पोस्ट्स

राजकारणाचे अथपासून इथीपर्यत उलगडणारी कांदबरी सिंहासन

इमेज
    आपल्या मराठीला अनेक चांगल्या कादंबरीची मोठी दिर्घ परंपरा लाभलेली आहे. या या कादंबऱ्यांची पार्श्वभूमी अनेकदा ऐतिहासिक तसेच सद्य स्थितीवर आधारीत आहे. कादंबरीवर अनेक  उत्तमोत्तम चित्रपट देखील निघाले आहेत. अस्याच कांदबरी आधारीत एक उत्कृष्ट चित्रपट जो सद्य स्थितीवर भाष्य करतो असा चित्रपट म्हणजे नुकताच प्रदर्शित होवून ४४वर्षे पुर्ण झाली तरी आज देखील ताजातवाना वाटतो असा मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कांदबरीवर आधारीत मल्टीस्टार असलेला चित्रपट सिंहासन . तर मित्रांनो हा उत्कृष्ट चित्रपट ज्या दोन कांदबरीवर आधारीत आहे.त्यातील एक म्हणजे "सिंहासन" मी नुकतीच वाचली.ज्यामुळे सिंहासन  या अजरामर ठरेल अस्या या चित्रपटाची कथा तितकीच सशक्त आहे, हे मला समजले. ज्या प्रमाणे चित्रपट सुरवातीपासून आपली पकड घेतो त्या प्रमाणेच कांदबरी देखील आपल्या मनाचा लगेच ठाव घेते.कांदबरीत पार्श्वभूमीवर फारसी पाने ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांनी खर्ची पाडलेली नाही. सुरवातीच्या जेमतेम हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या पानांमध्येच त्यांनी कांदबरीसाठी पार्श्वभूमी उभारली आहे.   ...

देशातील बदलते सार्वजनिक परिवहन विश्व आणि आपली एसटी

इमेज
        सध्या देशातील परिवहन व्यवस्था वेगाने कात टाकत आहे.तामिळनाडु कर्नाटक सारखी मोठी आणि प्रगत राज्येच नव्हे तर हिमाचल प्रदेश सारख्या काहीस्या छोट्याशा राज्यातील सार्वजनिक परिवहन सेवा देखील अधिक आरामदायी प्रवाश्यांना हिताचा विचार करणारी सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे इंटरनेटवर या संदर्भात माहिती घेतल्यास सहजतेने दिसून येते.      कर्नाटक तेलंगणा सारखी राज्ये अंबारी ऐरावत या ब्रँडनेमखाली अत्यंत आरामदायी सेवा ते देखील विविध मार्गांवर देत आहेत.गुजरात राज्याने देखील गेल्या काही महिन्यांत आपल्या सेवेचा दर्जा खुपचं उंचावला आहे. गुजरात राज्याने सर्वसाधारण प्रवाश्यांचा विचार करत आपल्या सर्वसाधारण प्रवाशी गाड्यांमध्ये पुर्वीपेक्षा अधिक आरामदायी आसने पुरवली आहेत बसमधील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी पुर्वीची ३बाय २ची आसनव्यवस्था मोडीत काढत २बाय २ची आसन व्यवस्था सुरु केली आहे. आपल्या एकुण बसेसपैकी जवळपास 50 टक्के बसेस इलेक्ट्रिक साधनांवर चालवण्याचा चंग बांधणारे गोवा हे राज्य असो किंवा अंबारी सारखी भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात ल...

एसटीच्या खासगीकरणाचे अजुन एक पाऊल

इमेज
        आपल्या महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते.ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक मुलींचे शिक्षण निव्वळ एसटीमुळे सुरु आहे.असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असि स्थिती आहे.अनेक खेडेगावातील,वस्ती, पांडे यात राहणारे पालक एसटीची सेवा आहे,म्हणून राहण्याचा ठिकाणाहून अन्य ठिकाणी शिकायला पाठवतात. जर एसटी बससेवा नसेल तर हे पालक खासगी वाहतूकदारांच्या भरवस्यावर त्यांना शिकायला पाठवणार नाहीत हे नाकारण्यात काही अर्थ नाही. एसटी विद्यार्थ्यांना भांड्यात सुट देते जी खासगी वाहतूकदार कदापी देणार नाहीत. तसेच ज्या ठिकाणाहून एखादं दुसराच प्रवाशी मिळतो अस्या ठिकाणाहून सुद्धा खासगी वाहतूकदार आपली सेवा देणार नाहीत, तसेच एसटी मात्र लोकसेवेच्या आपल्या ब्रीदवाक्यामुळे प्रसंगी तोटा सहन करत या ठिकाणाहून देखील आपली सेवा देते त्यामुळे एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जीवनदायिनी आहे.          मात्र मात्र ही महाराष्ट्राची जीवनदायिनी बंद करण्याचे शासनाचे प्रयोजन तर नाही ना ?असे वाटावे अस्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या. सर्वसामान्य लोकांची लालपरीसुद्धा खासगी...

भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ?

इमेज
       भारत अमेरिका मैत्रीचा नवा सेतू बांधणार ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे १० नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत होणारी भारत अमेरिका यांच्यात झालेली चर्चा.  या चर्चेत भारतातर्फे सरंक्षण मंत्री राजनाथसिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस एस. जयशंकर यांनी तर अमेरिकेतर्फे त्यांचे डिफेन्स सेक्रटरी लॉयड ऑस्टिन आणि फॉरेन सेक्रटरी  अँटोनी ब्लिंकन, यांनी प्रतिनिधित्व करतील . अमेरिकेत अध्यक्षाला मदत करण्यासाठी सेक्रटरी असतात जे आपल्या केंद्रीय मंत्र्याच्या समकक्ष असतात त्या अर्थाने अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री आणि सरंक्षण मंत्र्यांनी यावेळी हजेरी लावली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोणत्याही दोन देशांच्या राजनैतिक संबंधांच्या विचार करता या प्रकारच्या बैठकीस २ + २ बैठक (टू प्लस टू मिटींग्स ) म्हणतात आपला भारत या प्रकारच्या  टू प्लस टू मिटींग्स जगात जपान अमेरिका या प्रकारच्या  ठराविक देशांबरोबर  घेतो १० नोव्हेंबरला होणारी हि अमेरिकेबरोबरची  पाचवी  टू प्लस टू मिटींग्स आहे              यावेळी जग अत्यंत अवघ...

नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ?

इमेज
          नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे नाशिकचे रहिवासी असलेल्या ग्रँडमास्टर यांनी इंग्लंडमधील आइल् ऑफ मॅन या शहरात खेळविण्यात आलेल्या ग्रँड स्विस या महत्त्वाच्या स्पर्धेत मिळवलेले अभिनंदनास्पद यश होय  पाचवेळच्या विश्वेकविजेता मॅग्नम कार्लसन आणि २०२२ चा विश्वविजेता डिंग लिरेन सह आणखी दोन खेळाडू वगळता जगातील सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत उतरले होते अश्या मात्तबर खेळाडूंना नमवत विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे   यातील विजेता आणि उपविजेता हे हे जातात सर्वात उत्कृष्ट असणाऱ्या  अशा आठ खेळाडूंसाठीच राखीव  असलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पात्र होतात आणि कॅंडिडेट्स मधील विजेता २०२२ च्या विश्वविजेत्या बरोबर ( म्हणजे चीन च्या लिंग डिरेन बरोबर )आगामी विश्वविजेतेपदासठी दोन हात करील. त्यामुळे नाशिककर असणाऱ्या ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांची विश्वविजेता होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . आणि  तो  देखील  हे विश्वीजेता होण्याच्या मार्ग ज्या स्पर्धेतू...

दक्षिण आशियाचे राजकारण बदलवणारे वर्ष २०२४

इमेज
नविन वर्ष सुरु होण्यास अजून पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक असला तरी येणारे नवीन वर्ष २०२४ फक्त भारतासाठीच नव्हे तर समस्त दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.याबतच्या  घटना घडण्यास सुरवात झाल्याने त्यांची  माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आपल्या भारतासह भुटान,बांगलादेश, पाकिस्तान या देशात त्यांच्या संसदेच्या निवडणूका तर श्रीलंकेत त्यांच्या राष्ट्रपतींची निवडणूक या२०२४ मध्ये होणार आहे.या निवडणूकांमध्ये त्या त्या देशांतील समस्त राजकीय जीवन बदलण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दक्षिण आशियासाठी हे वर्ष २०२४ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.  त्यातील भुटान या देशातील निवडणूका या भारत आणि दक्षिण आशियावर फारस्या परिणाम करणाऱ्या नसल्याने आणि भारतातील निवडणूकांबाबत अजूनही फारसी वातावरणनिर्मिती न झाल्याने त्या दोन निवडणूका काहीस्या बाजूला ठेवूया .या निवडणूकांपैकी पाकिस्तान आणि बांगलादेशातील निवडणूका भारतासाठी किंबहुना समस्त दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या असल्याने त्यावर प्रथम बोलूया          तर इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असणाऱ्या देशांचा विचार करता दुसऱ्य...

बिगुल ४७ व्या अमेरिकी राष्ट्रपतींचे*

इमेज
, भारतात लोकसभेची निवडणूक पुढच्या वर्षी आहे  ज्याविषयीचा काही गोष्टींना आता सुरवात झाली आहे . मित्रांनो २०२४ साल हे खूपच महत्वाचे ठरणार आहे कारण आपल्या भारतासारखीच प्रगल्भ लोकशाही असणाऱ्या अमेरिकेत सुद्धा त्याच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहे प्रत्यक्ष मतदानाला एक वर्षाचा कालावधी असला तरी दोस्तांनो ,  अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया ही प्रत्यक्ष निवडणुकीच्या सुमारे दिड ते पावणे दोन वर्ष आधीच सुरु होते . या न्यायाने ही प्रक्रिया सुरु झाली आहे .  अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आता आपण या ची माहिती घेउया हि निवडणूक कधी होते    ही निवडणूक कधी होणार हे ठरलेले आहे . प्रत्येक ४ वर्षांनी येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये जो पहिला सोमवार येईल त्यांनंतरच्या  पहिल्या मंगळवारी ही प्रक्रिया होईल .समजा १ नोव्हेंबरला मंगळवार असेल तर तो महिन्यातील पहिला मंगळवार  असला तरी तो महिन्यातील पहिल्या सोमवार नंतर आलेला मंगळवार नसल्याने त्या मंगळवारी हि निवडणूक होणार नाही ती होईल ७ तारखेचा सोमवार झाल्यावर पुढील दिवशी अर्थात ८ नोव्हेंबरला .  या ...