राष्ट्रीय प्रतीकांच्या उभारणीची प्रेरणादायी गोष्ट- कथा विवेकानंद शिला स्मारकाची


 कन्याकुमारीअंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे वगळता भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक असलेले एक असे शहर आहेजिथे हिंदी महासागरअरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्र येतातजगात तीन समुद्र एकत्र येण्याची तीन ठिकाणे आहेतएक म्हणजे कन्याकुमारीतर अन्य दोन ठिकाणे अंटार्तिका खंडाजवळ आहेतमात्र जगभरात ज्या ठिकाणाजवळ वस्ती आहेअसे ठिकाण एकच कन्याकुमारी. (२०२१ मार्चमध्ये अंटार्तिका खंडाजवळच्या समुद्राला दक्षिण महासागर म्हणून जागतिक महासागर संघटनेने मान्यता दिल्याने प्रशांतहिंदी आणि दक्षिण या महासागर यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणी तसेच अटलांटिकहिंदी आणि दक्षिण महासागर एकत्र येण्याची ठिकाणे २०२१ नंतर नव्याने उदयास आली आहेत.)

या कन्याकुमारीचे मुख्य आकर्षण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी ज्या खडकावर बसून सलग तीन दिवस रात्र बसून ध्यान केलेत्या ठिकाणी उभारण्यात आलेले विवेकानंद शिला स्मारकआपण पर्यटक म्हणून या ठिकाणी सहजतेने भेट देतोमात्र त्याची उभारणी तितकी सोपी नव्हतीत्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलास्थानिक ख्रिस्ती धर्मीय लोकतत्कालीन तामिळनाडू येथील राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून विविध परवानग्या मिळवत तसेच नागरिकांकडून निधी संकलन करत माननीय एकनाथजी रानाडे यांनी या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केलीहा संपूर्ण संघर्ष विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित ‘कथा विवेकानंद शिला स्मारकाची’ या पुस्तकातून वाचावयास मिळतो.

कथा विवेकानंद शिला स्मारकाची’ हे पुस्तक रूढ अर्थाने एका वास्तूच्या निर्मितीचा इतिहास सांगणारे पुस्तक नाहीयेमोठे ध्येय समोर ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणेविविध व्यक्तींना जोडणेअडचणींवर मात करणे आणि समाजाच्या सामूहिक शक्तीला राष्ट्रकार्यात परिवर्तित करणेही कार्ये कोणत्या पद्धतीने आकारास येतात याचे संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यांसमोर येण्याचे काम पुस्तकातून घडते.

एखाद्या भव्य स्मारकाकडे पाहताना त्याची वास्तूभव्यता आणि कलात्मकता सहजपणे नजरेत भरतेमात्र त्या वास्तूमागे असलेला संघर्षत्यासाठी झटलेली माणसेत्यांचा संकल्प आणि समाजाचा सहभाग यांची कथा अनेकदा दुर्लक्षित राहतेकन्याकुमारीच्या समुद्रातील शिलेवर उभे असलेले विवेकानंद शिला स्मारक हे एका राष्ट्रीय संकल्पाचे आणि सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक आहेदेशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिकांपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत अनेकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवलाप्रत्येक नागरिकाचा वाटा महत्त्वाचा आहेही भावना या अभियानातून रुजलीहा संपूर्ण प्रवास सहजसोप्या मात्र जोशपूर्ण शब्दांत या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.

मागता क्षणी हवी ती गोष्ट हवीच अशी अपेक्षा असणाऱ्या आजच्या युवावर्गासाठी या पुस्तकाचे महत्त्व अधिकच आहेस्वामी विवेकानंदांच्या विचारांमधील राष्ट्रजागरणाची प्रेरणा आणि एकनाथजी रानडे यांच्या कार्यातील संघटनशक्ती यांचा परिचय करून देणारे हे पुस्तक युवकांना ‘मोठे ध्येय आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न’ यांची ताकद जाणवून देतेआपल्या भारतासाठी या स्मारकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहेयाची साक्ष पुस्तकाच्या वाचनातून पटते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनात कन्याकुमारीला विशेष स्थान आहेडिसेंबर १८९२ मध्ये ते कन्याकुमारी येथे आले आणि समुद्रातील या शिलेवर ध्यानमग्न झालेभारताच्या गौरवशाली इतिहासाचे चिंतन करतानाच देशासमोरील दारिद्र्यअज्ञान आणि सामाजिक समस्यांचाही त्यांनी विचार केलाभारताच्या पुनरुत्थानासाठी कार्य करण्याचा दृढ संकल्प त्यांच्या मनात याच चिंतनातून अधिक स्पष्ट झालापुढे त्यांनी भारतीय अध्यात्मसंस्कृती आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचवलात्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या वेळी जानेवारी १९६२ मध्ये 

त्यांच्या स्मृतीशी जोडलेल्या या शिलेवर स्मारक उभारण्याची कल्पना ही केवळ श्रद्धेची बाब  राहता राष्ट्रीय प्रेरणेचे प्रतीक झाली.

मात्र स्मारक उभारणीचा मार्ग प्रचंड अडचणीचा होताविविध प्रशासकीयसामाजिक आणि तांत्रिक अडचणीमतभेद आणि आर्थिक आव्हाने यांचा सामना करावा लागलाया संपूर्ण कार्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप देण्यात एकनाथजी रानडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरलीत्यांनी विविध स्तरांवरील व्यक्तीसंस्था आणि समाजघटकांना एका ध्येयाभोवती एकत्र आणलेअडचणींवर मार्ग काढत त्यांनी स्मारक उभारणीच्या कार्याला देशव्यापी लोकचळवळीचे स्वरूप दिलेहा संपूर्ण गौरवशाली इतिहास या पुस्तकातून उलगडतो.

स्वामी विवेकानंद यांचे ‘उठाजागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका’ हे वचन प्रत्यक्ष आचरणात आणणे म्हणजे कायहे समजण्यासाठी प्रत्येकाने किमान एकदा हे पुस्तक वाचायलाच हवे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास