त्यांचा अनुभवातून आपण शिकणार ना ?
मी आपणाशी हा संवाद साधताना (17सप्टेंबर ) उझबेकिस्तान देशातील समरकंद या शहरात 46 व्या बुद्धिबळ ओलंपियाडची सुरुवात झाली आहे. तर जपानमध्ये असे खेळाची सुरुवात होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. स्पर्धांच्या आयोजनाचा विषयीचा ज्या बातम्या या स्पर्धेच्या आधी आल्या. त्या कोणत्याही जागतिक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशासाठी खूप काही शिकवून देणाऱ्या होत्या. खेळाडूंना राहण्यासाठी योग्य सुविधा नसणे हा मुद्दा दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. बुद्धिबळ ओलंपियाड चा विचार करता नाशिकचे भूषण ग्रँडमास्टर विदित गुजराती यांनी केलेले ट्विट आपणास खूप काही शिकवून जाते. समरकंद येथे होणाऱ्या बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये आयोजकांकडून भारतीय संघाला खूप उशिरा राहण्याची सोय करून देण्यात आली. आणि ही फक्त भारताचीच तक्रार नव्हती अन्य देशातील खेळाडूंनी सुद्धा समरकंद येथील राहण्याच्या सोयीबाबत ना पसंती दर्शवली आहे जपानमध्ये सुद्धा खेळाडूंना राहण्यासाठी हॉटेल रूम नाही तर जहाजे आणि अन्य तंबूमध्ये राहण्याची सोय केल्याच्या बातम्या येत आहेत. हॉटेलमधील रूम्स देखील खूप छोट्या आणि असूविधांनी परिपूर्ण अस...