महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील बाप्पा


 महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव अशी ओळख असलेल्या गणेशोत्सवामध्ये आता आपण  नेहमीप्रमाणे रंगून गेलेलो आहोत. बुद्धीची देवता तसेच विघ्नहर्ता असे ओळख असलेल्या गणपतीला आपल्या महाराष्ट्र बरोबर अन्य ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुजले जाते. स्थानपर्त्वे काही प्रमाणात बदल मात्र होतात हे बदल प्रमुख्याने आरती आणि गणरायाची विविध स्तोत्र मध्ये असतात‌. आरती मधील बदल प्रमुख्याने भाषेचा विविधतेने तयार झालेल्या असतात असे महाराष्ट्राचे मराठी, गुजरातची गुजराती, गोव्याची कोकणी कर्नाटकचे कन्नड मध्यप्रदेशची हिंदी असे बरोबरच त्या राज्यातील ऐतिहासिक राजे राजवाडे आणि शासन व्यवस्था याच्या देखील परिणाम आरती बदल वर होतो उदाहरणार्थ गोव्यामध्ये बराच का पोर्तुगीज सत्ता होती या काळात हिंदू धर्मांचा सण सादर करण्यावर मोठ्या प्रमाणात बंधने आली त्याचा परिणाम स्वरूप महाराष्ट्राचा अगदी शेजारी असून सुद्धा गोव्याच्या गणेशोत्सव थोडा वेगळा स्वरूपात साजरा होतो. स्थानिक खाद्यपदार्थ यांच्या देखील काहीसा प्रभाव आपल्याला गणपती पूजनावर पडलेला दिसतो म्हणजेच उदाहरणार्थ केरळमध्ये जी गणपतीची पुजा होते त्यामध्ये प्रामुख्याने विविध खाद्यपदार्थांचा समावेश जास्त प्रमाणात केला आहे म्हणजेच माझा गणपती अय्यम आणि विविध प्रकारचे लोणची चाखतो. अशा पद्धतीने मल्याळम भाषेतील गणपती स्तोत्रे आहेत

 

विविध कारणांमुळे आज महाराष्ट्राचा शेजारील राज्यांमध्ये आपले मराठी बांधव मोठ्या प्रमाणात राहत आहेत त्यामुळे आपला गणेशोत्सव सुद्धा त्या राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो अर्थात या आधी मी  सांगितले तसे स्थानिक परंपरा यांचा प्रभाव पडलेलाच आहे चला तर जाणून घेऊया आपल्या शेजारील राज्यांमध्ये कोणत्या प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो 

 सर्वप्रथम जाऊया आपला महाराष्ट्राचा भाऊ म्हणता येऊ शकेल असा राज्यात अर्थात गुजरात राज्यात. मी  गुजरात राज्याला महाराष्ट्राचा भाऊ म्हटलं कारण 1960 पूर्वी मराठी आणि गुजराती या दोन भाषांचे मिळून एकच राज्य होते पुढे त्याचे दोन राज्य झाली म्हणून म्हटले भाऊ राज्य.

 गुजराती भाषिकांमध्ये महाराष्ट्रात आढळते सुखकर्ता दुःखहर्ताप्रमाणे एकच आरती नसते हं. गुजरातीमध्ये गणेशपूजेच्या वेळी विविध प्रकारच्या आरत्या स्तुती म्हटल्या जातात. यापैकीहिंदी असलेली जय गणेश जय गणेश देवा हिंदी  आरती  मोठ्या प्रमाणावर गायली जाते. त्याचबरोबर गुजराती भाषेत गणेशाची स्तुती करणाऱ्या रचना, भजने आणि प्रार्थना स्थानिक परंपरेनुसार म्हटल्या जातात. ही आरती पुढीलप्रमाणे असते

 

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

माता जाकी पार्वती पिता महादेवा

एकदंत दयावंत चार भुजाधारी


मस्तक पर सिंदूर सोहे, मूषक की सवारी

अंधन को आँख देत, कोढिन को काया

बांझन को पुत्र देत, निर्धन को माया

पान चढै, फूल चढै और चढै मेवा

लड्डुअन का भोग लगे, संत करें सेवा

दीनन की लाज राखो, शंभु-सुत वारी

कामना को पूरी करो, जग बलिहारी

 

गुजरात नंतर जाऊया आपण गोवा राज्यात गोवा राज्य मी निवडले. कारण मराठी संस्कृतीचा प्रभाव महाराष्ट्राच्यानंतर कोणत्या राज्यात असेल तर तो आहे गोव्यात.गोव्यात गणेश चतुर्थीला ‘चवथ’ किंवा ‘चोवथ’ म्हटले जातेयेथे गणेशोत्सवाचे स्वरूप महाराष्ट्रापेक्षा अधिक घरगुती आणि कुटुंबकेंद्रित आहेअनेक कुटुंबे गणपतीच्या आगमनासाठी मूळ गावी एकत्र येतात आणि पूजासामूहिक प्रार्थनापारंपरिक संगीत  नैवेद्य यांना महत्त्व देतात.

गोव्यात कोकणी ही प्रमुख सांस्कृतिक भाषा असल्यामुळे गणपतीसमोर कोकणी भक्तिगीते  प्रार्थना म्हटल्या जातातमात्र त्यासाठी संपूर्ण गोव्यात एकच निश्चित ‘गणपतीची आरती’ आहे असे सांगणे योग्य ठरणार नाही

वेगवेगळ्या समाजगाव आणि कुटुंबांच्या परंपरेनुसार आरती बदलू शकते.गोमंतकीय हिंदू घरांमध्ये महाराष्ट्रातील ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, ‘शेंदूर लाल चढायो’ यांसारख्या आरत्याही ऐकायला मिळू शकतातत्यामुळे गोव्याची गणपती आरतीपरंपरा ही कोकणी स्थानिक परंपरा + महाराष्ट्राशी असलेले सांस्कृतिक संबंध यांचा सुंदर संगम आहे.

 गोव्यानंतर आपण जाऊ मराठीचा सर्वात पहिला उल्लेख आढळतो  त्या राज्यात अर्थात कर्नाटक मध्येहो कर्नाटक मधील श्रवणगोळ  येथे मराठीचा येथे मराठ उल्लेख आढळतो 

कर्नाटकात गणपतीला ‘ಗಣಪತಿ’ (गणपती), ‘ವಿನಾಯಕ’ (विनायककिंवा ‘ವಿಘ್ನೇಶ್ವರ’ (विघ्नेश्वरअशी नावे प्रचलित आहेतगणेश चतुर्थीच्या पूजेत कन्नडमधील गणेशस्तोत्रेश्लोक आणि भक्तिगीते म्हटली जातातकन्नड धार्मिक परंपरेत गणेशाची स्तुती करणाऱ्या जुन्या रचनांनाही स्थान आहेउदाहरणार्थमाध्व परंपरेतील संत वादिराजांच्या गणेशस्तुतीचा उल्लेख अलीकडील कन्नड लेखनात आढळतो.

कन्नडमध्ये गणपतीसमोर म्हटली जाणारी एक प्रचलित स्तुती अशी आहे

ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ 

ಗಜಾನನಂ ಭೂತಗಣಾದಿ ಸೇವಿತಂ 

ಕಪಿತ್ಥ ಜಂಬೂಫಲಸಾರ ಭಕ್ಷಿತಮ್ 

ಉಮಾಸುತಂ ಶೋಕ ವಿನಾಶಕಾರಣಂ 

ನಮಾಮಿ ವಿಘ್ನೇಶ್ವರ ಪಾದಪಂಕಜಮ್ 

मराठी उच्चार :

श्री गणेशाय नमः 

गजाननं भूतगणादि सेवितं 

कपित्थ जम्बूफलसार भक्षितम् 

उमासुतं शोक विनाशकारणम् 

नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् 

त्तीचे मुख असलेल्याशिव-पार्वतीच्या पुत्रालासर्व विघ्ने  दुःख दूर करणाऱ्या विघ्नेश्वराच्या चरणकमळांना मी नमस्कार करतो असा याचा अर्थ घेता येईल. 

 

कर्नाटक नंतर  आपण जाऊ ज्या शासनकर्त्यांच्या  नियंत्रणात महाराष्ट्राच्या बराच मोठा सध्याच्या विचार करता मध्य भागात असणाऱ्या मराठवाडा या भागाचे  नियंत्रण होते त्या हैद्राबादच्या निजामाच्या राज्यात अर्थात सध्याचा तेलंगणात.   तेलंगणात गणपतीला प्रामुख्याने ‘వినాయకుడు’ (विनायकुडुकिंवा ‘గణపతి’ (गणपतीम्हटले जातेगणेश चतुर्थीला ‘వినాయక చవితి’ (विनायक चवितीअसे म्हणतातघराघरांत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा केली जाते२०२६ मध्ये

ही तेलंगणात १४ सप्टेंबरला विनायक चवितीची पूजा करण्यात आली.

तेलुगू भाषेत गणेशाची स्तुती करणाऱ्या रचना म्हटल्या जातातउदाहरणार्थगणेशाला उद्देशून अशी प्रार्थना केली जाते

వక్రతుండ మహాకాయ

సూర్యకోటి సమప్రభ 

నిర్విఘ్నం కురుమే దేవ

శుభకార్యేషు సర్వదా 

मराठी उच्चार :

वक्रतुंड महाकाय

सूर्यकोटी समप्रभ 

निर्विघ्नं कुरुमे देव

शुभकार्येषु सर्वदा 

 हे वक्रतुंडविशाल शरीराचे आणि कोट्यवधी सूर्यांप्रमाणे तेजस्वी गणेशामाझी सर्व शुभ कार्ये नेहमी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत.असे आपण म्हणू शकतो

तेलंगणातील हैदराबादचा खैरताबाद गणपती हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा विशेष प्रसिद्ध केंद्रबिंदू आहेमात्र घरगुती पूजेत स्थानिक तेलुगू भक्तिगीतेस्तोत्रे आणि संस्कृत श्लोक यांचे मिश्रण अधिक दिसते.

 तेलंगणा नंतर आपण जाऊ त्या राज्याच्या बराच मोठा भाग हा मराठी भाषिकांचा नियंत्रणात होता किंबहुना त्या राज्याची राजधानीच मुळी मराठी भाषिकांच्या भागात अर्थात  नागपूर होती त्याच

अर्थात ‌‌ छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये 

 या भागातशेंदूर लाल चढायो’ ही गणपतीची अत्यंत लोकप्रिय आरती असून ती प्रामुख्याने हिंदी/ब्रजभाषेच्या स्वरूपातील शब्दांत गायली जातेउपलब्ध स्रोतांमध्ये तिच्या तीन कडव्यांसह ध्रुवपदाची रचना आढळते.

 श्री गणपतीची आरती 

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको 

दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको 

हाथ लिये गुडलड्डू साईं सुरवरको 

महिमा कहे  जाय लागत हूँ पदको ॥१॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता 

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरी 

विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी 

कोटीसूरजप्रकाश ऐसी छबि तेरी 

गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता 

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥

भावभगत से कोई शरणागत आवे 

संतत संपत सबही भरपूर पावे 

ऐसे तुम महाराज मोको अति भावे 

गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता 

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥ 

पहिल्या कडव्यात गणपतीच्या गजमुख रूपाचेलंबोदर स्वरूपाचे आणि हातातील लाडूचे वर्णन आहेदुसऱ्या कडव्यात गणपतीला अष्टसिद्धींचा स्वामीविघ्नांचा नाश करणारा आणि मंगलमूर्ती म्हणून वंदन केले आहेतिसऱ्या कडव्यात भावपूर्ण भक्तीने गणपतीला शरण जाणाऱ्या भक्ताला संपत्तीसुख आणि कृपा प्राप्त होतेअशी श्रद्धा व्यक्त केली आहेशेवटी रचनाकार गोसावीनंदन गणपतीचे गुणगान करीत असल्याचे नमूद केले आहे.असे आपण सर्वसाधारणपणे म्हणू शकतो 

 

आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील या राज्यांखेरीज बंगाल तामिळनाडू ओडिसा या राज्यातील मोठ्या प्रमाणात गणपतीची पूजा केली जाते मी सुरुवातीला सांगितले तसेच थोडे वेगा पद्धतीने त्याविषयी पुढच्या भागात बोलूया तोपर्यंत सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

 

या लेखासाठी गुजराती मातृभाषा असलेल्या मात्र आजोबापासून  नाशिक येथे राहणाऱ्या तेजस जोशी  तसेच मूळचा गोवा राज्यात थिवीम येथील  असंणाऱ्या  मात्र बराच काळ पुणे शहरात राहणाऱ्या अमेय किंजवडेकर या दोन मित्रांची तसेच इंटरनेटची मदत घेण्यात आली आहे 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास