नादवेध संगीताची अदभूत सफर घडवणारे पुस्तक
संगीत , आपल्या मानवी जीवनातील अविभाज्य घटक .मानवी जीवनातील ताण तणाव अडचणीनं क्षणभर का होईना विसरायला लावून मनुष्याला आनंदाचेक्षण समाधानाची अनुभूती करायला लावणारी अदभूत अशी नैसर्गिक शक्ती म्हणजे संगीत. .याच संगीताच्या या विलक्षण शक्तीमुळे वैद्यकीय उपचार पद्धतीत संगीताचा उपयोग मानसशास्त्रीय तसेच शारीरिक आजारांच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरतो. ‘म्युझिक थेरपी’द्वारे ताण, चिंता, नैराश्य यांसारख्या मानसिक आजारांमध्ये आराम मिळतो. शांत संगीत मन स्थिर करते, भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि सकारात्मक विचार वाढवते. शारीरिक आजारांमध्येही संगीत वेदना कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि झोप सुधारण्यास सहाय्यक ठरते. तसेच मेंदूच्या कार्यक्षमतेवरही चांगला परिणाम होतो. त्यामुळे औषधोपचारांसोबत संगीताचा वापर केल्यास रुग्णाच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळते.आपल्या प्राचीन ऋषीमुनींना संगीताच्या या सामर्थ्याचीजाणिवावं होती त्यामुळेच त्र्यांनी संगीताचे मानवी जीवनातील महत्त्व सांगताना सांगितले की
“साहित्यसंगीतकलाविहीनः
साक्षात् पशुः पुच्छविषाणहीनः।”
आताच्या मराठीत सांगायचे झाल्यास ज्या मनुष्याला साहित्य, संगीत आणि कला यांची आवड नसते, तो प्रत्यक्षात शेपूट आणि शिंगे नसलेला पशूच आहे
तर या संगीताचा विचार करता अत्यंत महत्वाचा धडक म्हणजे राग . सामान्यांना याची पुरेशी माहिती नसल्याने बहुसंख्य जनता याच्या पुरेपूर आंनद घेण्यास मुकते हे टाळले जावे या साठी मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असणारे अच्युत गोडबोले पुन्हा एकदा आपल्याला मदत करायला पुढे येतात त्यांनी सुलभ पिशवीकर त्यांच्या मदतीने लिहलेले 'नादवेध' हे पुस्तक आपली संगीतातील विविध रागाची नसलेली माहितीची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी करते .
‘नादवेध’ या पुस्तकाकडे ताच्या विश्वाचा सखोल आणि रसपूर्ण वेध घेणारे एक महत्त्वपूर्ण साहित्य म्हणून आपण सहज बघू शकतो. या पुस्र्कात या पुस्तकात भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या विविध पैलूंवर अत्यंत सोप्या, चटकन समजणाऱ्या मात्र वाचताना वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या भाषेत माहिती देण्यात आलेली आहे. संगीताची सुरुवात त्याची प्रगती तसेच स्वर, ताल आणि लय यांसारख्या मूलभूत घटकांची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे.



टिप्पण्या