इथेनॉलच्या चुलत भावाच्या दिनाच्या निमित्ताने
इथेनॉलच्या चुलत भावाच्या दिनाच्या निमित्ताने .. ! शीर्षक वाचून गड्बडलात का ? आधीच इथेनॉलमुळे गाड्या खराब होत आहेत. जिथे आठवड्याला एकदा गाडीच्या इंधनाची टाकी फुल केली तरी चालत होते तिथे मायलेज कमी झाल्याने आठवड्यातून दोनदा काही ठिकाणी तर तीनदा पेट्रोल भरायला जावे लागत आहे .या जास्त वेळा पेट्रोल भरायला जावे लागत असल्याने पाकिटावर जास्तीचा भर आला आहे तर या इथेनॉलला चुलत भाऊ देखील आहे विशेष म्हणजे त्याचा साठी एखादा आंतराष्ट्रीय दिन देखील साजरा करण्यात येतो असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनातशीर्षक वाचून आले असल्याची शक्यता आहे तर सांगतो
आजपासून १३३ वर्षांपूर्वी अचूकपणे सांगायचे झाल्यास १८९३ ऑगस्ट १० या दिवशी सर रुडॉल्फ डिझेल यांनी पारंपरिक कोळसा डिझेल यान पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून शेंगदाणा तेलाचा वापर करत पहिल्यांदा मॅकेनिकल्स इंजिन चालवले होते . या इंजिन चालवल्यामुळे जगात बायो डिझेल युगाचा प्रवास सुरु झाला तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत होत आज २०२६ साली डिझेलला तोडीस तोड
पर्याय म्हणून बायो डिझेल जगात अनेक ठिकाणी वापरले जाते जगात पहिल्यांदा बायो डिझेल १० ऑगस्ट १८९३ साली वापरले गेल्याने जगात १० ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय बायो डिझेल दिन म्हणून साजरा करण्यात येतो . योगायोगाने तोच माझा जन्म दिवस असल्याने आंतरराष्ट्रीय बायो डिझेल दिन आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी साजरे केले जातात असोआता आंतराष्ट्रीय बायो डिझल दिन आणि इथेनॉलचा काय संबंध इथेनॉल हा बायो डिझेलचा चुलत भाऊ कास असा प्रश्न तुम्हला पडला असेल तर सांगतो बायो डिझेल आणि इथेनॉल यांच्यात रासायनिक दृष्टया काही फरक असला तरी दोघेही जैविक इंधने या एकाच समूहात येतात . त्यामुळे ती सख्खे बहू म्हणता येत नसले तरी चुलत भाऊ नक्कीच म्हणता येऊ शकतात .
ऊर्जेच्या वाढत्या गरजा आणि खनिज इंधनांच्या मर्यादित साठ्यांमुळे पर्यायी ऊर्जा स्रोतांचा शोध अत्यंत आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर जैव इंधने ही एक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणून पुढे आली आहेत. वनस्पती, शेती अवशेष, सेंद्रिय कचरा आणि प्राणीजन्य पदार्थांपासून तयार होणाऱ्या इंधनांना जैव इंधने असे म्हणतात.जैव इंधनांचे प्रमुख प्रकार म्हणजे बायोडिझेल, बायोइथेनॉल आणि बायोगॅस.आहेत
बायोडिझेल हे वनस्पती तेलांपासून, बायोइथेनॉल साखरयुक्त पिकांपासून, तर बायोगॅस शेण व सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनातून तयार होते. ही इंधने नूतनीकरणक्षम असल्यामुळे दीर्घकालीन वापरासाठी उपयुक्त ठरतात. तसेच, कचऱ्याचा पुनर्वापर होऊन पर्यावरण संरक्षणालाही मदत होते.जैव इंधनांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते प्रदूषण कमी करतात. पारंपरिक इंधनांच्या तुलनेत यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते, त्यामुळे जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. तसेच, ही इंधने स्थानिक पातळीवर तयार करता येत असल्यामुळे आयात होणाऱ्या इंधनांवरील अवलंबित्व कमी होते आणि ऊर्जा स्वावलंबन साधता येते. सध्या केंद्र सरकार याच भूमिउकेतून इथेनॉल चा पेट्रोलमध्ये वापर करत आहेत .यात आता काही अडचणी उलट आहेत हे मान्य . मात्र कालांतराने यात नक्कीच सुधारणा होईल हेही आपण मान्य करायला हवे
त्यामुळे या प्रकारच्या इंधनाचे महत्व जगाला समजावे यासाठी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक बायो डिझेल दिनाचे महत्व आपला इथेनॉल ला कितीही विरोध असो आपल्यासाठी खूपच महत्वाचे आहे १० ऑगस्ट रोजी वाढदिवस असं;ए;या माझ्यासाठी तर थोडे अधिकच
ऊ



टिप्पण्या