पोस्ट्स

राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल

इमेज
            सध्या आपल्या भारतात अनेक थोर पुरुषांचे भारताच्या प्रगतीतील वाटचालीतील योगदान काय ?याबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असणारे नेते देखील दुर्दैवाने सुटलेले नाहीत.या अश्या नेत्यांबाबत विद्यमान नेते आपल्या स्वार्थासाठी काहीही दावे करत असल्याने मुळातून  वस्तूस्थिती समजण्यासाठी  त्यांचे आत्मचरित्र,चरित्र स्वतः वाचून परिस्थिती समजावून घेणे अत्यावश्यक ठरते‌        आपल्या दुर्देवाने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि सुरवातीच्या उभारणीत मोठे योगदान असलेले सरदार वल्लभभाई पटेल देखील या चक्रातून सुटलेले नाहीत. सरदार पटेल यांच्या बाबत तत्कालीन काँग्रेस नेत्यांचा आणि महात्मा गांधींच्या मनात काय मते होती? सरदार पटेल स्वतंत्र  भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर काश्मीर आणि अन्य समस्या कोणत्या स्थितीत असत्या ?याबाबत सातत्याने सांगण्यात येते. लेखाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या बाबत विद्यमान राजकीय नेत्यांकडून करण्यात येणाऱ्या विविध दावे प्रतिदावे यांच्यात त्यांचा स्वार्थ ल...

प्रत्येक खेळाडूने वाचायलाच हवे असे पुस्तक, "विजयाचे मानसशास्त्र*

इमेज
      सध्या आपल्याकडे खेळाला करीयर म्हणून स्वीकारणारे अनेक जण दिसतात. या खेळाडूंना त्यांच्या करीयरमध्ये यशस्वी  होण्यामागे मानसशास्त्र हे खूप महत्तवाची भुमिका बजावते. मानसशास्त्रातील अनेक बाबी खेळताना वापरल्याने त्यांचा खेळाचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावतो ,ज्याचे परिणामस्वरूप म्हणून या बाबींचा अभ्यास असणारे हे खेळाडू अनेक स्पर्धा सहज खिश्यात घालतात. खेळणे हेच त्यांचे करीयर असल्याने अंतिमतः या यशाचा फायदा त्यांचे खेळातील करीयर यशस्वी होण्यात होतो. मात्र अनेकदा खेळाडूंना सोडा, त्यांचा प्रशिक्षकांना देखील या बाबी माहिती नसतात, किंवा माहिती  असल्यास देखील या बाबी फक्त  वरिष्ठ स्तरावरील खेळाडुंनाच उपयोगी  पडतात. प्राथमिक स्तरावरील खेळाडूंना  या बाबी अनावश्यक  आहे  असा त्यांचा गैरसमज असतो परीणामी खेळाडू त्यांचा सर्वोत्तम  खेळ करु शकत नाहीत. खेळाडूंचे असे नुकसान होवू नये ,म्हणून महाविद्यालयीन स्तरावर आणि नोकरीच्या सुरवातीच्या काळात उत्कृष्ट  पद्धतीने  नेमबाज हा क्रीडा प्रकार खेळणारे ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ कै. भिष्मराज बाम सरांनी...

भारत केनिया संबंध होणार अधिक मैत्रीचे

इमेज
  केनिया , आफ्रिका खंडाच्या ईशान्य दिशेला जो गेंड्याचा शिंगासारखा भाग दिसतो ( त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असी संज्ञा आहे ) त्यांच्या खालच्या भागातील हिंदी महासागरातील देश . जो त्या देशापासून सुरु होणाऱ्या खचदरीमुळे विशेष प्रसिद्ध आहे . नॅशनल जीओग्राफी या चेनेलवर या देशातील प्राणिजगत देखील आपण अनेकदा बघीतले असेल    आपल्या भारता सारखाच वसाहातवादाचा शिकार झालेला देश म्हणजे केनिया . एकेकाळी क्रिकेटसाठी ओळखला जाणारा देश म्हणजे केनिया   हे सांगायचे कारण म्हणजे नुकतेच केनियाच्या   अध्यक्षांनी भारताचा तीन दिवसांचा केलेला तर मित्रानो , आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , यांच्या विशेष आमंत्रणावरून   केनिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष , . डॉ . विल्यम समोई रुटो यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह ४ ते ६ डिसेंबर दरम्यान भारताचा दौरा केला मागच्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर केनियाचे राष्ट्ट्राध्यक्ष   अध्यक्ष विल्यम रुटो यांचा हा फिलॅसिव्ह दौरा होता या आधी २०१७ साली त्यावे...

नक्षलवाद्यांची सविस्तर माहिती देणारे पुस्तक :नक्षलनामा

इमेज
              सध्या आपल्या देशातील नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेल्या असला तरी, एकेकाळी या नक्षलवाद्याने देशातील सुरक्षा यंत्रणेची झोप उडविली होती. नक्षलवाद्यांकडून पोलीस प्रशासन, मुलकी प्रशासन (जिल्हाधिकारी, तहसीलदार  उपजिल्हाधिकारी या यंत्रणेस मुलकी प्रशासन म्हणतात)आणि स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हत्या करणे , ही रोजचीच बाब झाली होती. वृत्तपत्रांचे मथळे सातत्याने या नक्षलवादाने केलेल्या क्रूर क्रमाने भरलेले आढळत. देशासमोरच्या अंतर्गत प्रश्नाचा विचार करता, सर्वात महत्त्वाचा अंतर्गत प्रश्न म्हणून नक्षलवादाचा उल्लेख सातत्याने केला जात असे. देशाचा सुजाण नागरीक म्हणून आता काहीस्या थंडावलेल्या या प्रश्नांची आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या पुर्वेकडील भागाला असणाऱ्या प्रदेशात असणाऱ्या या समस्येबाबत मराठीत तशी मोजकीच पुस्तके लिहली गेली आहेत. त्यातही जी पुस्तके लिहली गेली आहेत त्यापैकी बहुसंख्य अन्य स्त्रोताचा संदर्भ घेवून लिहिलेली आहेत. लेखकाने प्रत्यक्ष त्या प्रदेशात फिरून नक्षलवादी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून मिळालेल्या माहिती...

भारत अमेरिका

इमेज
    नुकतीच अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर यांनी भारताचा दौरा केला . हा दौरा जरी पूर्वनियोजित असला तरी , अमेरिका देशाच्या जमिनीवर , खलिस्तान समर्थक अमेरिकी नागरिकाची हत्या करण्याच्या प्रयत्न एका भारत सरकारच्या एका उच्चपदस्थानाने करण्याच्या मुद्यावरून भारत अमेरिका राजनीतिक संबंध काहीसे   ताणले गेले आहेत या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे हे आपण   लक्षात घेयला हवे या दौऱ्यात अमेरिकेचे उपराष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर यांनी आपले उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ( स्ट्रॅटेजिक अफेअर्स ) विक्रम मिसरी यांच्याशी   चर्चा केली हि भेटय यावर्षी जानेवारीत आपले राष्ट्रीय सल्लगार अजित डोवाल यांचा अमेरिका दौरा आतासेच याच वर्षी जून महिन्यात अमेरिकेचे राष्टीय सल्लगार जेक सुलिव्हन यांनी केलेल्या भारत दौऱ्याचे फलित म्हणून बघितला जात आहे            या दौऱ्यात अमेरिकेचे उप राष्ट्रीय सल्लागार   जोनाथन फिनर आणि भ...

दर 44 मिनीटांनी एक!

इमेज
        दर 44 मिनीटांनी एक हा दर आहे 2022मधील विद्यार्थी आत्महत्येचा .4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अहवालातून ही आकडेवारी जगासमोर आली.या अहवालानुसार 2022साली 12,000 विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले. दर दिवशी 33 तर दर 44मिनीटांनी एक आत्महत्या इतका हा दर भयावह आहे. आपल्याकडे एक टी 20 क्रिकेट मॅच ही साडेतीन तास चालते. या हिशोबाने बोलायचे झाल्यास एका मॅच दरम्यान पाच विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले असते.      काही वर्षांपूर्वी आलेल्या थ्री इडियटस् या चित्रपटाद्वारे या गंभीर विषयाला हात घातला गेला होता. त्यावेळी त्यावर काही प्रमाणात चर्चा देखील झाली होती.मात्र कालांतराने सर्व काही थंड झाले‌.त्यावेळी हा गंभीर प्रश्न  सोडविण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना या सोईस्करपणे गुंडाळण्यात आल्या. ज्याचा परिणामस्वरूप विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख चढताच राहीला. विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी करण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न मात्र करण्यात आले.ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा ,टेलीफोन हेल्पलाईन सेवा आदि...

हा आकडा महाराष्ट्राला भुषणावह नाही!

इमेज
         आपले महाराष्ट्र अनेक बाबतीत पुढे असल्याचे अभिमानाने  वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येते. त्यासाठी केंद्रीय स्तरावर  प्रसिद्ध  होणाऱ्या विविध अहवालाचा आधार घेण्यात येतो‌. मात्र 4 डिसेंबर रोजी नॅशनल क्राईम रजिस्टर ब्यूरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातील पहिला क्रमांक मात्र नक्कीच अभिमानाचा नसणार. देशभरात 2022,साली झालेल्या आत्महत्येचा विचार करता सर्वाधिक आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. देशात आपल्या  समाजात सर्वाधिक आत्महत्या होणे कोणत्याही समाजासाठी लांच्छनास्पद वाटावे असी कामगिरी. दूर्देवाने ही लांच्छनास्पद कामगिरी , आपल्या महाराष्ट्रीयन समाजाने केली आहे.           मनुष्य अडचणीला घाबरुन आत्महत्या करतो असे म्हणणे चूकीचे आहे. मनुष्य आत्महत्या करतो ते त्या अडचणीतून कसे बाहेर पडता येईल,याबाबत योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने.जगात प्रत्येक समस्येला उत्तर असतेच, मात्र हे उत्तर मिळण्याचा मार्ग  कोणता ?,याबाबत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व्यक्तींकडून सर्व उपाय सं...