मनोव्यथा राजहंसाची
काही दिवसापूर्वी मराठीतील एक सुप्रसिद्ध साहित्यकार गजानन दिंगबर माडगूळकर अर्थात ग . दि .मा यांच्या पुणे शहरातील बंगल्याविषयीच्या उलट सुलट बातम्या सोशल मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये ‘आपण वाचल्या असतीलच. मला त्या वादात पडायचे नाही. गीत रामायण सारखी अवीट भक्तीने भरलेली रचना करणाऱ्या या साहित्यिकाच्या गीत रामायण सोडून अनेक साहित्यकृती देखील या अक्षरशः जीव ओवाळून टाकण्यासारख्याच आहे यातलीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे, ' एका तळ्यात होती,बदके पिल्ले सुरेख,होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक'
इतरांच्या पेक्षा वेगळी प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रतिभेची समाजाकडून यथोचित दाखल घेतली न गेल्याने त्यांना काय त्रास सोसावा लागतोय हे एका बदक आणि राजहंसचे प्रतीक वापरत अत्यंत सोप्या भाषेत यात
गदिमांनी मांडलंय . आपण जर समाजाकडे उघड्या डोळस नजरेने बघितले तर अशी प्रतिभेची योग्य प्रकारे दाखल न घेतलेली अनेक राजहंस दिसतात. आपल्यापेक्षा कमी प्रतिभा असलेली माणसे आपल्या पुढे जात आहेत हे बघताना त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल हे आपण त्या गाण्यातून समजावून घेऊ शकतो .एखाद्याकडे अपार क्षमता असते, पण परिस्थिती, संधीअभावी किंवा गैरसमजांमुळे ती दडपली जाते. अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनात आत्मविश्वास आणि वेदना यांची एक गुंतागुंतीची सांगड तयार होते. “मी काहीतरी करू शकतो” हा विश्वास त्याला पुढे ढकलत राहतो; पण “माझी दखल घेतली जात नाही” ही भावना त्याला आतून पोखरत असते .. हळूहळू हा संघर्ष त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाचा बळी घेतॊ. आपल्यातच काहीतरी कमी आहे हि भावना त्या व्यक्तीत येते मुळात त्याच्याकडे इतरांच्यापेक्षा जास्त प्रतिभा
असते . मात्र आपल्या मराठीत एक महान आहे गाढवाला गुळाची चव काय काय ? त्या म्हणीनुसार समाज गाढव होत होत त्या व्यक्तीच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष करतो . या अवस्थेत एकाकीपणाची जाणीव अधिक तीव्र होते. सभोवताल लोक असूनही, मन समजून घेणारा कोणी नाही असे वाटते. आपल्या कर्तृत्वाची ओळख न मिळाल्याने मनात एक खोल पोकळी निर्माण होते. .तरीही, “संधी मिळत नसेल, तर ती निर्माण करायची” हा विचार तिच्यात बळ निर्माण करतो. प्रत्येक अपयशातून शिकत, ती अधिक परिपक्व होत जाते.मग या परिपक्वतेतून अधिक प्रगल्भ झालेली व्यक्ती जेव्हा समाजापुढे येते तेव्हा मात्र अनेकांच्या पायाखालची वाळू अक्षरशः घसरते. देवाच्या दारात उशीर आहे मात्र अन्याय नाही याची साक्षच ती व्यक्ती देत असते असे म्हंटले तर फारशे वावगे ठरत नाही असेच या व्यक्तींकडून आपणस सहजतेने म्हणू शकतो हे मात्र नक्की




टिप्पण्या