त्यांचा अनुभवातून आपण शिकणार ना ?
मी आपणाशी हा संवाद साधताना (17सप्टेंबर ) उझबेकिस्तान देशातील समरकंद या शहरात 46 व्या बुद्धिबळ ओलंपियाडची सुरुवात झाली आहे. तर जपानमध्ये असे खेळाची सुरुवात होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. स्पर्धांच्या आयोजनाचा विषयीचा ज्या बातम्या या स्पर्धेच्या आधी आल्या. त्या कोणत्याही जागतिक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशासाठी खूप काही शिकवून देणाऱ्या होत्या. खेळाडूंना राहण्यासाठी योग्य सुविधा नसणे हा मुद्दा दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. बुद्धिबळ ओलंपियाड चा विचार करता नाशिकचे भूषण ग्रँडमास्टर विदित गुजराती यांनी केलेले ट्विट आपणास खूप काही शिकवून जाते. समरकंद येथे होणाऱ्या बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये आयोजकांकडून भारतीय संघाला खूप उशिरा राहण्याची सोय करून देण्यात आली. आणि ही फक्त भारताचीच तक्रार नव्हती अन्य देशातील खेळाडूंनी सुद्धा समरकंद येथील राहण्याच्या सोयीबाबत ना पसंती दर्शवली आहे जपानमध्ये सुद्धा खेळाडूंना राहण्यासाठी हॉटेल रूम नाही तर जहाजे आणि अन्य तंबूमध्ये राहण्याची सोय केल्याच्या बातम्या येत आहेत. हॉटेलमधील रूम्स देखील खूप छोट्या आणि असूविधांनी परिपूर्ण असल्याच्या बातम्या येत आहेत. जपानमध्ये होणाऱ्या आशियाई गेम्स मध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यानंतर क्रिकेट प्रेमी व्यक्तींकडून अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत. क्रिकेटसाठी आवश्यक असणारे पीच योग्य नाहीये तसेच ग्राउंड ची स्थिती सुद्धा फारच दयणीय असल्याच्या शंका क्रिकेटप्रेमी उपस्थित करत आहेत. नुकत्याच ग्लासको येथे झालेल्या कॉमनवेल स्पर्धेत सुद्धा आर्थिक ताण कमी करण्याच्य उद्देशाने खेळांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली होती.
आपल्या भारतात ऑलम्पिक चे आयोजन करण्यात यावे यासाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. या ऑलम्पिक तयारीचा भाग म्हणून पुढील कॉमेंनवेल्थ गेम आपल्या भारतात होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुढच्यास ठेच आणि मागच्या शहाणा या म्हणीचा आधार घेत आपण या अनुभवाकडे बघायला हवे.उझबेकिस्तान आणि जपान मध्ये ज्या अडचणींना खेळाडूंना सामोरे जावे लागले त्या आपण टाळायलाच हव्या. निव्वळ पैसा असून सुद्धा स्पर्धेचे आयोजन करता येतेच असे नाही. तर त्यासाठी खेळाडूंच्या अडचणींची जाणीव असणे सुद्धा आवश्यक आहे खेळाडूंना खेळण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणे आवश्यक आहे तरच ते स्पर्धेत उत्तम कामगिरी करू शकतात. त्या अनुकूल वातावरणामध्ये खेळाडूंना विश्रांतीची पुरेशी सोय आहे का हे बघणे आवश्यक ठरते याची जाण आयोजकांना असावी आता जपानमध्ये ज्या क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. त्याच्या आयोजनाच्या बाबत बोलायचं झाल्यास खेळाडूंना अत्यंत छोट्या रूम्स देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये ते जेमतेम राहू शकतील एवढेच त्याची जागा आहे क्रिकेटर्सच्या किटला ठेवायला जागाच नसल्याचा बातम्या येत आहेत. या अडचणींच्या पुढील आयोजकाने विचार करणे आवश्यक आहे
खेळाचे आयोजन म्हणजे फक्त क्रीडांगणाची निर्मिती असेच नव्हे तर खेळाडूंच्या राहण्याचे सोय सुद्धा करणे आवश्यक असते हे आपण उझबेकीस्तान आणि जपानच्या उदाहरणात बघतच आहोत. जपानच्या उदाहरणात तर
आपण क्रिकेटचेचे उदाहरण बघितल्यास क्रीडांगणाची निर्मिती करणे सुद्धा कठीण असल्याचे आपल्याला दिसून येते. कॉमन वेल्थ स्पर्धेत जे खेळ खेळण्यात येतात त्यातील काही खेळांची नावे सुद्धा भारतीयांना माहिती आहेत का ? असा प्रश्न उपस्थित व्हावा. अशी स्थिती आहे आता नावेच माहिती नसतील तर ते खेळ कसे खेळतात त्यासाठी काय सोय लागतात हे माहिती नसणारच क्रिकेट संदर्भात जपान ज्या अडचणींना सामोरा जात आहे. त्या प्रकारच्या अडचणी आपल्याला सुद्धा येणार आहेत. आपण एक वेळ खेळाडूंच्या राहण्याची उत्तम सोय करू मात्र क्रीडांगणाचे काय हा प्रश्न आहेच.
आर्थिक अडचणीचे कारण देत ग्लास्को येथे झालेल्या कॉमनवेल स्पर्धेत क्रीडा प्रकाराची संख्या थेट अर्ध्यावर आणण्यात आली होती माझ्या मते भारताने किंवा भारतासारख्या देशांनी ज्यांना मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याची इच्छा आहे त्यांनी हा मुद्दा सुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे. कारण अनेकदा क्रीडा स्पर्धेसाठी उभारलेल्या क्रीडांगणाचा उपयोग पुढे अनावश्यक कामासाठीच होतो हा इतिहास आहे आहे पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल हे त्याचे अत्यंत जळजळीत उदाहरण म्हणता येऊ शकते सध्या बालेवाडी क्रीडा संकुल हे लग्न आणि त्यासारख्या कामासाठी देण्यात येते, आणि हे फक्त बालेवाडीतच घडत आहे असं नाही जगभरात असाच सर्वसाधारण अनुभव आहे त्यामुळे त्यामुळे या क्रीडांगणाची निर्मिती करताना लागणारा पैसा पुढच्या वेळेस व्यर्थ जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे काळजी घेतली तरच आधीचा ग्लासको कॉमनवेल्थगेम जपान मधील आशियाई गेम आणि समरकंद येथील चेसओलंपियाड या स्पर्धेच्या आयोजनातील चुकांमधून काही आपण शिकलो असेच म्हणावं लागेल





टिप्पण्या