पोस्ट्स

मुद्दे आपले मुद्दे त्यांचे

इमेज
           येत्या २१ मे रोजी ऑस्ट्रेलिया या देशात तेथील  आपल्या लोकसभा समकक्ष सदनाच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी  ऑस्ट्रेलिया  या देशातील वातावरण सध्या चांगलेच ढवळून निघत आहे . २१ मे ही प्रत्यक्ष मतदानाची तारीख असली तरी ज्या नागरिकांचे कोणाला मत देयचे हे ठरलेले आहे ते नागरिक ९ मे १८ मे दरम्यान आगाऊ मतदान देखील करू शकतात . नागरिकांनी पोस्टाद्वारे केलेले मत ऑस्ट्रेलिया निवडणूक आयोगापर्यंत ३ जुनपर्यंत फोहोचण्याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे . ऑस्ट्रेलिया देशातील लोकसभेची मुदत ३ वर्षे आहे मागील निवडणुका १८ मे २०१९ रोजी झाल्या होत्या  ऑस्ट्रेलियन संसद सुद्धा आपल्या सारखीच द्वि सदनी आहे आपल्या राज्यसभा समकक्ष ऑस्ट्रेलियन सदनाची सर्वसाधारणपणे मुदत ६ वर्षे आहे याला अपवाद आहे ऑस्ट्रेलिया  या देशाच्या केंद्रशासित प्रदेशातील सदस्यांच्या त्यांची मुदत मात्र ३ वर्षे आहे . जी त्यांच्या लोकसभेबरोबर संपते . मात्र ऑस्ट्रेलिया या देशातील राज्याच्या कडून निवडण्यात आलेले सदस्य मात्र ६ वर्षे पदावर राहतात . त्यांच्या लोकसभेत बहुमत असणारा ...

हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार ?

इमेज
         हवामान बदलाच्या अभ्यासाची दिशा बदलणार का  ? , असा प्रश्न उपस्थित व्हावा असे निष्कर्ष  नुकतेच अमेरिका आणि युकेच्या संशोधकांनी केलेल्या संशोधकांतून समोर आलेले आहेत अमेरिकेतील सॅन दिएगो येथील स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीच्या डॉ क्लो गुस्टाफसन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हे शोध लावले. या संशोधनासाठी या गटाने वापरलेल्या  तंत्राला मॅग्नेटोटेल्युरिक्स म्हणतात . हे खडक , गाळ , बर्फ किंवा पाणी असो , खोलवर दफन केलेल्या पदार्थांचे गुणधर्म निर्धारित करण्यासाठी पृथ्वीच्या नैसर्गिक विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांमधील फरकांची नोंद करते .               या संशोधकांना  अंटार्क्टिका खंडाच्या पश्चिमेला असणाऱ्या एका हिमनदीवर  संशोधन करत असताना  व्हिलन्स आइस स्ट्रीमच्या खाली  काही शेकडो मीटर अंतरावर द्रव तरल स्वरूपातील  पाणी आढळले आहे    अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या प्रवाहाखाली भूजल सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. अंटार्क्टिका हवामान बदलावर कशी प्रतिक्रिया द...

खगोलशास्त्रारातील हे रंजक शोध आपणास माहिती आहे ना ?

इमेज
          आपल्या सभोवताली पसरलेल्या अथांग पसरलेल्या अवकाशाविषयी आपल्यापैकी अनेकांना कुतुहूल असते . रात्री गावाबाहेर असताना ठळकपणे  दिसणाऱ्या  तारकासमूह मी तारे , ग्रह , उपग्रह , धूमकेतू , उल्का यांचे निरीक्षण करायला आपल्यापैकी अनेकांना आवडत सुद्धा असेल या सर्व गोष्टींच्या शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करणाऱ्या शास्त्रास खगोलशास्त्र म्हणतात हेही आपणस माहिती असेल तर .सध्याच्या महाराष्ट्रातील  राजकीय बातम्यांच्या गदारोळात या खगोलशात्रातील दोन महत्त्वाच्या ठरू शकतील अश्या दोन गोष्टींच्या शोधाच्या बातम्या काहिस्या हरवल्या माझे आजचे लेखन त्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी .           तर मित्रानो , विश्वाचा विस्तार होत आहे, हे ज्ञात सत्य आहे. बिग बँग थिअरी  नुसार, विश्वाची उत्पत्ती एका अकल्पनीय मोठ्या महास्फोटात झाली आणि  स्फोटाच्यावेळी बिंदुवत असणारे वस्तुमान एका बिंदूपासून बाहेर फेकले गेले या फेकले गेल्यामुळे  विश्वाचा विस्तार होत आहे . मागील 13.8 अब्जावर्षापासून हा विस्तार होतच आहे त्यातह...

जगभरात रात्र वैऱ्याची

इमेज
बुधवारी भारताच्या रिझर्व बँकेने देशातील महागाईचा दर खाली आणण्यासाठी आपले दर वाढवले मात्र वाढती महागाई ही फक्त आपल्या भारतासमोरील समस्यां नाही अमेरिका . यूके (इंग्लंड ) ऑस्ट्रलिया आदी विकसित देशांसह जगभरातील असंख्य देश देशांतर्गत महागाईने त्रस्त आहेत ज्यावर मत करण्यासाठी या देशातील मध्यवर्ती बँका (आपल्या रिझर्व बँक समकक्ष ) आपल्या रिझर्व बँकेसारखीच पाऊले उचलत आहेत अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने दोन दशकांहून अधिक काळातील सर्वात मोठा व्याज दर वाढविण्याची घोषणा केली आहे    या  बाबत माध्यमांशी बोलताना  फेडरल रिझर्व्हने म्हटले आहे की मार्चमध्ये थोडीशी वाढ झाल्यानंतर त्यांनी आपला बेंचमार्क व्याज दर अर्ध्या टक्क्यांनी वाढवला  आहे. त्यांच्या मते  अमेरिकन महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर, अपेक्षित आहे.ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती बँकेने अलीकडेच एका दशकापेक्षा जास्त कालावधीतील  सर्वात मोठ्या  व्याज दराची वाढ केली.   बँक ऑफ इंग्लंड ही  दर वाढविणे अपेक्षित आहे,जी डिसेंबरनंतरची चौथी वाढ होईल. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जे...

अखेर करावेच लागले

इमेज
४ मे २०२२ रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून कोणाच्याही ध्यानीमनी नसताना रिवर्स रेपो दारात ४० बीपीएसची वाढ करण्यात आली  (१०० % रेपोदरात १ टक्यांची वाढ केली असता ती १ बीपीएस समजली जाते )   ज्यामुळे बँकांना त्यांच्या ग्राहकांना अधिक व्याजदराने कर्ज द्यावे लागेल . त्याच प्रमाणे कॅश रिझर्व रेशो मध्ये ५० बीपीएसची वाढ करण्यात आली ज्यामुळे बँकांना ग्राहकांना कर्ज देण्यास कमी निधी प्राप्त होईल परिणामी या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन बाजारातील पैसाचा  पुरवठा कमी होईल . बाजारातील पैशाचा पुरवठा कमी झाल्याने महागाई कमी होईल असा रिझर्व बँकेच्या अंदाज होता . सर्वसाधारणपणे या दरांचा आढावा रिझर्व बँकेकडून दर दोन महिन्यांनी घेण्यात येतो मागच्या एप्रिलमध्ये रिझर्व बँकेने दारात बदल केला नव्हता त्यामुळे जूनमध्ये व्याजदर बदलतील अशा अंदाज होता मात्र देशातील महागाई बघता मध्येच मे महिन्यातच रिझर्व बँकेकडून व्याजदरात बदल करण्यात आला  आपण ज्या बँकांकडून कर्ज घेतो, त्या बँकांंना रिझर्व बँंकेकडून वित्त पुरवठा होतो. हे करण्यासाठी रिझर्व बँकेकडून आपल्या बँकांना ज्या दराने ...

भारताचा अश्व वेगाने दौडताना

इमेज
             येणारे शतक भारताचे असेल असे विधान मागील शतकाच्या शेवटी अनेक मोठ्या धुरिणींनी केले होते चालू शतकाच्या साधारणतः एक चतुर्थांश भाग सरत असताना या विधानाचा अनुभव येत आहे . मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी , डेन्मार्क , आणि फ्रांस या देशात केलेले दौरे त्याचीच साक्ष देत आहेत .  रशिया आणि युक्रेन युद्धाच्यावेळी स्वहिताचा बळी न देता या युद्धापासून अलिप्तता  राखत पश्चिम युरोपीय देशांना पूर्णतः अनुकूल भूमिका ना घेता आपली स्वतःची वेगळी ठाम भूमिका  घेण्याचा पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे .        फ्रान्समध्ये गेल्याच आठवड्यात २४ एप्रिल रोजी अध्यक्षपदाची निवडणूक झाली ज्यामध्ये  इमॅन्युएल मॅक्रॉन हे सलग  दुसऱ्यांदा  अध्यक्षपदासाठी निवडून आले पुढल्या पंधरवड्यात तेथील केंद्रीय विधिमंडळाच्या (आपल्या लोकसभा समकक्ष ) निवडणुका आहेत फ्रांस मधील आता पर्यंतच्या कल बघता अध्यक्ष ज्या पक्षाचा तोच पक्ष केंद्रीय विधिमंडळात अधिक जागा मिळवतो . फ्रान्समधील या निवडणुकीचा...

हमिद दलवाई तूमच्या कार्याला शतशः नमन

इमेज
 ३ मे १९७७ ही फक्त तारीख नाहीये . आज ४५ वर्षांनंतर सुद्धा अत्यंत कट्टर , रुढीग्रस्त , पंरपरेच्या जोखड्यात अडकलेल्या एका समाजातील एका समाजसुधारकांच्या मृत्यूची तारीख आहे ही , त्या महान समाज सुधारकांचे नाव आहे हमीद दलवाई . कोकणात जन्मलेल्या या समाजसुधारकाने आपल्या उणापुरया ४४ वर्षाच्या आयुष्यात हिमालयापेक्षा मोठे कार्य केले . ते सुद्धा आज २०२२ साली सुद्धा अत्यंत रुढीग्रस्त असणाऱ्या समाजात .आज तो समाज घटक इतका रुढीग्रस्त असेल तर ४५ वर्षांपूर्वी किती रूढिग्रत असेल याची कल्पनाच केलेली बरी  . हमीद दलवाई ज्या  समाज घटकाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाज घटकात   अत्यंत मोजके शब्दशः हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच समाज सुधारक झाले त्यातील एक महत्तवाचे नाव म्हणजे हमीद दलवाई . त्यामुळे त्यांचे कार्य अत्यंत महत्तवाचे ठरते  हमीद दलवाई यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश राजवटीत त्या वेळच्या बॉम्बे राज्यात  (आताचा महाराष्ट्र) मिरजोली गावात मराठी भाषिक मुस्लिम कुटुंबात झाला.  त्यांनी माध्यमिक शिक्षण चिपळूण येथे घेतले. 1951 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मु...