बदलत्या काळाची दिशा ओळखत 'साप्ताहिक सकाळ'चे स्वागतार्ह्य पाउल
सध्याचा साप्तहिक सकाळचे वैशिष्ट म्हणजे विशेषांक होय. सध्या साप्ताहिकाचा प्रत्येक अंक एक विशेषांक असतो. एका विशेषांकांत एका विषयावरील लेख सर्वात जास्त असतात अर्थात पूर्वीप्रमाणे नेहमी चालणारी सदरे देखील आहेतच मात्र त्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी आहेत असे माझे ढोबळ निरीक्षण आहे आणि जी सदरे सुरु आहेत ती देखील साप्ताहिकाच्या शेवटच्या अर्ध्या भागात छापलेली अढळतात सुरुवातीचा अर्धा भाग हा
विशेषांकांनी भरलेला असतो ज्याचे विषय देखील निवडीला दाद देण्यासारखे असतात. एखाद्या विशिष्ट वर्गालाच अपील होतील असे विषय खूप मोठ्या वर्गाला अपील होतील ज्याचा वर्तमानाशी काहीतरी संपर्क असेल असे विषय या साप्ताहिकता घेतलेले मला दिसलेआता लोकांना अपील होणारे विषय आहेत नः ?मग लेखाचा दर्जा काहीका असेना हा प्रकार मला यात आढळलेला नाही सर्वच लेख माहितीपूर्ण तरीही सहजसोप्या मराठीत लिहिलेले अढळतात त्याबद्दल त्यांच्या संपादकीय तोमेचे कौतुक करायलाच हवे माझ्या मते सकाळ माध्यम समूहाने सरकारनामा मध्ये या प्रकारचे काही बदल करून त्याला स्थायी स्वरूप देता येईल का हे बघावे म्हणजे वाचकांना वाचनाच्या स्वर्गसुखाचा नक्कीच घेता येईल हे नक्की


टिप्पण्या