पोस्ट्स

गुलाब चक्रीवादळाच्या निमित्याने ...... थोडेसे

इमेज
             मित्रानो , हा लेख तुम्ही जेव्हा वाचत असाल तेव्हा गुलाब नावाचे चक्रीवादळ ओडिसा  राज्याचा दक्षिणेच्या आणि आंध्र प्रदेशाच्या सीमांध या भागातील उत्तरेच्या काही जिल्ह्यामध्ये जमिनीला येऊन धडकले असेल  विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची धुवाधार बंटिंग सुरु असेल . आणि टीव्हीवरील बातम्यांमध्ये तेथील विस्कळीत जनजीवन,  प्रशासनाचे लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न या विषयीच्या बातम्या चालू असतील . गेल्या काही वर्षात मागच्या अनुभवांवरून शहाणे होत प्रशासनामार्फत अत्यंत उत्तम नियोजन केले जाते. त्या बद्दल प्रशासनाचे कौतुक करायलाच हवे . माझे आजचे लेखन मुळात चक्रीवादळे निर्माण कशी होतात ?  कुठे कुठे निर्माण होताता ? या घडामोडींची माहिती देण्यासाठी          तर मित्रानो आपण ज्यास चक्रीवादळे म्हणतो ती मुळात समशीतोष्ण कटिबंधातील वादळे आहेयास पृथीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखक्ले जाते अमेरिकेच्या पूर्व भागात (अटलांटिक किनारा ) यास हरिकेन तर अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि जपान फिलिपाइन्स या भागात यास ...

घटती प्रशासनातील अधिकाऱ्याची संख्या

इमेज
      24  सप्टेंबरला मागच्या सन 2020 साली झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे निकाल जाहीर झाले .सर्वसाधारणपणे जानेवारी ते मार्च च्या दरम्यान होणारा मुलाखतीचा   टप्पा यावेळी कोरोना संसर्गामुळे बराच लांबला मुलाखतीचा टप्पा 22 २सप्टेंबररोजी संपला अन्य वेळी मुलाखतीचा टप्पा संपल्यावर पंधरा दिवस ते महिन्याचा अवधीत जाहीर होणार अंतिम निकाल यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने अवघ्या दोन दिवसात जाहीर केला   गेल्या काही वर्षांपासून कमीत कमी अधिकारी निवडण्याचा प्रघात केंद्रीय लोकसेवा आयोगाने याही वर्षी सुरूच ठेवला या वर्षी फक्त 762 अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली   मागील 2019 वर्षी 796 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.. सन 2015साली .1129,    ,2016 साली   1079, 2017साली 980   , 2018   साली 792 , 2018 साली 896 अधिकारी निवडण्यासाठी परीक्षा झाली होती.   पुर्वी दरवर्षी जितके अधिकारी सेवानिवृत्त होत तितकेच आता होत आहेत, मात्र सातत्याने नविन अधिकाऱ्यांची भरतीसंख्या कमी होतानाच दिसते .गेल्या सहा वर्षीचा आढावा घेतल्यास 20...

ब....... बुद्धिबळाचा (भाग 9)

इमेज
                             भारतीय क्रीडाविश्व बुद्धिबळ ऑल्मियाडमधील  उपांत्य फेरीतील (सेमी फायनल ) पराभवाचे दुःख विसरून पुन्हा एकदा एका नव्या स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. ही स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने खेळवली जाणार असून स्पर्धा स्पेनमधील एका निसर्गाची लयलूट असणाऱ्या शहरात अर्थात स्ट्रिंग्स शहरात 26 सप्टेंबर ते 2  ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे . ही स्पर्धा आहे वूमन चेस टीम चॅम्पियनशिप 2021  26 सप्टेंबर रोजी स्पर्धक खेळ आयोजित केलेल्या शहरात येणार असून प्रत्यक्ष खेळाला 27 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे ही स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.   आणि 3ऑक्टोबर रोजी   स्पर्धक मूळगावी जातील या स्पर्धेमध्ये जगातील सर्वोत्तम अश्या 48 महिला बुद्धिबळपटू आपले कसब अजमावणार आहेत            बुद्धिबळ तसा वैयक्तिक खेळ मात्र ही स्पर्धा विविध संघांमध्ये होणार आहे . आशिया  ( ऑस्ट्रोलिया,   न्यझीलँड फिलिपाइन्स आदी देशांचा समावेश करून ) , आफ्रिका , अम...

हँपी बर्थडे नेपच्यून ?

इमेज
           हँपी बर्थडे नेपच्यून , ! चमकलात ना? नेपच्युन हा तर ग्रह आहे मग त्याचा कशा काय वाढदिवस ? असा प्रश्न आपणास पडला असेल . तर सांगतो आजच्याच  दिवशी अर्थात 23 सप्टेंबर 1846 साली नेपच्युन या ग्रहाचा शोध लागला आज 2021 साली या ग्रहाचे  सूर्यमालेतील  समजून 175 वर्षे झाली आहेत त्या अर्थाने आज 23 सप्टेंबर 2021 रोजी नेपच्यून या ग्रहाचा 175 व वाढदिवस आहे म्हणून म्हंटले हॅपी बर्थ डे  नेपच्यून                    न्यूटनच्या गरुत्वाकर्षणाच्या नियमावरून शोधला गेलेला हा ग्रह सौरमालिकेतील सर्वात लांबचा आठवा ग्रह आहे . जो आकाराने सौरमालकिकेतील  आकाराने चवथा मोठा ग्रह आहे जो वस्तुमानाचा विचार करता तिसरा मोठा ग्रह आहे पृथ्वीवरील वर्षाचा विचार करता सुमारे 165 वर्षात (अचूकपणे सांगायचे झाल्यास164.8वर्षात ) तो सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करतो थोडाख्यात नेपच्यनचे एक वर्ष पृथ्वीच्या 165 वर्षाइतके आहे .याचा शोध फ्रेंच नागरिक असणाऱ्या  उर्बाईन ले वेरियर आणि जर्मन नागरिक ...

हे चाललंय काय ?

इमेज
            मध्ययुगात जेव्हा रोम जळत होते लोक आपला जीव वाचण्यासाठी सैरावैरा पळत होते  तेव्हा तत्कालीन रोमचा सत्ताधीश निओ आपल्या प्रसादलात निवांतपणे संगीताचा आस्वाद घेत होता. फ्रान्समध्ये सोळाव्या लुईच्या काळात जेव्हा सर्वसामान्य जनता परिस्थितीने अत्यंत त्रासलेली होती . त्यावेळी तेथील राणीने त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.  सध्या महाराष्ट्रात आणि देशात ज्या प्रकारे सताधीश वर्ग आणि विरोधक जनतेच्या मूलभूत प्रश्नापासून दूर जा, त मी मारल्यासारखे करतो,  तू रडल्यासारखे कर,  या पद्धतीचा जो खेळ कर करत आहे , त्यामुळे हे आठवल्याशिवाय राहत नाही . दुर्दैवाने या खेळामध्ये राजा तू चुकत आहेस  हे सांगायला कोणी ब्रुटस नाहीये मात्र त्यामुळे मात्र जनता न मरता मेल्यासारखीच होत आहे ज्याकडे कोणाच्याच लक्ष नाहीय।                   गेल्या काही दिवसांपासून देशातील आणि राज्यातील शासनकर्ते आणि विरोधक यांनी जनहितार्थ कोणती कामे अथवा आंदोलने केली? याची यादी केली असता आपणास याचे सहजतेने उत्तर मिळते . उठता ...

समसमान आम्ही दोघे म्हणती दिन राञ

इमेज
         पृथ्वी सुर्या भोवती फिरते हे आता जगमान्य झाले आहे . याचा आपल्याला दिसणारे दृश्यपरिणाम म्हणजे आपल्याला दिसणारे सुर्याचा उदयाचे रोज बदणारे स्थान . धोबळ मनाने आपण सूर्य पुर्वेला उगवतो असे मानतो पण शास्ञीय दृष्ट्या विचार केला असता वर्षातील फक्त दोन दिवस असे असतात ज्या दिवशी सुर्य वास्तविक पुर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो वास्तविक पुर्व दिशेपासून काहि अंश उजवीकडे अथवा डावीकडे उगवतो .ते दोन दिवस म्हणजे 21 मार्च आणि 21 सप्टेंबर .              सुर्याभोवती पृथ्वी फिरत असल्यामुळे आपणास सुर्यच फिरत आहे असे वाटते .आपण त्यास सुर्याचे भासमान भ्रमण म्हणू या . तर हे सुर्याचे भासमान भ्रमण होते पृथ्वीवरच्या मध्यापासून अर्थात विषवृतापासून उजवीकडे आणि डावीकडे साडे तेवीस अंशापर्यत                   जेव्हा हा सुर्य त्याचा भासमान भ्रमणात सुर्य विषवृतावर असतो .त्यादिवसी दिनमान आणि रात्रीचा कालावधी समान असतो . जो१२ १२तासांचा असतो वर्षातून असे दोन दिवस असतात ...

28 वर्षापूर्वीची ती काळरात्र

इमेज
.          दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी आपण अनंत चतूर्दशी साजरी केली  .या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील दहा दिवसांची यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 28 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , .गणरायाचे विसर्जन करून ते झोपे गेले ते कायमचेच.   लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे       मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 28वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली. .लातूर किल्लारी परीसराला लागून असले...