या भेसळीला रोखणार कोण?


 सध्या सर्वत्र अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ व रोखण्यासाठी अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी टाकलेल्या विविध धाडींमुळे अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ विशेष चर्चेत आहे हे आपण जाणतातच. अन्नपदार्थात होणारे भेसळ ही मानवी शरीरास अपायकारक असल्याने वाईटच त्याच्यावर कारवाई होणे हे यात गैर काही नाही. टाकण्यात आलेल्या विविध धाडींमध्ये मात्र एका अन्नपदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळी बाबत काहीच बोलले जात नसल्याचे मात्र माझ्या निरीक्षण आहे. ही भेसळ आहे शेवेची. डाळी पसून तयार होणारे शेव ही कोणत्याही पदार्थात मिक्स करण्याची पद्धत पुणे शहरात तरी मला खूप मोठ्या प्रमाणात किमान पुण्यातील मध्यवर्ती भाग समजण्यात जाणाऱ्या टिळक रोड परीसरात दिसतेयं

पुलाव सारख्या पदार्थांवर सुद्धा शेव  टाकलेली मी बघितलेली आहे पूर्वी फक्त पोह्यात असणारी शेव एकेठिकाणी शिऱ्यात टाकलेली सुद्धा एका ठिकाणी बघितलेली आहे. पोषण मूल्यांच्या दृष्टीने शेवेची घुसखोरी ही शरीरास अपायकारक नसली तरी मात्र जिभेचा स्वादाचा विचार करता मात्र पूर्णतः वाट लावणारी आहे. हे नाकारता येणे शक्यच नाही शेवेमुळे मूळ पदार्थाची चव सुधारते असा लोकांच्या काय गैरसमज आहे हे मला पडलेले एक मोठे कोण आहे. उलट पदार्थाची चांगली चव बिघडायची असल्यास शेवेच्या आधार घेता येऊ शकतो असे माझे मत आहे

 ही शेव होते डाळीपासून. डाळीमध्ये प्रतिमा आहेत. पण चव फारसी नाहीये असं माझं मत आहे. शेवेच्या विविध चवी आहेत हे मला माहिती आहे. मात्र कोणत्याही चवीची शेव ही मूळ पदार्थाची चव मात्र बिघडवते हे मात्र नक्की. आपण असेही म्हणू शकतो की मूळ चवच बिघडलेली असल्याने ते लक्षात येऊ नये म्हणून त्यात अजून बिघडावी म्हणून शेवेची निर्मिती करण्यात आलेली आहे.

शेव पदार्थाच वाईट आहे असं म्हणता येऊ शकत नाही असे खायचे असल्यास वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र्यपणे खा पण परंतु पोहे शिरा पुलाव इडली सांबार यासारख्या पदार्थांमध्ये शेव टाकून त्या पदार्थाची मूळ चवच लक्षात येणार नाही असे का करण्यात येत असावे. पदार्थाची चव ही तसेच तसीच ठेवली तर विक्री कमी होईल असं का विक्रेत्यांना वाटतं यासारख्या असंख्य प्रश्न यामुळे निर्माण झालेले आहेत ज्याची उत्तरे मिळणे हा मूळ पदार्थाची चव आवडणाऱ्या व्यक्ती म्हणून माझा जन्मसिद्ध हक्क नाही का ?

पूर्वी पदार्थात शेव टाकायचे ते मोजक्या पदार्थात. आता मात्र ही घुसखोरी प्रचंड वाढली आहे. शेव न टाकलेला पदार्थ दाखवा हजार रूपये मिळवा,असी आताची स्थिती आहे.पु्र्वी शेव टाकत नसताना त्यावेळी जी पदार्थांची चव असेल तीच  पुन्हा मिळावी असे मनोमन ठरवत मी चाललो भेसळयुक्त म्हणजे शेवयुक्त पोहे खायला मग येताय ना मग!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास