पोस्ट्स

पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणूका आणि भारत

इमेज
    येत्या रविवारी अर्थात 25 जूलै रोजी पाकिस्तानने अनधिकृतरीत्या ताब्यात ठेवलेल्या काश्मीरमधील दक्षीण भाग ज्याला ते आझाद काश्मीर म्हणतात ( पाकव्यात काश्मीरच्या उत्तरेच्या भागाला आतापर्यत पाकिस्तान आतापर्यत फेडरली अँडमिस्टर्ड नाँर्दन एरीया अर्थात फाना म्हणत असे आता गिलगीट बाल्टीस्तान असे म्हणतो.) या ठिकाणी विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. भारताने या निवडणूका जाहिर झाल्या त्या वेळीच सदर भुभाग आमचा असल्याने पाकिस्तानकडून या प्रदेशात घेण्यात आलेल्या निवडणूका बेकायदेशीर आहे.असे जाहिर केले आहे【गेल्या वर्षीच गिलगीट बाल्टीस्तान भागात विधानसभेच्या निवडणूक झाल्या होत्या . ज्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इंन्साफ या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या    याही निवडणूका भारताने बेकायदेशीर ठरवल्या होत्या   】पाकव्याप्त काश्मीरच्या भाग असलेल्या आझाद काश्मीर च्या विधानसभेच्या एकुण 53 जागा आहेत . त्यातील 45 जागांवर मतदान होणार आहेत. या 45 जागांपैकी 33 जागा या आझाद काश्मीरमधील आहेत. 12 जागा या आपल्या जम्मू काश्मीर मधून पाकिस्तानात विविध  ...

हे निसर्गा तूला झाले तरी काय ?

इमेज
    सध्या जगभरात निसर्गाने आपल्याला रौद्रस्वरुप दाखवून देण्याचा चंग बांधला आहे का? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी स्थिती आहे. आतापर्यतचे दक्षीण आशियातील सर्वाधिक अर्थात 52अंश सेल्यीयस तापमान पाकिस्तानातील जाकोदाबाद येथे नोंदवण्यात आल्यानंतर निसर्गानै रौद्ररुप दाखवण्यास सुरवात केली. ज्या देशातील एक तूर्तीयांश भाग ध्रुवीय प्रदेशात मोडतो त्या.कँनडातील.ब्रिटिश कोलंबिया या राज्यात 49.5 अंश सेल्यीयस तापमान नोंदवले गेले. उष्माघाताच्या या नाट्यानंतर निसर्गाच्या रौद्ररुपाचा पावसाचा अंक सुरू झाला आहे. आजमितीस पावसामुळे आपल्या महाराष्ट्रासह, पश्चिम युरोप आणि चीनमध्ये जनजीवन पुर्णतः उद्धवस्त केले आहे. त्यापैकी महाराष्ट्र आणि पश्चिम युरोपातील पावसाविषयी मी या आधीच सांगितले आहे. आता बघूया चीनमधील पावसाविषयी.      तर मित्रांनो, गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम मध्य चीनमधील हेनास या प्रांतात पावसाने अक्षरशः नंगा नाच सुरु करण्यासारखी परीस्थिती आहे. वर्षभरातील एकुण पाउसाइतके पर्जन्य फक्त 3दिवसात झाल्याने हेनास  या प्रांतातील या झिंगझावू शहरात  भयानक स्थिती निर्माण झ...

डोगंरीच्या तूरुंगातून

इमेज
  जूलै महीन्याची अखेर जशी जवळ येते , तश्या ज्या गोष्टींची आठवण होते , त्यात लोकमान्य टिळक हे अग्रक्रमी असतात . लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंञ्यलढ्यातील योगदान प्रचंड आहे यात वादच नाही . होमरुल चळवळ चा अपवाद वगळता गांधींसारखे कोणतेही आंदोलन लोकमान्य टिळकांनी केलेले आपणास दिसत नसले तरी त्यांचा लेखणीमुळे अनेकांना स्वातंञ्यलढ्यात प्राणापण करण्याची प्रेरणा मिळाली ज्यात चाफेकर बधुंचा प्रामुख्याने समावेश करता येइल. (या चाफेकरांचा बलीदानातूनच स्वातंञ्यवीर सावरकरांना स्वातंञ्यासाठी प्राणापर्ण करण्याची स्फुर्ती झाली होती ) स्वामी विवेकानंदाना यूनाटेड स्टेट मध्ये जाण्याचा सल्ला आणि त्यासाठी मदत उभारण्यात सूध्दा लोकमान्याचा वाटा होता. लोकमान्य टिळक आणी स्वामी विवेकानंद यांचे मुंबईते पुणे या दरम्यानचे  संभाषण प्रसिध्द आहेच.            लोकमान्य आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे फारकाळ  सख्य झाल्याचे माञ दूर्दैवाने महाराष्ट्र बघू शकला नाही .जर तो प्रसिध्द वाद जर शेवटी ज्या टोकाला गेला ,त्या टोकाला गेला नसता तर महाराष्ट्रात सध्या फार वेगळे  चिञ दिसले असते .र...

हे आग बुझती क्यु नही !

इमेज
    आज 22 जूलै रोजी हा मजकूर लिहीत असताना तळ कोकणात आणि मुंबईत पावसाने हाहाकार उडवला असताना अमेरीका आणि कँनडामध्ये वणव्याने तेथील प्रशासनाला अक्षरशः रडकुंडीला आणले आहे. अमेरीकेच्या 13 राज्यात लाखो हेक्टर जमिन वणव्याने भस्मस्यात केली आहे. कँनडाच्या ब्रिटिश कोलंबिया या राज्यात तर  या वणव्यामुळे तेथील प्रशासनाने राज्य आणिबाणी जाहिर केली आहे. अमेरीकेचे पश्चिम भागातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 88 आणि 89 हे वाहतूकीसाठी बंद करण्याची वेळ या वणव्यामुळे तेथील प्रशासनावर आली आहे. अमेरीकेच्या पँसिफिक किनाऱ्यावर लागलेली ही आग झपाट्याने पुर्वेकडे पसरत आहे.  दहा दिवसापेक्षा जास्त दिवसांपूर्वी लागलेली ही आग शर्थीचे प्रयत्न करुन देखील विझता विझत नाहीये. अमेरीकेच्या केंद्रीय प्रशासनाने 88 वणव्यांना अनियंत्रीत वणवे म्हणून जाहिर केले आहे. हे वणवे लोकवस्तीच्या जवळ आल्याने प्रशासनाच्या त्रासात भरच पडली आहे. बी.बी.सी.,  सि.एन.एन., अल् जझीरा सारख्या वृत्तवाहीन्यांकडून  येणाऱ्या बातम्यांनुसार अद्याप जिवीत हानी झालेली नसली,  तरी मालमत्तेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आ...

आपण या बदलांना तयार आहोत का?

इमेज
   सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर नजर टाकली असता,  मुंबईत आणि तळ कोकणात ( रत्नागिरी सिंधूदुर्ग जिल्हे) पावसामुळे झालेले नुकसान , आणि आगामी पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने दिलेले विविध इशारे यांच्या बातम्या आपणास दिसतात. या सर्व बातम्यांचा गदारोळात या प्रश्नाच्या मुळाशी जाणारी एक बातमी पुण्याहुन आली, ती आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो पुण्याचा पाषाण या उपनगरातील  डाँ होमी भाभा रोडवरील IITM( Indian Institute for   Tropical Metrology )या संस्थेमार्फत  अरबी समुद्राविषयी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात सन 1982 ते 2002 या कालखंडापेक्षा 2001ते 2019 या कालखंडात 52% अधिक संख्येने चक्रीवादळे अरबी समुद्रात आल्याची तसेच त्यांची तीव्रता वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच याच कालावधीत बंगालच्या उफसागरात 8% कमी चक्रीवादळे आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.  सर्वसाधरणपणे अरबी समुद्रात वर्षभरात एक किंवा फार तर दोन चक्रीवादळे तयार होत. अरबी समुद्रात दोन पेक्षा जास्त चक्रीवादळे म्हणजे डोक्यावरुन पाणी असी स...

आली समिप घटीका ..... विनाशाची

इमेज
     सध्या जगाचे लक्ष अफगाणिस्तान आणि तालीबान याच्या घडामोडीबरोबर बदत्या हवामान बदलामुळे आलेल्या त्रासाकडे वेधले गेले आहेच. तालीबान आणि अफगाणिस्तानविषयी मी आधीच बोललो आहे. आज बोलणार आहे, हवामान बदलाच्या धोक्याविषयी.     तर मित्रांनो, तळ कोकणात, (रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तळ कोकण म्हणतात, तर ठाणे रायगड, पालघर आणि मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर हे जिल्हे  उत्तर कोकणात येतात सावित्री नदी त्यांची सीमा निश्चित करते.) मुंबई तसेच पश्चिम युरोपीय देशांमध्ये पाउस आणि पुरामुळे  अशरशः भंबेरी  उडाली आहे. पश्चिम युरोपात गेल्या कित्येक वर्षात पडला नाही इतका पाउस पडलाय. जगात विकसीत समजल्या जाणाऱ्या पश्चिम युरोपीय देशात 300 व्यक्ती या पावसामुळे आणि पावसामुळे आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या आहेत जरी तळ कोकणात पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची बातमी आलेली नसली तरी मुंबईत मात्र पावसामुळे  भुस्खखलन होवून कित्येक निष्पाण जीव प्राणास मुकले आहेत.एककीडे पाउस नको नकोसा करत असला तरी नाशिक मराठवाडा पावसाची आस लावून बसला आहे.     गेल्या काही महिन्यातील...

दिवस आहे खास बुद्धिबळाचा

इमेज
   आपल्याकडे विविध  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गोष्टींचे दिन साजरे केले जातात. काही वेळेस एखाद्या व्याधी विषयक दिन साजरे केले जातात.काही दिवस एखाद्या विशिष्ट क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जातात. जसे 15सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय इंजिनिरींग दिन किंवा 23 मे रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय स्किझोफेनिया दिन. मात्र जर कोणी आपणास सांगितले एखाद्या खेळाला समर्पित असणारा एखादा हादिन आहे तर.! तूम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे. तर मित्रांनो, असा एक खेळ आहे. ज्याचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो, तो म्हणजे 20जूलै रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन. सन 1966 पासून बुद्धीबळाची आंतरराष्ट्रीय संघटना जी फिडे या संक्षीप्त नावाने प्रसिद्ध आहे त्या संघटनेमार्फत अर्थात फेडरेशन इंटरनँशल डिइचेस या संघटनेतर्फे हा दिन साजरा करण्यात येतो.               नुकत्याच फुटबाँलविषयक जागतिक स्तरावरच्या दोन स्पर्धा झाल्या. त्याआधी टेनिस मधील.महत्तवाच्या चार स्पर्धांपैकी एक असणारी विबल्डन ही स्पर्धा झाली . या स्पर्धां...