पोस्ट्स

नाशिककरांसाठी सुवर्णक्षराने नोंदवायचा क्षण 

इमेज
    मंगळवार २१ फेरबुवारीची सायंकाळ नाशिकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावी अशीच ठरली , कारण नाशिकचे भूमिपुत्र जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी आणि भारतीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी विद्यमान विश्वविजेतेपदास पाचवेळा विश्वविजेते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवावाचे पाणी पाजण्याचा भीम पराक्रम घटना यावेळी घडली . प्रो चेस टूर्नामेंट या १६ संघाच्या सामावेश असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान इंडिया योगीज्   या संघाकडून खेळताना त्यांनी हा पराक्रम केला  मॅग्नस कार्लसन  Canada Chessbrahs या संघाकडून खेळत होते  काळ्या मोहऱ्या घेऊन विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे बुद्धिबळ खेळामध्ये पांढरे मोहरे घेऊन खेळणारा खेळाडू प्रथम चाल करत असल्याने खेळामध्ये प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे पांढऱ्यास काहीसे सोपे असते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढऱ्याचे आक्रमण परतवून पांढऱ्यावर प्रति आक्रमण करावे लागते ही बाब लक्षात घेता विदित गुजराथी यांनी मिळवलेल्या विजयाचे महत्व लक्षात येते     या डावद...

हमारे पास ८० है !

इमेज
      ज्येष्ठ सिनेअभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एक डॉयलॉग प्रसिद्ध आहे "मेरे पस मा है " हाच डायलॉग भारताच्या बुद्धिबळ क्षेत्राबाबत म्हणायचं झाल्यास हमारे   ८० है ,तुम्हारे पास   कितने है असा म्हणावा लागेल ,कारण भारताला नुकताच ऐंशीवा ग्रँडमास्टर मिळाला आहे चेन्नई येथील रहिवाशी असलेले आणि दक्षिण रेल्वेत कार्यरत असणारे विग्नेश एन आर हे भारताचे ८० वे ग्रँडमास्टर ठरले आहेत .त्यांनी   जर्मनी देशात सुरु असलेल्या २४ व्या नॉर्द वेस्ट कप २०२३या स्पर्धेत अंतिम फेरीत जर्मनीचे इंटरनॅशनल मास्टर असलेल्या Ilja Schneider यांना पराभवाचा धक्का देत ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५०० इलो रेटिंगचा टप्पा यशस्वीरीत्या पार करत भारताच्या ग्रँडमास्टरच्या संख्येत एकाची वाढ केली   . विशेष आनंदची बाब म्हणजे भारताचे ५९ वे ग्रँडमास्टर विशाख नारायण राजेश्वरी यांचे ते बंधू आहे . विंगेश आर एन आणि विशाख नारायण राजेश्वरी हि भारतातील ग्रँमडमास्तर मिळणारी पहिली भावांची जोडी आहे   विशाख नारायण राजेश्वरी   यांनी २०१९ मध्ये ग्रँडमास्टर हा 'किताब आपल्या झोळीत टाकला होता त...

ज्ञानभाषा मराठी!

इमेज
फेब्रुवारी महिन्याचा शेवटून दुसरा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, हे जगजाहीर आहे. मराठीतील थोर कवी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत साजरा होणाऱ्या, या दिवशी समाजमाध्यमांमध्ये मराठीची थोरवी गाणाऱ्या, तीला अभिजात भाषेचा दर्जा का आवश्यक आहे ? तसेच मराठी कशी जगातील एक प्रमुख भाषा आहे, मराठी माध्यमातील शाळा टिकवण्यासाठी काय करणे गरजेचे आहे?    मराठी वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे. हे सांगणाऱ्याविविध पोस्ट आपण दरवर्षी   बघतो .आता मी मराठीतच बोलणार, लिहणार असा संकल्प देखील आपल्यापैकी अनेक जण या निमित्ताने करतात. मात्र दरवर्षी मराठीबाबत ठराविक गोष्टींचीच उजळणी होते,मात्र घोडे काही पुढे जात नाही, असो     ब्रिटीश लोक तंत्रज्ञानात पुढे होते. ज्यामुळे त्यांनी भारतासह जगभरातील विविध सत्ताधिशांचा पराभव केला, आणि संख्येने कमी असून देखील ते तेथील सत्ताधीश झाले. सत्ताधिशांची भाषा म्हणून इंग्रजी जगभर पसरली, परीणामी आज ती जगातील एक सर्वत्र बोलली जाणारी भाषा म्हणून उदयास आली आहे. आपली मराठी नेमकी मार खाते ती इथेच. सर्वसामन्यांना समजेल अस्या मराठ...

राजकीय अस्थिरतेच्या नव्या चक्रव्यूहात पाकिस्तान

इमेज
सध्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या बघितल्या तर "राजकीय अस्थिरतेच्या नव्या   चक्रव्यूहात पाकिस्तान" असेच म्हणावे लागेल . केंद्रीय सत्त्तेत सहभागी असणाऱ्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या आघाडीतील पक्ष आपल्याला असणाऱ्या अधिकाराचा गैरफायदा घेत पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुकेच्या तारीख जाहीर करत नसताना कोणाच्या ध्यानीमनी नसताना पाकिस्तानी राष्ट्रपतींनी पाकिस्तान निवडणूक कायदा २०१९ द्वारे मिळलेल्या   अधिकाराच्या वापर करत या निवडणूका   २० फेब्रुवारी जाहीर केल्या आहेत . त्यांना या प्रकारे निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार खरच आहे का ? यावरून पाकिस्तानमध्ये दोन गट पडले आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या कार्यलयासमोर केलेल्या आंदोलनांसाठी दाखल केलेल्या खटल्यात इम्रान खान यांना   ३ मार्चपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे २२ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या जेलभरो आंदोलनाला सुरवात होण्याच्या आधीच मिळत असणारा प्रतिसाद बघता    "राजकीय अस्थिरतेच्या नव्या   चक्रव्यूहात पाकिस्तान" अस...

मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर

इमेज
       आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम   निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?   याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .   महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे   अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 19...

श्रीलंका सरकारचा सर्वसामान्याना दरवाढीचा शॉक

इमेज
           सध्या आपली बहुतांशी माध्यमे पाकिस्तानी सरकारकडून किती मोठ्या विजेच्या दारात वाढ केली आहे याच्या रसभरीत बातम्या देत असताना आपल्या दुसऱ्या शेजारील देशात देखील विजेच्या दारात मोठी वाढ केली आहे आणि तो देश मागच्या वर्षी प्रचंड चर्चेत असणारा श्रीलंका श्रीलंकन सरकारने एक परिपत्रक काढत गुरुवार १६ फेब्रुवारीपासून देशातील विजेच्या दारात ६६ % वाढ केली आहे सरकारला आशा आहे की या निर्णयामुळे संकटग्रस्त श्रीलंकेसासाठी बेलआउट देण्याच्या विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सहानुभूतीपूर्वक विचार करेल   वीज दरात वाढ झाल्याची घोषणा ऊर्जा आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेक्रा यांनी केली . मागच्या वर्षी आर्थिक संकटाच्या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी   या दरात ७५ टक्क्यांनी वाढ केली होती         या दरवाढीमुळे  . प्राप्तिकर 36 टक्के इतका जास्त असणाऱ्या श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात...

वंदन महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला

इमेज
            छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच   सर्व महाराष्ट्रयीन व्यक्तींची    छाती    गर्वाने फुलूनयेते   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य सर्वाना मनःपूर्वक खूप खूप   शुभेच्छा            तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली . त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात . मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी   महाराजांनी . अजमल कसाब आणि मार्च 1993 च्या स्फोटामुळे समुद्राचा धोका आपणास लक्षात आलाच आहे .   भविष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती . छञपती शिवाजी महाराजांनी हे टोपीवाले दिसतात तेव्हढे साधे नाहीत त्यांचापासून जपून राहिले पाहिजे ,...