लाल मातीचे इनाम राखणारा दिवाळी अंक - भवताल

मराठी साहित्यविश्वात दिवाळी अंकांची परंपरा अत्यंत समृद्ध आहे. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने शेकडो दिवाळी अंक प्रकाशित होतात. यातील काही अंक कथा-कादंबऱ्यांसाठी, काही वैचारिक लेखनासाठी, तर काही विशिष्ट विषयांच्या अभ्यासपूर्ण मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत. अशा वैशिष्ट्यपूर्ण अंकांमध्ये 'भवताल' या पर्यावरणविषयक दिवाळी अंकाचे स्थान विशेष आहे.

'भवताल'चा दिवाळी विशेषांक म्हणजे महाराष्ट्राचा नैसर्गिक वारसा किंवा राज्याची ओळख ठरलेल्या गोष्टींचे आगळेवेगळे दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन). आतापर्यंत पाऊस, खडक, देवराई, ऐतिहासिक जलव्यवस्था, अधिवास, सूक्ष्मजीव, भूजल, सडे-पठारे, माळराने, देवाण-घेवाण, वाटा-रस्ते-मार्ग या विषयांवर विशेषांक प्रसिद्ध झाले आहेत. या वेळच्या अंकाची थीम आहे, 'लाल माती' अर्थात मातीतली कुस्ती. गेल्या बारा वर्षापासून प्रसिद्ध होणाऱ्या या अंकाचे या वर्षाचे आत्ताचे एक प्रमुख वैशिष्ट्य  म्हणजे पृष्ठ संख्या आणि लेखाची संख्या सुद्धा . पूर्वी साधारणतः दीडशे पाने आणि 25 ते 30 लेख असे स्वरूप असणाऱ्या भवतालच्या या 2026 चा अंकात 240 पानेआणि 45 ते 50 लेख आहेत.

कुस्ती हा जगातील सर्वांत जुन्या आणि सर्वत्र खेळल्या जाणाऱ्या खेळांपैकी एक आहे. मातीतली कुस्ती ही महाराष्ट्राची दोन हजार वर्षांपूर्वीची परंपरा आहे. त्याचाच सविस्तर वेध या अंकात घेण्यात आला आहे. संपत मोरे, प्रा. पै. मतीन शेख, प्राजक्ता ढेकळे-रुपनवर, दर्शना परब-कुंटे, विश्वास पाटील आदींचे लेख यात आहेत. गाजलेल्या थरारक कुस्त्या, कुस्तीची महाराष्ट्रातील विविध केंद्रे यांवरही अंकात भाष्य करण्यात आले आहे. या अंकाच्या निमित्तानं कुस्तीच्या ऐतिहासिक आणि सुदृढ समाज घडवणाऱ्या परंपरेची चर्चा व्हावी. त्याद्वारे ही परंपरा टिकावी आणि वृद्धिंगत व्हावी हाच उद्देश आहे, असे प्रास्तावनेत संपादक अभिजीत घोरपडे यांनी सांगितले आहे‌.ते खरे असल्याचे अंक वाचुन झाल्यावर दिसते सुद्धा. पहिलवान व्यक्तींना कमी बुद्धी असते‌.ते कायम रागातच असतात,असे अनेक गैरसमज हा अंक दुर करत  कुस्तीच्या खेळादरम्यानच्या कळात कुस्तीत सुद्धा प्रतिस्पर्धी पहिलवानचे डावपेच लक्षात येणे, प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी आपण कोणते डावपेच आखायला हवे यासाठी बुद्धीचा मोठ्या प्रमाणात माहिती असावी लागते. आपल्या महाराष्ट्रात कुस्तीची परंपरा कोणत्या प्रकारे विकसीत झाली.कोल्हापूरला तीला राजाश्रय कोणत्या पद्धतीने मिळाला. याची उत्तरे अंकातील लेखाच्या वाचनाने मिळतात. मराठीत खूपच कमी प्रमाणात वापरला जाणारा रिपोतार्ज हा शोध पत्रकारितेतील एक प्रकार सुद्धा या अंकात मोठ्या प्रमाणात वापरलेला आढळतो. विविध पहेलवानांचा अनुभव कथनाने, आणि ठीक ठिकाणी होणाऱ्या कुस्तीच्या दंगली च्या वर्णनाने सजलेला हा अंक त्या आधीच्या अकरा अंकासारखाच वाचनीय झाला आहे

नेहमी अडीचशे तीनशे रुपये च्या घरात असणारी भवतालची किंमत यंदा  आधीच्या तूलनेत काहीसी जास्त (४००रुपये) असली तरी भवतालचा अंक वाचून झाल्यावर नेहमीप्रमाणे ती वसुल झाल्याचा अनुभव येतोच. पुर्वी अभावानेच आढळणाऱ्या जाहिराती या अंकात पुर्वीच्या तूलनेत जास्त आढळत असल्या तरी सध्याचा महागाईच्या काळात आपण भवतालच्या व्यवस्थापनास याबाबत माफच करायला हवे‌ असो. सरते शेवटी आपण असे म्हणू शकतो की या वेळच्या भवतालचा अंक मागील काही वर्षातील विषयांप्रमाणे थेट पर्यावरणाचा संदर्भातील नसला तरी नेहमीप्रमाणे अत्यंत वाचनीय झाला आहे, हे मात्र नक्की

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास