शोषितांचे दैन्य मांडणारा काव्यसंग्रह ' गोळपिठा'

 

साहित्याला समाजाचा आरसा म्हटले जाते समाजातील सर्व चांगल्या वाईट घडामोडी समाजाचे प्रश्न याचे प्रतिबिंब आपल्याला साहित्यात उमटलेले दिसते. विसाव्या शतकाच्या 80 आणि 90 च्या दशकात मोठ्या प्रमाणावर चर्चेस आलेले विद्रोही साहित्य देखील त्याला अपवाद नाही किंबहुना विद्रोही साहित्यात सामाजिक तळागाळातील दुःख दैन्य अडचणी यांचे अत्यंत ठळकपणे प्रतिबिंब उमटलेले दिसते. विद्रोही साहित्यातील महत्वाचे व्यक्तिमत्व जेष्ठ कवी साहित्यिक नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला गोळापिठा हा देखील याला अपवाद नाही. 

गोलापिठातील  कविता वाचताना मुंबईचे एक वेगळेच रूप समोर येते. एका बाजूला झगमगाट, श्रीमंती आणि विकासाचे स्वप्न दाखवणारे शहर, तर दुसऱ्या बाजूला भूक, गरिबी, वेश्यावस्ती, गुन्हेगारी आणि माणसाच्या जगण्याचा संघर्ष असलेले वास्तव! या वास्तवाचे अत्यंत निर्भीड चित्रण ढसाळ करतात. समाजाने ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले, अशा माणसांना या कविता संग्राहाचे कवी नामदेव ढसाळ आपल्या कवितांचा केंद्रबिंदू केल्याचे कविता वाचताना सहजतेने लक्षात येते‌.

नामदेव ढसाळ हे दलित साहित्य चळवळीतील महत्त्वाचे कवी, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते होते. मुंबईतील कामाठीपुरा परिसरातील गोलपीठा या भागाशी त्यांचे बालपण आणि अनुभव जोडलेले होते. या परिसरातील वंचित, शोषित, उपेक्षित माणसांचे जगणे, त्यांचे दुःख, दारिद्र्य, संघर्ष आणि सामाजिक अवहेलना त्यांनी जवळून अनुभवली होती. याच अनुभवांचे अस्वस्थ करणारे प्रतिबिंब 'गोलपीठा'मधील कवितांमध्ये उमटले आहे  असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही ‌

नामदेव ढसाळांच्या कवितांमध्ये सामाजिक विषमता, जातीय भेदभाव, आर्थिक शोषण, दांभिकता आणि अन्यायाविरुद्धचा तीव्र संताप व्यक्त होतो. मात्र हा संताप केवळ नकारात्मक नाही. त्यामागे माणसाला प्रतिष्ठेने जगता यावे, समाजात समानता निर्माण व्हावी आणि शोषणमुक्त व्यवस्था अस्तित्वात यावी, अशी ठाम अपेक्षा आहे. त्यांच्या कवितांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव, समतेची आकांक्षा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिसून येते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

महिला पत्रकारितेच्या धाडसी वाटचालीचा गौरव : ‘शौर्य रणरागिणी न्यूज’चा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

वंदन भारतात लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंतप्रधानास