पोस्ट्स

गर्जा महाराष्ट्र माझा !

इमेज
  महाराष्ट्र, राज्यातील प्रजाननांना सुशासन मिळावे म्हणून  देशात पहिल्यांदा माहितीचा अधिकार लागू करणारे राज्य .(ज्याची उपयुक्तता लक्षात आल्यावर केंद्राने समस्त देशात लागू केला)देशाला एक्सप्रेस वे, रोजगार हमी कायदा यांची ओळख करुन देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र, देशातील  सार्वजनिक परीवहन सेवेला बळकटी मिळावी यासाठी एसटीचा प्रयोग आपल्या राज्यात करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र  .महिलांचे राजकारणातील प्रमाण वाढावे म्हणून कायदा करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र,देशाच्या महसुलात सर्वाधिक वाटा उचलणारे राज्य उचणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. अभियांत्रीकी आणि वैद्यकीय शिक्षणाची गंगा जनसामान्यापर्यत पोहोचावी, यासाठी उपाययोजना करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. अहिंदी पट्टयातील असूनदेखील हिंदींचा सहजतेने स्विकार करणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे आजचे स्वरुप म्हणजे महाराष्ट्र. या अस्या महाराष्ट्राचा 1 मे हा स्थापना दिवस त्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. आज 2021 साली महाराष्ट्र 61 वर्षाचा झाला. मानवी आयुष्याचा विचार करता महाराष्ट्र हा...

सौदीतील बालके गिरवणार रामायण, महाभारताचे धडे

इमेज
सौदी अरेबिया, जगातील 25% देशांचा(सयुंक्त राष्ट्रसंघ, आँल्मपिकं या संघटनेनूसार जगात 210 देश आहेत.त्यातील 51 देशांचाअधिकृत धर्म  इस्लाम आहे. ) अधिकृत धर्म  इस्लाम ज्या देशात 1400 वर्षापुर्वी उदयास आला. तो देश म्हणजे सौदी अरेबिया , आपल्या कट्टरतेमुळे, तसेच अत्यंत कडक कायद्यामुळे जगात ओळखला जाणारा देश म्हणजे सौदी अरेबिया. ज्या देशातून एकही नदी वाहत नाही, तसेच जगात सर्वाधिक नैसर्गिक इंधनाचे स्त्रोत असणारा देश म्हणजे सौदी अरेबिया. राजाचे आडनाव ज्या देशाच्या नावात आहे, असा 100वर्षापूर्वी स्थापन झालेला राजेशाहीचा देश म्हणजे सौदी अरेबिया तर अश्या सौदी अरेबियात हिंदू धर्मियांसाठी  मोठा निर्णय ठरेल असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. हा लेख लिहीत असेपर्यत याबात सौदी अरेबिया सरकारकडून काहीही अधिकृत जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र गैर सरकारी संस्थेचा हवाल्याने बोलायचे झाल्यास ही बातमी 100% खरी आहे.         तर सौदी अरेबियातील पुढील पिढी सहिष्णू  इस्लामेत्तर धर्मियांचा आदर करणारी आधूनिक विचारसरणीची बनावी, या हेतूने  भावी सौदी राजे प्रिन्स बिन सलमान यां...

2021 मधील चौथ्या मन की बातच्या निमित्ताने!

इमेज
    रविवार 25 एप्रिल 2021 अर्थात एप्रिलच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी मन की बातद्वारे संवाद साधला.अपेक्षेप्रमाणे ही मन की बात कोरोनावरच होती.       देशातील आँक्सिजन तूटवड्यावर फारच कमी भाष्य केल्यावर आरोग्य सेवेतील विविध घटकांच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरवात केली .माझ्या मते आँक्सिजन तूटवड्यावर अधिक भाष्य करणे आवश्यक होते. सध्या भारतात आँक्सिजन पुरवठ्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यातील भीषण वास्तव समोर आणले आहेच. मात्र यावर काहीच भाष्य करण्यात आले नाही. विविध सरकारने याबाबत काय कार्यवाही करत आहेत? याबाबत पुढील उपाययोजना काय आहेत? याबाबत अधिक माहिती मिळेल असी माझी अपेक्षा होती, जात फोल ठरली. नाशिकयेथील दुर्घटनेविषयी मोदी संवेदना व्यक्त करतील. असे वाटले होते. मात्र त्याविषयी त्यांनी मौन पाळले. फक्त एक ट्टिट करुन सोडून देण्यासारखा हा विषय नव्हता.  आरोग्य सेवेतील  2 डाँक्टर एक परीचारीका,1 रुग्णवाहिका चालक, आणि एक बरा झालेला रुग्ण यांचे मनोगत या कार्यक्रमात ऐकवण्यात आले. यांबरोबरच कोरोना रुग्णांना अन्न, ...

कथा एका दुर्बिणीची !

इमेज
 आज 24एप्रिल 2021 अर्थात अवकाशाचा वेध घेण्यासाठी हबल दुर्बिण अंतराळात सोडली, त्याला 31 वर्षे पुर्ण होण्याचा दिवस. 24 एप्रिल 1990 रोजी अवकाशात हबल दुर्बिण सोडण्यात आली. पृथ्वीवरच्या विविध अडथळ्यांवर मात करता यावी,या उद्देशाने निर्माण केलेली दुर्बिण हबल.मानवाचा अंतराळातील डोळा म्हणजे हबल टेलीस्कोप . या टेलीस्कोप मुळे खगोलशास्त्रात अनेक आश्चर्यकारी शोध लागले आहेत.या दुर्बिणीला 31 वर्षे झालेली असली तरी अजून काही काळ ती उत्तम सेवा देईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे     हबल दुर्बीण ही अवकाशाचा वेध घेण्यासाठी नासा व युरोपियन अवकाश संस्था यांनी संयुक्तपणे सोडलेली दुर्बिण आहे. ही अवकाशात सोडण्यात आलेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी तसेच सर्वात प्रगत दुर्बिण आहे. या दुर्बिणीचे नाव अमेरिकेच्या एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून देण्यात आले. ही दुर्बिण नासाच्या मोठ्या वेधशाळांच्या प्रकल्पातील एक प्रकल्प आहे.     इटालीत जन्‍माला आलेल्‍या गॅलिलिओने चारशे वर्षांपूर्वी, १६१० साली दुर्बिणीचा शोध लावला. गॅलिलिओने दुर्बिणीच्‍या साह्याने चंद्रावरील डाग आणि गुरूचे चार उपग्रह शो...

बातमीतील चीन (भाग7)

इमेज
  आपल्याकडे कोरोनामुळे स्थिती अत्यंत चिंताजनक असताना आपल्या भारताचे शत्रू राष्ट्र चीन याबाबत तीन घडामोडी गेल्या आठवड्याभरात घडल्या. शत्रूवर कायम लक्ष असणे आवश्यक आहे. या चाणक्य नितीनूसार चीनबाबत घडलेल्या तीन्ही बाबी आपणांस सांगण्यासाठी आजचे लेखन. तर मित्रांनो, गुरुवारी दूपारी क्येटा शहरातील चीन वकिलातीजवळ असणाऱ्या हाँटेलमध्ये स्फोट झाला. सुदैवाने त्यावेळेस काही कामानिमित्त चीनी अधिकारी दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे या स्फोटातून वाचले.क्येटा  पाकिस्तानातील बलूचीस्थान प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. सध्या चीन पाकिस्तान इकाँनाँमिक काँरीडर अंतर्गत बलूचीस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. ज्यास स्थानिक जनतेचा विरोध आहे. या विकासकामांमुळे बलूचीस्थानचा फायदा होण्याऐवजी शोषणच होईल.असी स्थानिकांची भुमिका आहे. ते सातत्याने आपला विरोध दर्शवत असतात. या आधी पाकिस्तान अमेरीका यांच्यात घनिष्ठ मैत्री असताना दोनदा पाकिस्तानातील अमेरीकी दुतावासावर हल्ला झाला होता. तहरीके ए तालीबान यांनी या हल्ल्याची जवाबदारी स्विकारली आहे. तहरीके पाकिस्तानची भुमिका पाकिस्तानात शारीया कायदा लागू करावी, अ...

जागतिक पुस्तक दिन विशेष !

इमेज
आज 23 एप्रिल अर्थात  जागतिक पुस्तक दिन, त्यानिमित्ताने सर्व पुस्तक प्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा इंग्रजी साहित्यातील एक महान साहित्यीक शेक्सपियर  याचा स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो आज या साहित्यकाराची जयंती(Birth anniversary ) आणि पुण्यस्मरण (Death anniversary )दिवस सुध्दा      आजकाल पुस्तकाची परीभाषा अनेकार्थाने बदललली आहे. आता आता पर्यत मराठी भाषेत न आढळणारा आँडिओ बूक हा प्रकार आता मराठीत चांगलाच रुळला आहे.अनेक अँप त्यासाठी वापरली जात आहे.येत्या काही दिवसात प्रिंट आँन डिमांड मुळे पारंपारीक पुस्तकाची दूकानांचे स्वरुप पुर्णतः बदलून जाईल, मात्र पुस्तकाचे महत्व कमी होणे अशक्य. मध्यंतरी समाजमाध्यमांवर बराच रुळलेला मात्र कायदेशीर नसणारा प्रकार म्हणजे पुस्तकाचा पिडीएफ फाईल, हे सुद्धा पुस्तकाचे एक  साधनच म्हणता येवू शकते. माझ्या माहितीत असे दोन नियतकालीके आहेत, जी मला खुद्द प्रकाशकाकडूनच व्हाँटसप मार्फतच येतात, असो. किंडल सारख्या पुस्तकां विषयीच्या गँझेटमुळे वाचताना आपल्या डोळ्याला सोइस्कर होईल, असा प्रकाश ठेवता येतो, तसेच वाचताना एखाद्या शद्बाचा अर्थ माहिती न...

नको देवराया, अंत आता पाहू!

इमेज
"नको देवराया, अंत आता पाहू! प्राण हा  जावू पाहे" असा मराठीतील सुप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल भक्तीत भान हरवलेल्या माझा अंत तू आता बघू नकोस, लवकरच माझ्यासाठी धाव घे , अशी आर्त विनवणी या अभंगातून संत कान्होपात्रांनी विठ्ठलास केली आहे. सध्या हाच अभंग वेगळ्या संदर्भात म्हटला जावू शकतो. कोरोनाच्या प्रादुर्भावाबाबत नको देवराया, अंत आता पाहु,प्राण हा तळमळला जाहू पाहे, असे म्हंटले जावू शकते.      कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात बेड मिळत नाही.जर बेड  मिळाला तर  आँक्सिजन किंवा व्हेंटीलिटर मिळत नाही. जर दोन्ही गोष्टी मिळाल्या तर, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या अपघातासारखा दुर्देवी प्रसंग ओढवून प्राण जाण्याचे भय आहेच. मी नाशिकच्या रुग्णालय दुर्घटनेत  प्राणास मुकलेल्या जीवांप्रती संवेदना प्रगट करतो. इश्वर मृत्यम्यांच्या आतेष्ठांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, ही इश्वरचरणी प्रार्थना     माझ्या ओळखीमध्ये एक व्यक्ती डोळ्यावरील उपचारासाठी दवाखन्यात दाखल झाली होती. ती व्यक्ती दवाखान्यात दाखल झाल्यावर त्यास कोरोना झाला. अर्थात ती व्यक्ती तरु...