फास्टर फेणे-बालसाहित्यातील नायकांचा महामेरू
बाल साहित्य! लहान मुलांमधून मोठे मोठे वाचक घडावे. त्यांना लहानपणीच वाचनाची आवड लागावी यासाठी त्यांचा भाव विश्वासी मिळते जुळते असणारे आणि त्यांना रुचेल भावेल समजेल अशा पद्धतीने तयार केलेले साहित्य म्हणजे बाल साहित्य. सध्या साहित्यातील हा प्रकार काहीसा मागे पडलेला असला, अडगळीत गेलेला असला तरी सुद्धा श्यामची आई, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, गोट्या यासारखे अनेक नायक हे मराठीमध्ये बाल साहित्यात अजरामर झालेले आहेत. फास्टर फेणे एक साधारणत 12 ते 15 वर्षाचा चणाक्ष, चुणचुणीत, काहीशा हाडकुळा मात्र बुद्धीने अत्यंत तीक्ष्ण असलेला एक कुमार वयीन डिटेक्टिव्ह. मराठीतील एक प्रतिभावान लेखक भा.रा. भागवत यांच्या कल्पनेतून साकारलेला पुणे शहराचे एक महत्त्वाचे असणाऱ्या उपनगथ हडपसर परिसरात वास्तव्यास असणारा मुळचा फुरसुंगीचा असलेला बबन फेणे अर्थात फास्टर फेणे. विद्याविहार या शाळेत वस्तीगृहात रहात शिकत असताना बबन फेणे आपल्या अत्यंत जवळचा मित्र सुभाष देसाई, मामेबहीण माली यांच्या मदतीने, गुन्ह्यांची उकल करतो त्याच्या या गुन्हांच्या तपासकथा भा.रा. भागवत यांनी विविध कथा...