पोस्ट्स

आपण या बदलांना तयार आहोत का?

इमेज
   सध्या मराठी वृत्तवाहिन्यांवर नजर टाकली असता,  मुंबईत आणि तळ कोकणात ( रत्नागिरी सिंधूदुर्ग जिल्हे) पावसामुळे झालेले नुकसान , आणि आगामी पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने दिलेले विविध इशारे यांच्या बातम्या आपणास दिसतात. या सर्व बातम्यांचा गदारोळात या प्रश्नाच्या मुळाशी जाणारी एक बातमी पुण्याहुन आली, ती आपणापर्यत पोहचवण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो पुण्याचा पाषाण या उपनगरातील  डाँ होमी भाभा रोडवरील IITM( Indian Institute for   Tropical Metrology )या संस्थेमार्फत  अरबी समुद्राविषयी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात सन 1982 ते 2002 या कालखंडापेक्षा 2001ते 2019 या कालखंडात 52% अधिक संख्येने चक्रीवादळे अरबी समुद्रात आल्याची तसेच त्यांची तीव्रता वाढल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच याच कालावधीत बंगालच्या उफसागरात 8% कमी चक्रीवादळे आल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.  सर्वसाधरणपणे अरबी समुद्रात वर्षभरात एक किंवा फार तर दोन चक्रीवादळे तयार होत. अरबी समुद्रात दोन पेक्षा जास्त चक्रीवादळे म्हणजे डोक्यावरुन पाणी असी स...

आली समिप घटीका ..... विनाशाची

इमेज
     सध्या जगाचे लक्ष अफगाणिस्तान आणि तालीबान याच्या घडामोडीबरोबर बदत्या हवामान बदलामुळे आलेल्या त्रासाकडे वेधले गेले आहेच. तालीबान आणि अफगाणिस्तानविषयी मी आधीच बोललो आहे. आज बोलणार आहे, हवामान बदलाच्या धोक्याविषयी.     तर मित्रांनो, तळ कोकणात, (रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तळ कोकण म्हणतात, तर ठाणे रायगड, पालघर आणि मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर हे जिल्हे  उत्तर कोकणात येतात सावित्री नदी त्यांची सीमा निश्चित करते.) मुंबई तसेच पश्चिम युरोपीय देशांमध्ये पाउस आणि पुरामुळे  अशरशः भंबेरी  उडाली आहे. पश्चिम युरोपात गेल्या कित्येक वर्षात पडला नाही इतका पाउस पडलाय. जगात विकसीत समजल्या जाणाऱ्या पश्चिम युरोपीय देशात 300 व्यक्ती या पावसामुळे आणि पावसामुळे आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या आहेत जरी तळ कोकणात पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची बातमी आलेली नसली तरी मुंबईत मात्र पावसामुळे  भुस्खखलन होवून कित्येक निष्पाण जीव प्राणास मुकले आहेत.एककीडे पाउस नको नकोसा करत असला तरी नाशिक मराठवाडा पावसाची आस लावून बसला आहे.     गेल्या काही महिन्यातील...

दिवस आहे खास बुद्धिबळाचा

इमेज
   आपल्याकडे विविध  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गोष्टींचे दिन साजरे केले जातात. काही वेळेस एखाद्या व्याधी विषयक दिन साजरे केले जातात.काही दिवस एखाद्या विशिष्ट क्षेत्राला डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जातात. जसे 15सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय इंजिनिरींग दिन किंवा 23 मे रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय स्किझोफेनिया दिन. मात्र जर कोणी आपणास सांगितले एखाद्या खेळाला समर्पित असणारा एखादा हादिन आहे तर.! तूम्ही म्हणाल हे कसे काय शक्य आहे. तर मित्रांनो, असा एक खेळ आहे. ज्याचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात येतो, तो म्हणजे 20जूलै रोजी साजरा करण्यात येणारा आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिन. सन 1966 पासून बुद्धीबळाची आंतरराष्ट्रीय संघटना जी फिडे या संक्षीप्त नावाने प्रसिद्ध आहे त्या संघटनेमार्फत अर्थात फेडरेशन इंटरनँशल डिइचेस या संघटनेतर्फे हा दिन साजरा करण्यात येतो.               नुकत्याच फुटबाँलविषयक जागतिक स्तरावरच्या दोन स्पर्धा झाल्या. त्याआधी टेनिस मधील.महत्तवाच्या चार स्पर्धांपैकी एक असणारी विबल्डन ही स्पर्धा झाली . या स्पर्धां...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग8)

इमेज
   नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा नसल्याने नाशिककरांच्या तोंडाचे पाणी पळाले असताना, जगाचे पाणी मात्र अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तालीबानच्या प्रभावामुळे पळाले आहे.अफगाणिस्तानचे भवितव्य काय असू शकेल ? यावर विविध परीषदा सध्या होत आहे. दुष्यंते या शहरात झालेली शांघाय काँपरेशन आँरगानयझेशन ची परराष्ट्र मंत्र्यांंची परीषद असो, अथवा उझबेकिस्तान ची राजधानी तास्कंद या ठिकाणी सध्या सुरु असलेली दक्षिण आणि मध्य आशियातील देशांची परीषद, सर्वत्र अफगाणिस्तानचाच विचार केला जात आहे.     तास्कंद येथील दक्षिण आणि मध्य आशियातील देशांच्या शिखर परीषदेत अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांनी जाहिरपणे पाकिस्तानने अफगाणिस्तानात दहा हजार प्रशिक्षीत दहशतवादी सोडले असल्याचा आरोप केला. त्यावेळी त्या सभागृहात भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांचा जवळच बसले होते. आपला क्रमांक आल्यावर इम्रान खान यांनी पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी पडला आहे. गेल्या 15 वर्षात पाकिस्तानात एक हजार लोक दहशतवादामुळे बळी पडले आहेत, असे...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग7)

इमेज
         सध्या जगभरात एकच मुद्दा चर्चिला जात आहे  , तो म्हणजे अफगाणिस्तान आणि तालिबान . जगातील विविध देश याबाबत आप आपली भूमिका जाहीर करत आहेत अफगाणिस्तानची तालिबान करत असलेल्या उभारणीत आपली भूमिका असावी या हेतूने विविध आघाडी उभारत आहे . यामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत . नुकतीच रशियाकडून नॉर्दन अलायन्स उभारण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहे.  तर अमेरिकेकडून,  अमेरिका उझबेकिस्तान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची आघाडी उभारण्यात आली आहे . समर्थ रामदास स्वामी यांच्या जे जे आपणशी ठाव ते सकलांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जन या उक्तीनुसार त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन .         तर मित्रांनो 1996 ते 2001 दरम्यान अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रभाव फारशा वाढू नये या हेतूने रशिया अमेरीका , चीन भारत, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा एक गट कार्यरत होता .ज्यास नाँर्दन अलायन्स असे म्हणतात..हा गट त्यावेळी सक्रीय असल्याने तालीबानच्या सक्रिय कालावधीत सुद्धा अफगाणिस्तानचा उत्तरेकडील भागात तालीबानच...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग6)

इमेज
             सध्या जगात सर्वत्र मुद्यांवर विचारमंथन होत आहे तो मुद्दा म्हणजे अफगाणिस्तानचे काय होणार  अफगाणीस्तानमध्ये तालिबान येणार हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झाले असताना त्याचे आपल्यावर काय परिणाम होणार याबाबत प्रत्येक देश विचार करत आहे . आपणदेखील लंकेत सूर्याचा विटा या प्रमाणे आपण या पासून अलिप्त राहू शकत नाही या घडामोडींचा आपल्या भारतावर देखील मोठा परिणाम होणार आहे   माझे आजचे तालिबानविषयक लेखन भारताला होणारे परिणाम सांगण्यासाठी .      मित्रानो भारतावर होणाऱ्या परिणामाचे आपण आर्थिक परिणाम आणि सरंक्षण विषयक असे दोन मुख्य प्रकारात विभाजन करू शकतो . पहिल्यांदा आर्थिक परिणाम बघूया . तर  भारताचे अफगाणिस्तानमध्ये विविध असे जवळपास 400 विकासकामे सुरु आहेत  ज्यामध्ये अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या  काबुल शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काबुल नदीवर धरण बांधणे अफगाणिस्तानमध्ये हैरात प्रातांत हिरा नदीवर समरकंद हे धरण बांधणे .  तसेच .अफगाणिस्तानला समुद्री मार्गाचा फायदा घेण्यात यावा म्हणून इराणच्या...

भयानक वास्तवाकडे वाटचाल (भाग5)

इमेज
सध्या आपल्या भारतात विविध मुद्यांवरुन विविध मतमतांतरे मांडली जात असताना जगाचे लक्ष एकाच गोष्टीकडे केंद्रीत झाले आहे. ते म्हणजे अफगाणिस्तान आणि त्यातील तालीबान.       नुकतेच तालीबानचे प्रवक्ते सोहेल सलीन यांनी चीन तालीबानचा मित्र आहे. तालीबान कोणत्याच प्रकारे सिंकीयांग राज्यातील फुटीरतावाद्यांना मदत करणार नाही. आमचा अफगाणिस्तानवर संपुर्ण नियंत्रण आल्यावर अफगाणिस्तानचा विकास करण्यासाठी आम्हाला चीनची मदतच होईल, असा विश्वास वाटतो, असे  जाहिर केले आहे. अर्थात या मागे तालीबानला आर्थिक मदत तसेच जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळण्यात  चीनचे साह्य होवू शकते.हा स्पष्ट हेतू आहे. अफगाणिस्तानची 35किलोमीटर रुंद आणि 110किमी लांब असणाऱ्या वाखान काँरीडाँर मार्फत चीन आणि भारताबरोबर सीमा लागते. अफगाणिस्तान बरोबर चीनची सीमा सिकीयांग (काही ठिकाणी उच्चार झिकियांग म्हणून केला जातो) या मुस्लिम बांधवांची संख्या बहुसंख्येने असलेल्या प्रांताला लागून आहे. या प्रांतातील मुस्लिम बांधवांवर चीन अत्याचार करतो, असा पाश्चिमात्य देशांचा दावा आहे.सुमारे 72वर्षापुर्वी हा भाग चीनच्या अधिपत्याखाली आला. य...