक्यप्रचार रूढ झाली  पेशवाईच्या  इतिहासामुळे तीन म्हणी मराठी भाषेत रूढ झाल्या त्यातील एक म्हणजे ही होय अन्य दोन म्हणजे अटकेपार झेंडा रोवणे ही पराक्रमाची माहिती सांगण्यासाठी वापरण्यता येणारी म्हण तर दुसरी म्हणजे अपयशाचे वर्णन करणारी पानिपत होणे ही होय असो              पेशवाईच्या अंताची पायाभरणी या गोष्टीतून सुरु झाली असे मानले तर गैर ठरू नये कारण यामुळे अल्पकाळासाठी   मिळाल...

संघर्षाचे ६ महिने

इमेज
         २०२२ फेब्रुवारी २० ही फक्त एक तारीख नाहीये . अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांच्या राजकारणात युक्रेन या देशाचा बळी जाण्याची सुरवात होण्याचा तो दिवस आहे याच दिवशी रशियाने युक्रेन या देशावर आक्रमण केले आज ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवाड्यत या युद्धाला सहा महिने पूर्ण होत आहे अजूनही हे युद्ध सुरु आहे . युद्धाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये रशिया हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या दिवसात रशिया युक्रेनला पूर्णतः जिंकून घेईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता . मात्र विविध देशांच्या शस्त्रात्रांच्या  मदतीने युक्रेन हे युद्ध सहा महिने झाले लढत आहे . युद्धाच्या सुरवातीला  अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना  नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनाझेशनचे सैनिक लढायला येतील अशी युक्रेनसह जगाची अपेक्षा होती . मात्र अमेरिका युद्धात उतरली तर  जगात तिसरे महायुद्धाचं सुरु होईल असे सांगत नाटोचे सैन्य युक्रेनच्या मदतीला आलेच नाही याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलन्स्की यांनी जाहीर टीका सुद्धा केली होती अमेरिका जरी प्रत्यक्ष ...

भारताचा वाटा 3% की 12%

इमेज
भारतात जगाच्या ३ % वाहने आहेत मात्र एकूण रस्ते अपघाताच्या  विचार करता जगाच्या १२ % अपघात आपल्या भारतात होतात  ३ च्या चारपट संख्या १२ आहे हे विचारत घेतले असता आपल्या भारतातील अपघाताची समस्या किती गंभीर आहे हे समजून येते  मात्र रोजच्या जगण्यात फारसे महत्त्वाचं नसलेल्या  भावनिक मुद्यावरून राजकारण करणाऱ्या कोणत्याही राजकारणी व्यक्तीने याबाबत राजकारण केल्याचे आपणास दिसत नाहीये . एका अहवालानुसार अपघाताच्या कारणांमध्ये रस्त्याची दुर्दशा आणि अन्य मानवाच्या नियंत्रणात नसलेल्या निसर्ग आदी घटकांचा फक्त ३ ते ४% सहभाग असतो . ९६ ते ९७ % अपघात हे मानवी चुकांमुळे होतात . जे टाळणे सहजशक्य आहे . वाहतुकीचे नियम पाळल्यास हे अपघात टाळता येऊ शकतात . ज्यामुळे या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांसह अश्या अपघातात कायमचे अपंगत्व घेऊन  जगणाऱ्या व्यक्तीमुळे होणारे देशाचे नुकसान सहज टाळता येऊ शकते हे नुकसान टाळल्यामुळे या व्यक्तीचे देशाच्या प्रगतीत योगदान जोडले जाऊन आपल्या भारताची अधिक वेगाने प्रगती होऊ शकते .  वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करणे इतकाच...

पाकिस्तानात चाललंय काय ?

इमेज
      पाकिस्तानात चाललंय  तरी काय ?  असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी पाकिस्तानच्या राजकारणात सध्या घडत आहेत  या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी पंतप्रधान इम्रान खान . आपले सचिव आणि  पक्षाचे मोठे नेते शाहबाझ गिल यांच्या अटकेबाबत आणि यांच्यावर झालेल्या  पोलिसी अत्याचाराबाबत  इस्लामाबाद येथील एका जाहीर सभेत बोलताना इम्रान खान यांनी  इस्लामाबाद उच्च न्यायालय आणि इस्लामाबाद पोलिसांविषयी केलेल्या वक्त्यावरून हा वाद सुरु झाला आहे . त्यांच्या वक्तव्यावरून  त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालय आणि इस्लामाबाद  पोलिसांचा अपमान केला तसेच देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होईल असे विधान केले असे सांगत त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा इस्लामाबाद येथील एका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे . २१ ऑगस्ट रोजी त्यांनी हे विधान केले होते . त्यावर त्यांनी इस्लामाबाद उच्च न्ययालयात धाव घेतली उच्च न्यायालायने त्यांना २५ ऑगस्टपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला आणि आपले म्हणजे २५ ऑगस्टरोजी...

हे बदल आपल्या एसटीत कधी होणार?

इमेज
    आपली महाराष्ट्राची एसटी आधीच विविध सोइसवलतीने डबघाईस आलेली असताना, एकनाथ शिंदे यांच्या नेर्तुत्वाखालील मंत्रीमंडळाने तीला 75 वर्षावरील व्यक्तींना पुर्णतः मोफत प्रवास करण्याचा घोषणेने आणखी एका सोईसवलतीचा भार देवून टाकला. एकीकडे आपल्या एसटीचे सवलतीचे ओझे वाढत असताना, आपल्या शेजारील गुजरात राज्यातील एसटीने एक मैलाचा दगड गाठला गेला.  देशभरातील एल .एन. जी.वर चालणारी पहिली एसटी बस चालवण्याचा मान, गुजरात राज्य परीवहन महामंडळाला मिळाला आहे.      गुजरात एसटीच्या विश्वामित्र या विभागातर्फे (बडोदा जिल्हा विभाग) नुकतेच याच्याशी संबधीत बसची प्रादेशिक वाहतूक विभागाकडे नोंदणी करण्यात आली. मुळच्या डिझेल बसमध्ये बदल करत, तीला एल. .एन.जी. इंधनावर चालवण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे. एल. एन.जी या इंधनामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.          एकेकाळी देशात नवनवीन उपक्रम राबवण्याबाबत महाराष्ट्र एसटी अनभिषक्त सम्राट होती. देशात पहिली गोष्ट करायची ती महाराष्ट्र एसटीनेच .महाराष्ट्र एसटीची काँपी नंतर राज्यातील एसटीने करायची, हा सर्वमान्य नि...

एसटीला झाल तरी काय ?

इमेज
           एसटीला झालं तरी काय    ?  असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या बातम्या सध्या महाराष्ट्र एसटीबाबत  ऐकायला येत आहेत . ऐतिहासिक अश्या संपानंतर एसटी बसेस सुरु झाल्या खऱ्या . .मात्र त्यानंतर सुरु झालेल्या एसटीला सुरक्षित प्रवास म्हणजे एसटीचा प्रवास या वाक्याचा विसर पडलेला दिसत आहे ऐतिहासिक संपानंतर सुरु झालेल्या बसेसला अपघात होण्याचे किंवा बस नादुरुस्त होऊन रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणत वाढल्या आहेत . बसेसचे वायपर योग्य प्रकारे कार्यरत असणे म्हणजे काहीतरी गंभीर गुन्हा आहे सबब बसेसचे वायपर कमीत कमी  कार्य कसे करतील यासाठी काम करणे आवश्यक आहे ,असा समज एसटीतील अधिकाऱयांचा तर झालेला नाहीना ? असे बसमध्ये फिरताना सध्या अनुभवायास येत आहे बस प्रवाश्यांना घेऊन एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना सस्पेंशनमध्ये बिघाड होणे,टायर पंचर झाल्यावर बदली टायर नसणे . परिणामी प्रवाश्याना रस्त्यात उतरवून दुसऱ्या बसमध्ये बसवून पुढच्या प्रवासाला पाठवणे हे प्रकार आता एखादा नियम असावाजो न पा...

भारतीय बुद्धिबळपटूंची लक्षणीय कामगिरी

इमेज
              सध्या भारतीय क्रीडाविश्व त्यातही बुद्धीबळविश्व अत्यंत दैदिप्तमान कामगिरी करत आहे . बुद्धिबळ   ऑलम्पियाडचे   अत्यंत दिमाखदार आणि यशस्वी   आयोजन करण्याचे शिवधनुष्य भारतीय क्रीडा खाते आणि तामिळनाडू सरकारने लीलया पेलल्यानंतर   भारतीय बुद्धिबळ विश्वाचा घोडा अधिकच मोठ्या वेगाने धावायला लागला आहे . ७ ऑगस्ट रोजी भारताला ७५ वा   ग्रँडमास्टर मिळाल्याचा आनंद   बुद्धिबळप्रेमींना आनंद मिळाला असताना तो आंनद द्विगुणित करणारी घडामोड भारताचे पहिले ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या बाबत घडली . बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नियमन करणारी संघटना    इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ दि इचेस म्हणजेच फिडे या संघटनेच्या उपमुख्य अध्यक्ष (deputy president)  म्हणून   विश्वनाथन आंनद यांची निवड झाल्याची हि दुसरी आंनदवार्ता होती कोणत्याही बुद्धिबपटूस असा मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे    पाचवेळा विश्वविजेता झालेले   विश्व...