लाल मातीचे इनाम राखणारा दिवाळी अंक - भवताल
मराठी साहित्यविश्वात दिवाळी अंकांची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होतात. यातील काही अंक कथा-कादंबऱ्यांसाठी, काही वैचारिक लेखनासाठी, तर काही विशिष्ट विषयांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण अंकांमध्ये 'भवताल' या पर्यावरणविषयक दिवाळी अंकाचे स्थान विशेष आहे. 'भवताल'चा दिवाळी विशेषांक म्हणजे महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा किंवा राज्याची ओळख ठरलेल्या गोष्टींचे आगळेवेगळे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन). आतापर्यंत पाऊस, खडक, देवराई, ऐतिहासिक जलव्यवस्था, अधिवास, सूक्ष्मजीव, भूजल, सडे-पठारे, माळराने, देवाण-घेवाण, वाटा-रस्ते-मार्ग या विषयांवर विशेषांक प्रसिद्ध झाले आहेत. या वेळच्या अंकाची थीम आहे, 'लाल माती' अर्थात मातीतली कुस्ती. गेल्या बारा वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या या अंकाचे या वर्षाचे आत्ताचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पृष्ठ संख्या आणि लेखाची संख्या सुद्धा . पूर्वी साधारणतः दीडशे पाने आणि 25 ते 30 लेख असे स्वरूप असणाऱ्या भवतालच्या या 2026 चा अंकात 240 पानेआणि 45 ते 50 लेख आहेत. क...