निर्णय योग्य मात्र अमंलबजवाणीत दिसाळपणा 

 


सध्या महाराष्ट्र एसटी महामंडळाविषयक कोणत्या बातम्या माध्यामध्ये येत आहेत, याचा आढावा घेतल्यास नागरिकांना एन एम सी सी  विषयक समस्यांच्या बातम्यांनी माध्यमे भरून गेलेली आढळत आहेत नागरिकांनी मागणी नोंदवलेली असून देखील त्यांना कार्ड उपलब्ध न होणे, कार्ड तिकीट काढताना स्कॅन न होणे,तिकीट वापरबाबतचे लोकांचे अज्ञान आणि त्यातून निर्माण होणाऱ्य अडचणी आणि या साऱ्यामुळे कंडक्टर असलेल्या कर्मचाऱ्यांनी सलतीचे तिकीट न देता पूर्ण तिकीट आकाराने यातून प्रवाशी आणि कंडक्टर होणारे वाद ज्याची परिणीती काही वेळा कंडक्टर असलेल्या कर्मचाऱयांनी प्रवाश्यास अर्ध्यताच उतरवायला लावणे या सारख्या बातम्या एसटी विषयक अत्यंत  नियमित झाल्याचे सध्याचे चित्र आहे. 

यापूर्वी एसटीचे खासगीकरण करण्याच्या आलेल्या बातम्या तसेच अन्य राज्यात या प्रकारचे कोणतेही कार्ड आवश्यक नसताना महाराष्ट्रात होणारी सक्ती या पार्श्वभूमीवर नागरिकांना भेडसावणाऱ्या वर  सांगितलेल्या समस्या यामुळे विरोधकांना आयताच मुद्दा मिळाल्याचे चित्र साधा महाराष्ट्रात दिसत आहे. समोरचा प्रवाशी महिला आहे हे ढळढळीत दिसत असताना अन वयाचा पुरावा  म्हणून आधार कार्डास मोठयांस प्रमाणात मान्यता असताना हे कार कश्यासाठी हवे नागरिकांची  आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड या सारखी कार्ड सांभाळतं दम होत असताना हे नवीन कार्ड कश्यासाठी अशा प्रश्न उपस्थित करत विरोधक या कार्डाचा विरोध करत आहेत.त्याचप्रमाणे या कार्डात  बंधनकारक असलेल्या रिचार्जचा मुद्दा देखील विरोधक उचलून धरत आहेत . 

सरकारचा मते सरकारकडून देण्यात आलेल्या सोयीसवलतीचा गैरफायदाघेण्यात येऊ नये . एसटी ज्या ५२ प्रकारच्या समाज घटकांना सवलती  देते त्याच्यामुळे एसटीचा जो महसूल बुडतो त्याचे अचूक मोजमाप व्हावे तसेच प्रवासादरम्यान अनेकदा येणारी सुट्ट्या पैश्याची  अडचण दूर होत कंडक्टर या कर्मचारी वर्गाचा त्रास कमी व्हावा या साठी हे कार्ड आवश्यक आहे सध्या एसटी प्रवाश्यासाठी वापरण्यत येणारी हे कार्ड पुढे अन्य सेवेसाठी देखील वापरता योग्य करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत 

मी एसटी महामंडळाच्या आवडेल तिथे प्रवास या योजनेचा फायदा घेत महाराष्ट्राचा कानाकोपरा पालथा घातला आहे. मी एसटीप्रमाणे रेल्वच्या युटीएस ऍप्लिकेशन तसेच सध्याच्या रेलवन  या ऍप्लिकेशन चा वापर करत मोठ्या प्रमाणात रेल्वेप्रवास देखील केला आहे.  त्याच्या आधी मी रेल्वेचे कार्ड सुद्धा वापरत असे. या अनुभवानुसार सांगतोय या सारखे  कार्ड वाटतात  तितकी  अवघड नाहीत ही कार्ड सहजतेने वापरता येण्यासारखी आहेत. आणि हे कार्ड कंडक्टरला  फक्त दाखवायचे आहे त्या कार्डवरून तो स्वतःच तिकीट काढून देणार आहे रेल्वेत जसे स्वतःला तिकीट काढावे लागते तसे तिकीट काढायचे नाहीये  मला रेल वन चा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे आज मी जनरल तिकीट असले तरी कधीही रेल्वे स्टेशनवर कधीही उभा राहत नाही घरातून रेल्वे स्टेशनवर जातानाच मी तिकीट काढले असते . 

आजकल काही अपवाद वगळता इंटरनेटची साक्षरता मोठ्या प्रमाणात आहे.  काही साठीच्या उबरठ्यार असलेल्या ग्रामीण महिला वगळता सर्वांना किमानपक्षी  इंटरनेटची  ओळख असल्याचे माझे निरीक्षण आहे कोणतीही नवीन गोष्ट अमलात आणताना काही प्रमाणात अडचीण येतच असतात त्यासाठी सुधारणाच स्वीकारायचा नाहीत असे म्हणणे चुकीचं असते कॉम्पुटर जेव्हा भारतात पहिल्यांदा आला तेव्हा त्यावर मोठा वाद झाला होता .आज कॉम्पुटर च्या जोरात उभी असलेल्या आयटी उद्योगामुळे भारताची जगात एक नवीन ओळख झाली आहे त्याच कोसटीवर आपण या निर्णयाकडे बघायला हवे  

मात्र असं असले तरी याची अंमलबाजवणी करताना काही प्रमाणात दिसाळपणा झाला हे मान्य करायलाच हवे .लोक कोणताही बदल सहज स्वीकारत नाहीत त्यांना कधीकधी सक्ती करून निर्णयाची अंमलबाजवणी करावी लागते हे मान्य केले तरी या निर्णयाची सक्ती करताना पुरेशी कार्ड उपलब्ध आहेत ना ? नागरिकांनी मोठया संख्येने ती काढायला गर्दी केली तरी ती हाताळायला पुरेशी यंत्रणा आहे का ? तसेच या बाबत पुरेशी जजागृती करण्यात आलेली आहे का ? याबाबत पुरेशी काळजी घेण्यात आली  नाही असे मला आता या बाबत ज्या बातम्या ऐकायला आणि वाचायला मिळत आहेत त्यावरून वाटत आहे . एकंदरीत एका वाक्यात एन एम सी सी कार्डबाबत बोलायचे झाल्यास  निर्णय योग्य मात्र अमंलबजवाणीत दिसाळपणा असेच म्हणावे लागेल . 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास