पोस्ट्स

ऑक्टोबर १८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सवलती आवरा कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद घ्या

इमेज
गुरुवार 15 ऑक्टोबर रोजी आपल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या बाबत दोन बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यातील एक होती यंदाचा दिवाळीच्या सुट्टीच्या हंगामात आपल्या महामंडळाच्या बसचे भाडे न वाढवण्याची तर दुसरी होती आपल्या प्रलंबित मागण्यासाठी ज्यात मुख्यत: आर्थिक मागण्या प्रामुख्याने आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संभाव्य संप हा 7 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे ही. महाराष्ट्र एसटी महामंडळात या दोन बातम्या हेडलाईन्स होत असताना आपल्या शेजारच्या अर्थात गुजरात मध्ये सुद्धा एसटी महामंडळ विषयी  एक घडामोडी घडली. ती होती गुजरात राज्य परिवहन महामंडळ अर्थात गुजराती एस टी चा कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात दोन टक्क्यांची वाढ होत तो आता 60 टक्के झाल्याची. तसं वर बघायला गेल्यास अनेकांना महाराष्ट्र राज्याची एसटी आणि गुजराती एसटी यांची तुलना करणे अप्रस्तुत चुकीचे वाटेल  मात्र तसं नाहीये. आपल्या भारत सरकारने संसदेत 1956 साली सार्वजनिक वाहतूक परिवहन कायदा संमत केला त्यानंतर विविध राज्यात त्या त्या राज्यांच्या राज्य परिवहन व्यवस्था अर्...