डोरेमॉनचा मृत्य होणार ?

डोरेमॉनचा मृत्य होणार ? चमकलात ना, आपण बरोबर वाचत आहे ना?असे आपणास वाटत असेल तर सांगतो,आपण योग्यच वाचत आहे. विविध मनोरंजनाशी संबंधित युट्युब चॅनेलवर सांगण्यात आलेल्या माहितीनुसार इंडोनेशियानंतर आपल्या भारतात डोरेमॉनचे कार्टून दाखवणे बंद करण्यात येणार आहे.  डोरेमॉनचे कार्टून दाखवणे बंद झाल्यामुळे तो एक प्रकारे डोरेमॉनचा मृत्यच असेल ना ?

डोरेमॉनचे कार्टून बघितल्याने मुले नोबितासारखी आळशी,आणि मंदबुद्धी होत आहेत, म्हणून हे पाउल उचलावे लागले असे याबाबत इंडोनेशियनन सरकारची मालकी असलेल्या राष्ट्रीय वाहिनीच्याअधिकाऱ्यांनी सागितले होते.आता तोच हास्यास्पद मुद्दा घेत भारतात सुद्धा डोरेमॉन बंद करण्याचा बाबत हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. टी.व्ही.चा लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात परीणाम होतो.तसेच मानवी मन सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेकडे सहजतेने झुकते.हा मुद्दा जरी क्षणभर मान्य केला.तरी नोबितामुळे थेट बंद करण्याचा निर्णय माझ्यामते रोगापेक्षा इलाज भयंकर या वर्गवारीत मोडतो.

पालकांनी आपली पाल्ये  हुशार असलेल्या डेकीसुकी किंवा सर्वांना समजून घेणाऱ्या सिजूकाचा आदर्श कोणत्या पद्धतीने घेतील, याकडे लक्ष द्यावे, असे मला वाटते. कोणतीही गोष्ट पुर्णत: निर्दोष किंवा उत्तम नसते.प्रत्येक गोष्टीत काहीतरी दोष असतोच, त्यामुळे त्यातील दोषांची मात्रा कोणत्या पद्धतीने कमी करता येईल असा विचार करत,त्यातील चांगल्या गोष्टींचा अधिकाधीक फायदा कोणत्या पद्धतीने घेता येईल, असा दृष्टिकोन जगात सर्वत्र अंमलात आणला जातो, तोच दृष्टीकोण याबाबत घेतला जावा असे मला वाटते.यासाठी हा कार्यक्रम बघणाऱ्या मुला मुलींनी डेकीसुकी किंवा सिजूकाचा आदर्श घ्यावा असी ओळ टिव्हीवर दाखवता येईल.आता लहान मुलामुलींना ते समजेल का, त्यांंना वाचता येईल का, असी शंका काहीजण उपस्थित करतील माझे त्यांना सांगणे आहे की, अगदी लहान मुलांना ते समजणार नाही हे नक्की पण थोड्या मोठया मुला -मुलींना ते नक्की समजेल.

काही जण डोरेमॉन जपानी आहे, आता छोटा भीम, जय हनुमान सारखे भारतीय पर्याय उपलब्ध आहेत असे म्हणतील तर मी त्यामध्ये सांगू इच्छितो की, छोटा भीममध्ये  सुद्धा कालिया आणि छोटा भीम यांच्यात भांडणे दाखवले आहेत तसेच कालिया देखील नोबिता सारखा  अकार्यक्षम आहेच‌.तसेच अब्राहम लिंकन यांच्या सुप्रसिद्ध शिक्षकास पत्राचा संदर्भ घेऊन बोलायचे झाल्यास सौम्य पद्धतीने का होईना जगात चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात.हा संस्कार सुक्ष्म पातळीवरचा का असेना देयला नको का ? माझ्यामते डोरेमॉन तेच काम करतो.दुर्देवाने हा संस्कार  इतर कार्टून करत नाहीत असे माझे निरीक्षण आहे. 
तरी डोरेमॉन बंद होणे म्हणजे चुकिचेच!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !

31वर्षे अभिमानाची*

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक