प्रवाशांच्या आनंदासाठी रेल्वेचे अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे पाऊल!

सध्या आपल्या भारतीय रेल्वेत  प्रवाशांची सोय लक्षात घेत अनेक महत्त्वपूर्ण बदल होत आहेत. जसे की, अमृत भारत, वंदे भारत यासारख्या  अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण रेल्वे गाड्या सुरू करण्याबरोबरच, सध्या असणाऱ्या गाड्यांमधील प्रवास सुद्धा आनंदायी हवा यासाठी काय करायला, हवे? आणि काय टाळायला, हवे? याचा विचार करत सध्या रेल्वेमध्ये  रिझर्वेशन प्रणाली मध्ये बदल करणे, रेल्वे संबंधित विविध गुन्ह्यांचे स्वरूप त्यातील शिक्षेचे प्रमाण बदलणे असे बदल होत आहेत.

तर वाचक मित्र-मैत्रिणींनो, आपल्या भारतीय रेल्वेने काहीच दिवसापूर्वी याच मालिकेतील एक उत्तम बदल केला तो म्हणजे रेल्वेत   विनाकारण आवाज करणाऱ्यांवर आर्थिक दंडाचा दांडूका उगारणे तसेच या दांडुक्यांच्या परिणाम न होणाऱ्यांना सरळ कारावसाची शिक्षा देण्याचा निर्णय जाहीर करणे. रेल्वेने जाहीर केलेल्या या निर्णयानुसार, विनाकारण मोठ्या प्रमाणात आवाज करणाऱ्यांवर एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच हा दंड आकारून सुद्धा व्यक्ती शांत न बसल्यास, त्यास तब्बल पाच रुपयाचा दंड आणि सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.

रेल्वेकडून अनेक बदल करण्यात येतात. मात्र त्याची पुरेशी प्रसिद्धी करण्याबाबत, रेल्वे कमी पडते आणि परिणामी प्रवाशांकडून चुका होतात. या निर्णयाबाबत मात्र असे होऊ नये यासाठी, रेल्वेकडून याबाबत रेल्वे स्टेशनवर घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे मला ह्याबद्दल माहितीच नव्हती. मला जर बदल माहिती असता, तर माझ्याकडून ही चूक झालीच नसती. मला माहितीच नसल्याने मला माफी देण्यात यावी. या प्रकारचा बचाव रेल्वे प्रवाशांना करता येणार नाही.

मी रेल वन या मोबाईल ॲप्लिकेशन चा वापर करत अनेकदा तिकीट काढून सर्वसाधारण डब्यातून प्रवास करतो. या दरम्यान मी बघतो की, अनेक लोक विदाऊट हेडफोन मोठ्याने व्हिडिओ ऐकत असतात. ज्याच्या समोरच्याला त्रास होतो, आणि अशा व्यक्तींना काही सांगायचं झाल्यास त्यांच्या दृष्टिकोन रेल्वे तुझ्या बापाची आहे, का ? मग तू हे सांगणारा कोण? या पद्धतीचा असतो. अनेक स्लीपर रिझर्वेशनच्या डब्यात सुद्धा मी हा अनुभव घेतला आहे. असा विनाकारण आवाज करणाऱ्या व्यक्तींना या नियमामुळे मोठ्या प्रमाणात चाप बसेल त्यामुळे सहप्रवाशाच्या त्रासात मात्र मोठी घट होईल हे नक्की. 

अनेक प्रवाशांचा दृष्टिकोन असा असतो की, रात्री रेल्वे प्रवास करूया आणि आणि पहाटे मुक्कामावर पोहोचल्यावर जो दिवस सुरू होतो, त्या दिवसात आपले काम करू. परंतू अशा प्रवाशासाठी रेल्वे प्रवास शांततेत होणे अत्यंत गरजेचे असते  विनाकारण आवाज करणाऱ्या प्रवाश्यांमुळे या प्रवाशांच्या रेल्वे प्रवास मात्र त्रासदायक होतो. त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. ज्याच्या परिणाम त्यांच्या मुक्कामावर पोहोचल्यावर होणाऱ्या कामावर होतो. आता याला चाप बसेल त्याबद्दल रेल्वेचे करावे तेवढे कौतुक कमीच. 

मुळात ही गोष्ट बेसिक सिव्हीक सेंन्सची. मात्र आपल्याकडे मुळात तोच कमी असल्याने आपल्याला या गोष्टीसाठी दंडाची तरतूद करावी लागते. पुढील काळात अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी दंडाची तरतूद करण्याची गरज पडू नये. लोकांना स्वतःहून आपल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला त्रास होत नाही ना हे समजावे आणि त्यानुसार लोकांचे वर्तन घडावे, यासाठी सुद्धा सरकारने आणि खाजगी संस्थांनी पावले उचलण्याची गरज आहे. नाहीतर एका मागून एक नियम असे नियम करणे काहीसे हास्यास्पद आहे. तरी जगात भारतीयांचे हसू होऊ नये यासाठी नागरिकांनी आणि सरकारने अनेक खाजगी संस्थांनी पावले उचलण्याची गरज सुद्धा या बदलातून दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास