पोस्ट्स

भारताचे अशांत शेजार

इमेज
      पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचे . दोन शेजारी एक पूर्वेकडे आहे एक पश्चिमीकडे .कोणे एकेकाळी एकाच देशाचे भाग असलेले मात्र कालांतराने विविध कारणास्तव विभक्त होऊन दोन स्वतंत्र झालेले हे दोन देश   ते विभक्त होऊन आज ५० वर्षे झाल्यावर पुन्हा एकदा हे देश एका सामान कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे देशातील केंद्रीय सत्तेने सत्ता सोडावी या साठी प्रमुख विरोधी पक्षांनी आंदोलन आणि त्यास मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा या दोन्ही देशातील आंदोलनाने विविध प्रकारचे हिंसक स्वरूप धारण केले आहे पाकिस्तनमध्ये या आंदोलनदरम्यान पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ,ज्यातून ते बचावले तर बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनात एका आंदोलकास १० डिसेंबर रोजी प्राणास मुकावे लागले दोन्ही देशातील केंद्रीय सत्तेच्या कालावधी दीड वर्ष बाकी असताना ते देशाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरले आहेत त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली . देशाचे परराष्ट्र धोरण स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार न करता अन्य देशाला अनुकूल ठरेल अश्या प...

भारतियांनो तुमची घटिका भरली

इमेज
भारतियांनो तुमची घटिका भरली आहे . हे सिद्ध करणारा अहवाल नुकताच जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे या अहवालानुसार येत्या नजीकच्या भविष्यकाळापासून मोठ्या तापमानाचा  भारतातला जगात सर्वाधिक फटका बसणार आहे यासह भारतात उन्हाळ्याचा कालावधी वाढणार आहे उन्हाळा लवकर सुरु होऊन उशिरा संपणार आहे . Climate Investment Opportunities in India's Cooling Sector या नावाचा हा अहवाल "India Climate and Development Partners' Meet या दोन दिवशीय परिषदेत मांडण्यात आला केरळ सरकारच्या सहकार्याने  जागतिक बँकेमार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तिरुअतनपूरम या शहरात ही परिषद झाली या अहवालात सांगण्यात आले आहे की, त्यात पुढे म्हटले आहे की, दक्षिण आशियाचा विचार करता या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे  ज्यामध्ये एक मनुष्य दिवसभरत  ८ तास काम करतो जर दोन माणसांनी प्रत्येकी ८ तास काम केले तर ते काम १६ तास होईल या पद्धतीने मोजल्यास   वर्षभरात  मनुष्य काम करू शकतील अश्या  १०१  अब्ज तासांपेक्षा जास्त तास काम होऊच या उन्हामुळे...

मोदी पुतीन भेट यंदा नाय !

इमेज
    दरवर्षी भारत आणि रशिया या दोन देशांच्या दरम्यान असणाऱ्या संबंधाला बळकटी देत दोन्ही देशातील व्यापारात वाढ व्हावी ,व्यापारात येणाऱ्या अडचणी कोणत्या ? त्या दूर करण्यासाठी काय करावे लागेल दोन्ही देशातील सांस्कृतिक  संबंध अधिक वृद्धिगंत होण्यासाठी काय पुरले उचलावीत यावर विचारमंथन होण्यासाठी   सन २००१ पासून भारत आणि रशिया या दरम्यान वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात येते सर्वसाधारणतः डिसेंबर महिन्यात या बैठकीचे आयोजन करण्यात येते .ज्यास इंडिया रशिया समिट म्हणतात . आता पर्यंत इंडिया रशिया समिटचे २०वेळा आयोजन करण्यात आले आहे  या समिटच्या वेळी  भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजेच पंतप्रधान आणि रशियाचे कार्यकारी प्रमुख अर्थात रशियन फेडरेशनचे अध्यक्ष हे एकमेकांना भेटतात सध्या भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत (राष्ट्रपतींना देशाचे संविधानात्मक प्रमुख म्हणतात ) तर रशियाचे  कार्यकारी प्रमुख अर्थात रशियन फेडरेशनचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन आहेत त्यामुळे हि भेट सध्या मोदी पुतीन भेट म्हणून ओळखली जाते   गेल्या काही वर्षांपासून २०२०...

अजून एक !

इमेज
सध्या भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत . अनेक स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करत स्पर्धांचे विजेतेपद आपल्या खिश्यात   घालत असताना कोणत्याही बुद्धिबळपटूची   जो बुद्धिबळातील ' किताब मिळवण्याची   इछा   असते तो ग्रँडमास्टर या किताबाला देखील गेल्या काही महिन्यात भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने गवसणी घालत आहे .  त्याच मालिकेत ६ डिसेंबर रोजी   भारताला   आदित्य मित्तल हे ७७ वे ग्रँडमास्टर मिळाले आदित्य मित्तल हे मुबईचे रहिवाशी आहेत आदित्य मित्तल हे महाराष्ट्राचे १० वे ग्रँडमास्टर आहेत .   ग्रँडमास्टर हा ' किताब बुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या संघटनेकडून खेळाडूंचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारा ' किताब असतो या पदकाचे काही निकष आहेत ते पूर्ण केल्यावरबुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडेकडून हा गौरव करण्यात येतो  .  स्प...

अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप देखील जैसे थे

इमेज
    देशातील हिंदी आणि इंग्रजी माध्यमे  दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या मतदानावरून आणि मराठी माध्यमे बेळगाव सीमाप्रश्नावरून मोठ्या प्रमाणात वार्तांकन करत असताना , बुधवार ७ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास  अर्थव्यवस्थेची स्थिती अद्याप देखील जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले  रिझर्व  बँकेचे गव्हनर  शक्तिकांत दास यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अर्थव्यस्थेबाबत केलेल्या भाष्यांमुळे ही गोष्ट स्पष्ट झाली रिझर्व बँकेमार्फत दर दोन महिन्यांनी रेपो रेट रिवर्स रेपो रेट , एस एल आर या सारख्या दरांचा आढावा घेऊन त्यात परिस्थितीनुसार योग्य ते बदल केले जातात जे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येतात  . त्या नुसार नैमक्तिक  वेळापत्रकानुसार हि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती         गेल्या ८ महिन्यांत तब्बल  पाचव्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेटमध्ये वाढ केली आहे.  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये ३५ पॉइंटची केल्यामुळे  त्यामुळे आता नवीन  रेपो रेट  ६.२५ ...

भारत जर्मनी सहकार्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ

इमेज
सध्या देशातील सर्वच माध्यमे गुजरात आणि हिमाचल प्रदेशासह दिल्लीतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?  दिल्लीत चालली तशी आपच्या झाडूची कमाल गुजरातमध्ये किती यशस्वी होणार ? याबाबत विविध आखाडे तर्क बांधण्यात मग्न असताना नवी दिल्लीत भारत जर्मनी सहकार्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ होत आहे कारण भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ऍनालेना बेरबॉक यांच्या शिष्टमंडळाच्या ५ आणि ६ डिसेंबरच्या दौऱ्यात अनेक विषयावर सहमती दर्शवण्यात आली  .           . 02 मे 2022 रोजी बर्लिन येथे आयोजित करण्यात आलेल्या  6व्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (IGC) दरम्यान ठरवण्यात आलेल्या मुद्याचा आतापर्यतचा प्रवास कसा झाला आहे?  याचा आढावा यावेळी घेण्यात आला  त्यावेळी पर्यावरणपूरक  आणि शाश्वत विकास भागीदारी. द्विपक्षीय संबंधांच्या विविध घटकांविषयी दोन्ही देशांमध्ये कार्य करण्याचे ठरवण्यात आले होते या वेळी या मुद्याचा आढावा घेतांना   भारताला अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर जोर देण्यात आला ...

जरा याद करो उनको -

इमेज
दिनांक 13 डिसेंबर 2001..., स्थळ संसदेची इमारत नवी दिल्ली ......., वेळ सकाळी अकराची ....., संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने देशातील सर्व खासदार संसदेच्या प्रांगणात हजर . ज्यामध्ये सोनिया गांधी , अटलबिहारी वाजपेयी , लालकृष्ण अडवाणी , पि सी चिदबरन् आदी देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे खासदारांचा समावेश असतो ....... नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु असते . आज काही वेगळ घडणार आहे . याची पुसटशी देखील शंका तेथील सुरक्षा रक्षकांना नव्हती . अचानक खासदारांसाठी असलेले स्टिकर लावलेली एक कार संसदेच्या आवारात घूसते . नेहमीच्या ठिकाणी न थांबता सरळ संसदेच्या आवारात घूसते . खासदाराची गाडी आहे . कशाला तपासायचे ? असा विचार करुन सुरक्षा रक्षक   त्या गाडीला तसेच पुढे जावू देतात . जी सुरक्षा रक्षकांची चूक असल्याचे नंतर लक्षात येते , कारण ही गाडी संसदेच्या इमारतीला खेटून उभी राहते . त्या कारमधून आलेल्या व्यक्ती गोळीबार करत   संसदेच्या मुख्य सभागृहाच्या दिशेने पळायला सुरवात करतात .  आणि एकच हल्लाबोळ ...